सहाव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचा समारोप


सहाव्या अखिल भारतीय संमेलनाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर सर्वादय शिक्षण मंडळ, चंद्रपूर या संस्थेचे अध्यक्ष श्री. शांतारामजी पोटदुखे, आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर, जलसाहित्य मंचच्या (भारतीय जलसंस्कृती मंडळ) प्रमुख श्रीमती अरूणाताई सबाने, श्री. शंकर मंडेरीया, श्री. प्रवीण जानी, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग रिसर्च अॅण्ड टेक्नॉलॉजी चंद्रपूरचे प्राचार्य, श्री. किर्तीवर्धन दीक्षित आणि सहाव्या जलसाहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक श्री.मदन धनकर उपस्थित होते.

सहाव्या अखिल भारतीय संमेलनाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर सर्वादय शिक्षण मंडळ, चंद्रपूर या संस्थेचे अध्यक्ष श्री. शांतारामजी पोटदुखे, आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर, जलसाहित्य मंचच्या (भारतीय जलसंस्कृती मंडळ) प्रमुख श्रीमती अरूणाताई सबाने, श्री. शंकर मंडेरीया, श्री. प्रवीण जानी, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग रिसर्च अॅण्ड टेक्नॉलॉजी चंद्रपूरचे प्राचार्य, श्री. किर्तीवर्धन दीक्षित आणि सहाव्या जलसाहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक श्री.मदन धनकर उपस्थित होते. दीप प्रज्वलनानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री. मदन धनकर यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी सहाव्या अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाच्या या कार्यक्रमाने सर्वजण भारावून गेल्याची जाणीव सभागृहाला करून दिली. हे संमेलन लोकांना दृष्टी देणारे होते.

आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केलेले जलनिती बाबतचे मार्गदर्शन उपयुक्त होते ते प्रत्येकाने समजून घ्यावे आणि शासनाने केलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी असे सांगितले. यानंतर प्रदीप चिटगोपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांना या संमेलनात जलगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. श्री.चिटगोपेकर हे जलसंवाद या मासिकाचे संपादक आहेत. त्यांनी जलसंस्कृती या विषयावर विशेषांक प्रकाशित केलेत. तसेच जलसंवाद मासिकाचे सहा वर्षात 72 अंक व 15 विशेषांक काढण्यात त्यांनी डॉ.देशकरांचे बरोबर अपूर्व योगदान दिले आहे. सर्वांनी लेखन करून जलसाहित्य निर्माण करावे असे त्यांनी सुचविले. मिळालेल्या पुरस्काराबाबत आभार मानले.

या कार्यक्रमात भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबादचे नवे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. श्री. शंकर मंडेरीया, श्री.प्रवीण जानी, श्री. मदन धनगर यांचाही शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यानंतर श्री.शांताराम पोटदुखे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यांनी भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबाद यांनी या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले आणि हा कार्यक्रम आयोजित केला याबाबत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे वृत्तपत्रातून फार चांगल्या प्रतिक्रिया आल्या असल्याचे आणि त्यामुळे आम्हाला खूप चांगले वाटते असे सांगितले. त्यांनी पाण्याचे महत्व सांगतांना पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. त्यावेळी अन्नसुरक्षेचा प्रश्न महत्वाचा होता. भाक्रानांगल सारख्या धरणाच्या कामाला सुरवात केली. भाक्रानांगलमुळे राजस्थानला फायदा झाल्याचे सांगितले. त्यांनी अमेरिकेतील कोलोरॅडो नदीवर बांधलेल्या हॉवर धरणाची व त्यातून त्यांना झालेल्या फायद्याबाबत माहिती दिली.

चंद्रपूर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न (पर कॅपीटा इनकम ) अत्यंत कमी असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. राईट टू वॉटर यासाठी लोक चळवळ उभारावी असे सुचवले. राजीव गांधी पंतप्रधान असताना श्री. पोटदुखे त्यांच्या सल्लागार समितीत होते. त्यावेळेच्या आठवणी सांगितल्या, त्यावेळी इस्त्रोला दिलेली भेट व तेथील अनुभव सांगितले. त्यांनी भारतीय जलसंस्कृती मंडळ करीत असलेल्या कार्याची स्तुती केली आणि अशा कामासाठी आमची संस्था सतत मदत करील असे सांगितले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.किर्तीवर्धन दीक्षित यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

श्री. वसंत मुसांडे, औरंगाबाद - (भ्र : 9921892204)

Path Alias

/articles/sahaavayaa-akhaila-bhaarataiya-jalasaahaitaya-sanmaelanaacaa-samaaraopa

Post By: Hindi
×