जलसंवाद

जलसंवाद
जायकवाडी धरण भारतातील प्रसिद्ध धरणे : 5
Posted on 13 Nov, 2017 03:54 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराजवळ गोदावरी नदीवर बांधलेले हे धरण होय. या धरणाच्या बांधकामाला १९६५ साली सुरवात होवून ते १९७६ साली पूर्ण करण्यात आले. या धरणाची उंची ४१.३ मीटर असून लांबी ९९९८ मीटर आहे. या धरणाचे जलधरण क्षेत्र २१७५० चौरस किलोमीटर असून एकूण जलसाठा २९०९ घन किलोमीटर एवढा आहे. या धरणात वीज निर्मितीचीही सोय असून १२ मेगॅवॅट क्षमतेचे जनित्र बसविण्यात आले आहे.
देशोदेशीचे पाणी : म्यानमारमधील पाणी
Posted on 13 Nov, 2017 11:10 AM

पाण्याच्या गुणवत्तेबाबत मात्र या देशाची परिस्थितीत समाधानकारक नाही.

भारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर
Posted on 23 Oct, 2017 09:39 AM

भारतातील सर्वात मोठे असे खार्‍या पाण्याचे हे सरोवर आहे. जयपूर पासून 96 किमी व अजमेर पासून 64 किमी अंतरावर राष्ट्रीय हमरस्ता 8 वर हे सरोवर वसले आहे. या सरोवराला पाण्याची आवकही नाही व जावकही नाही. मेंढा, रुपनगढ, खांडेल व कुरियन या नद्यांपासून पाटाने या सरोवरात पाणी आणले जाते. या सरोवरासभोवताल एकूण 38 गावे वसली आहेत. हे सरोवर नागौर व जयपूर जिल्ह्यात पसरले आहे.
भारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण
Posted on 22 Oct, 2017 04:24 PM

भारतातीत सर्वात उंचावर बांधलेले धरण असा या धरणाचा लौकिक आहे. जगातही अशा प्रकारची उंचावर बांधलेली धरणे संख्येने बरीच कमी आहेत. उत्तराखंडात भागीरथी नदीवर तेहेरी येथे हे धरण बांधण्यात आलेले आहे. 2006 साली या धरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. सिंचन, नागरी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती या तिहेरी उद्देशाने हे धरण बांधण्यात आले आहे.
भारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी
Posted on 22 Oct, 2017 04:08 PM

भूकंपांमुळे जमिनीवर जी उलथापालथ झाली त्यामुळे या नदीचा प्रवाह बदलला असावा.

भारतातील प्रसिद्ध धरणे : नागार्जून सागर धरण
Posted on 10 Sep, 2017 10:01 AM

नालगोंडा जिल्हा (तेलंगणा) व गुंटुर जिल्हा (आंध्रप्रदेश) यांच्या सीमा रेखेवर कृष्णा नदीवर नागार्जून सागर हे धरण उभारण्यात आले आहे.१९६५ ते ६७ .या कालखंडात या धरणाचे बांधकाम करण्यात आले. या धरणाची क्षमता ११.४७ बिलियन क्युबिक मीटर एवढी आहे. धरणाची लांबी १.६ किलो मीटर असून काही भागात खोली १५० मीटर आहे.
भारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर
Posted on 09 Sep, 2017 01:20 PM

इब्राहीम कुली कुतुब शहा या राजाने आपल्या राजवटीत १५६३ साली या सरोवराची निर्मिती केली. या सरोवराचा आकार हृदयाच्या आकारासारखा आहे. जगात अशा आकाराचे हे एकमेव सरोवर आहे. त्याचे क्षेत्रफळ ५.७ चौरस किलोमीटर एवढे आहे. सरोवराची सरासरी खोली ३२ मीटर आहे. या सरोवराला पाणी पुरवठा मूसी नदी करते.
भारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी
Posted on 09 Sep, 2017 12:53 PM

या नदीला रेवा नदी या नावानेही संबोधल्या जाते. संस्कृतमध्ये नर्मदाचा अर्थ सुखदायिनी असा होतो. आशिया खंडातील नद्यांपैकी लांबीने ही पाचव्या क्रमांकावरील नदी आहे. भारतात हिचा हिमालयांतून उगम पावणार्‍या नद्या सोडून गोदावरी व कृष्णा नद्यांंच्या खालोखाल तिसरा क्रमांक लागतो. मध्यप्रदेशाची ती जीवनरेखा समजली जाते.
व्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)
Posted on 09 Sep, 2017 11:38 AM

जबर इच्छा शक्ती, पक्का निर्धार व प्रामाणिक प्रयत्न एकत्र आले तर जगात काहीही घडू शकते ही गोष्ट बारीपाडा (जिल्हा धुळे) प्रयोगावरुन सिद्ध झाली आहे. बरीच गावे, सरकार पुढे येईल, आपल्यासाठी काही करेल, त्याद्वारे आपली प्रगती होईल याची वाट पाहात असतात.
मिशन राहत - मराठवाडा दुष्काळ मुक्ती
Posted on 10 Aug, 2017 11:30 AM

रिलायन्स - सी एस आर वेबसाईट वरून
×