जलसंवाद

जलसंवाद
देशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी
Posted on 06 Mar, 2018 03:54 PM

पाण्याचे बाबतीत नेपाळ समृद्ध आहे याचा उल्लेख सुरवातीला आलेललाच आहे.

भारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी
Posted on 06 Mar, 2018 02:04 PM

कावेरी नदी सुद्धा दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. तामीळ साहित्यात या नदीला महत्वाचे स्थान आहे. जुन्या राजवटींना व नवीन शहरांना याच नदीने सुरळीत वसण्यासाठी पाणी दिले आहे. बर्फाळ प्रदेशात उगम नसूनसुद्धा ही नदी बाराही महिने वाहते. डोंगरांमध्ये मुरलेले पाणी पाझरांच्या स्वरुपात सतत मिळत राहिल्यामुळे तिथून बाराही महिने पाणी पुरवठा होत राहतो.
भारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण
Posted on 19 Jan, 2018 11:24 AM

उत्तर प्रदेशात सोऩभद्र जिल्ह्यातील पिंप्री येथे रिहांद नदीवर बांधल्या गेलेले हे धरण होय. तसे पाहू गेल्यास हे धरण उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर बांधण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यांशिवाय बिहार राज्याला सुद्धा या धरणामुळे सिंचनाचा लाभ मिळत आहे.
भारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव
Posted on 18 Jan, 2018 03:55 PM

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या शहराच्या पश्‍चिम बाजूला हा तलाव वसलेला आहे. या महानगरातील ४० टक्के लोकसंख्येला या तलावापासून पिण्याचे पाणी मिळते. या सरोवराला जागतिक रामसर साईटचा दर्जा प्राप्त झाला आहे. या सरोवराची लांबी ३१.५ किलोमीटर व रुंदी ५ किलोमीटर आहे. ३६१ चौरस किलोमीटर परिसरातून या सरोवराला पाणी प्राप्त होते. या सरोवराचा पृष्ठभाग ३१ चौरस किलोमीटर आहे.
भारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण
Posted on 09 Jan, 2018 01:31 PM

संपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आह

भारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी
Posted on 09 Jan, 2018 11:24 AM

भारतातील गंगा नदी सोडली तर गोदावरी नदी ही सर्वात लांब नदी समजली जाते. या नदीची लांबी १४६५ किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्रिंबकेश्‍वर डोंगरातून तिचा उगम होतो आणि महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश व पुडुचेरी या राज्यातून प्रवास करुन ती बंगालच्या उपसागराला मिळते. धार्मिक दृष्टीनेही ती एक महत्वाची नदी समजली जाते आणि म्हणूनच तिला दक्षिण गंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते.
भारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर
Posted on 08 Jan, 2018 01:07 PM

हे सृष्टीसौंदर्याने विनटलेले श्रीनगर येथील एक सुंदर सरोवर आहे. खरे पाहिले असता दल याचा अर्थच मुळी सरोवर असा आहे. म्हणून दल सरोवर म्हणणे तितकेसे बरोबर ठरत नाही पण आता तो रुळलेला शब्दप्रयोग झाला असून त्याचा उल्लेख सर्वत्र दल सरोवर म्हणूनच केला जातो. काश्मीरमधील हे दुसर्‍या क्रमांकाचे सरोवर आहे.
देशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी
Posted on 08 Jan, 2018 12:52 PM

पावसाच्या दृष्टीने श्रीलंकेचे तीन भाग पडतात. ओला प्रदेश ज्या भागात २००० मीमीपेक्षा जास्त पाऊस पडतो) मध्यम प्रदेश (१५०० ते २००० मीमी इतका पाऊस पडतो) व कोरडा प्रदेश (जिथे १५०० मीमी पेक्षा कमी पाऊस पडतो) असे ते तीन भाग होत. श्रीलंकेत १०३ नद्यांची खोरी आहोत. सर्वात मोठा असलेली महावेली ही नदी असून तिची लांबी ३३५ किलोमीटर आहे.
भारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी
Posted on 14 Nov, 2017 11:17 AM

यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात लांब असलेली उपनदी आहे. हिचा उगम यमुनोत्री बर्फरांगातून झाला असून त्याची उंची ६३८७ मीटर एवढी आहे. या नदीचे खोरे ३६६२२३ चौरस किलोमीटर पर्यंत पसरले आहे. या नदीची लांबी १३७६ किलोमीटर असून ती गंगा नदीला अलाहाबाद येथे मिळते. याच ठिकाणी सरस्वती नदीही गुप्त स्वरुपात असून या ठिकाणी या तीन नद्यांचा संगम झाला असे मानले जाते.
पवई सरोवर - भारतातील प्रसिद्ध सरोवरे : 5
Posted on 13 Nov, 2017 04:12 PM

हे एक कृत्रिम रित्या निर्माण करण्यात आलेले सरोवर होय. या सरोवराखालील जागा फ्रामजी कावसजी पवई यांना इंग्रज सरकारने लीजवर दिली होती. हे श्रीमान पवई पश्‍चिम भारतातील अ‍ॅग्रीकल्चरल व हॉर्टिकल्चरल सोसायटीचे उपाध्यक्ष होते. त्यांचे जागावर १८९१ साली या सरोवराची निर्मिती झाल्यामुळे त्यांचे नाव या सरोवराला देण्यात आले. या सरोवराच्या काठावर आयआयटी व निटी सारख्या प्रसिद्ध संस्था वसल्या आहेत.
×