Posted on 09 Sep, 2017 12:53 PM या नदीला रेवा नदी या नावानेही संबोधल्या जाते. संस्कृतमध्ये नर्मदाचा अर्थ सुखदायिनी असा होतो. आशिया खंडातील नद्यांपैकी लांबीने ही पाचव्या क्रमांकावरील नदी आहे. भारतात हिचा हिमालयांतून उगम पावणार्या नद्या सोडून गोदावरी व कृष्णा नद्यांंच्या खालोखाल तिसरा क्रमांक लागतो. मध्यप्रदेशाची ती जीवनरेखा समजली जाते.
Posted on 09 Sep, 2017 11:38 AM जबर इच्छा शक्ती, पक्का निर्धार व प्रामाणिक प्रयत्न एकत्र आले तर जगात काहीही घडू शकते ही गोष्ट बारीपाडा (जिल्हा धुळे) प्रयोगावरुन सिद्ध झाली आहे. बरीच गावे, सरकार पुढे येईल, आपल्यासाठी काही करेल, त्याद्वारे आपली प्रगती होईल याची वाट पाहात असतात.
Posted on 12 Aug, 2017 03:24 PM “पाणीटंचाईच्या काळातही गळणारी नळं दिसतात. मात्र, ते बदलण्याची कृती होत नाही... करंगळीच्या आकाराच्या निम्मं पाणी नळातून सतत वाहत असेल, तर दरवर्षाला सुमारे ५ लाख लीटर पाणी वाहून जातं. बाहेरगावी गेल्यावर आपण २० रुपयाची पाण्याची बाटली विकत घेऊन पितो, मग एक कोटी रुपयांचं पाणी वाहून जात आहे, असा विचार करून प्रत्येकानं ते वाचवायला हवं.
Posted on 12 Aug, 2017 01:29 PM (महाराष्ट्रातील भूजल समजून घेताना त्याचे तांत्रिक, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय पैलू जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या लेखमालेच्या माध्यमातून हे सर्व पैलू विस्ताराने सोदाहरण मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यात महाराष्ट्रातील भूजलाची निर्मिती, प्रवास, वारसा, उपलब्धी, वापर, गुणवत्ता, व्यवस्थापन, संहिता, धोरण अशा क्रमाने या सर्व पैलूंची उकल करण्यात येणार आहे).