पाण्यातील जडपणा कमी करणारे उपकरण - स्केलवॉचर


या उपकरणाचा वापर कोणत्याही जलवाहक पाईपवर करता येतो. मग तो पाईप लोखंडी असो अथवा तांब्याचा, प्लॅस्टिकचा अथवा काचेचा सुध्दा असू शकतो. पाईपचा घेर 1 इंचापासून 80 इंचापर्यंत असला तरी चाललो. अर्थात त्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेचे स्केलवॉचर उपकरण बसवावे लागते. हे उपकरण घरगुती पाण्याच्या वापरापासून तर वेगवेगळ्या औद्योगिक संस्थांच्या गरजा पूर्ण करते. घरगुती वापरासाठी जे उपकरण वापरले जाते त्याची किंमत दहा हजाराच्या आतच आहे.

पाण्यात किती प्रमाणात वेगवेगळे क्षार मिसळलेले असतात त्यावरून पाण्याला जड पाणी म्हणवयाचे की मृदू पाणी म्हणायचे हे ठरत असते. नदी ज्या प्रदेशातून वाहात असते तिथल्या जमिनीतील क्षार पाण्यात मिसळू शकतात. ते क्षार जास्त प्रमाणात मिसळले तर ते जड पाणी होवू शकते. यापेक्षा भूगर्भातील पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त राहते कारण जमिनीचे वेगवेगळे थर पाण्याला क्षार देवून त्याला जड बनवीत असतात. कॅल्शियम, मॅगन्शियम व सोडियम आणि त्यांचे कार्बाेनेटस्, सल्फेट्स, क्लोराईटस् यांचे पाण्यातील प्रमाण वाढले तर ते पाणी जड बनत जाते.

पाणी जड असेल तर कपडे धुतांना साबणाला फेस कमी प्रमाणात येतो व कपडे म्हणावे तितके साफ होत नाहीत. त्यांचा रंग बदलतो व त्यावर पिवळी झाक यावयास लागते. पिण्याच्या दृष्टीने सुध्दा जड पाणी अहितकारक राहते. अशा पाण्यामुळे माणसाच्या किडनीवर सर्वात जास्त विपरित परिणाम जाणवतात.

हे जड पाणी जेव्हा गरम केले जाते त्यावेळी भांड्याच्या आत हे क्षार घनरूपात जमतात. यामुळे कारखान्यातील बॉयलरवर त्याचे फारच वाईट परिणाम जाणवतात. जड पाणी जेव्हा लोखंडी पाईप मधून वाहते त्यावेळी पाईपच्या आतील बाजूस हे क्षार जमतात व पाईप आतल्या बाजूने कुजायला लागतो व त्याची पाणी वाहून नेण्याची शक्ती हळूहळू क्षीण बनत जाते व शेवटी ते पाईप निकामी होतात.

कारखान्यांच्या दृष्टीने तर हे जड पाणी अत्यंत संकटकारक ठरते. या जडत्त्वाचा कामाच्या तासांवर त्याचबरोबर उत्पादनाच्या परिमाणावर विपरित परिणाम होतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो व भांडवली स्वरूपाच्या दुरूस्त्या बरचेवर कराव्या लागतात. यंत्रांची कार्यक्षमता कमी होते व बरेचदा ती बदलण्याची पाळीही कारखान्यांवर येवू शकते.

यावर उपाय म्हणून अमेरिकेतील स्केल कॅचर नावाच्या कंपनीने पाण्याचे जडत्त्व कमी करण्याचे एक उपकरण बाजारात आणले आहे. यामुळे जड पाण्यातील क्षारांची शक्ती निष्क्रिय केली जाते व यंत्रणेवर कोणताही विपरित परिणाम न होता जड पाण्याचे मृदू पाण्यात रूपांतरण केले जाते. हे उपकरण वापरायला अत्यंत सोपे आहे. यात नळांच्या जोडण्यांना हातही न लावता हे उपकरण बसविले जाऊ शकते. कारखान्यात पाणी आणणाऱ्या पाईपला पाईपच्या वरून एक वायर गुंडाळण्यात येते व या वायरची दोन्ही टोके या उपकरणाला जोडली जातात. या वायरमधून विजेचा प्रवाह सोडला जातो. सेकंदाच्या हजाराव्या भागात हा प्रवाह उलटसुलट बदलतो व त्यामुळे पाईपमध्ये एक चुंबकीय क्षेत्र Magnetic field) निर्माण होते व त्याचा परिणाम म्हणून पाण्यातील क्षारांना निष्क्रिय बनविले जाते. हे क्षार पाईपच्या आतील बाजूला चिकटणे बंद होते. एवढेच नव्हे तर पाईपला आधीच चिकटलेले क्षारसुध्दा निष्क्रिय होवून पाण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो.

रासायनिक उद्योगात, प्लॅस्टिक तयार होणाऱ्या कारखान्यात, कागद कारखान्यात, जहाज उद्योगात, तेल कारखान्यात, सिमेंट कारखान्यात, साखर कारखान्यात एवढेच नव्हे तर शेती कसतांनासुध्दा ही उपकरणे फारच उपयुक्त ठरली आहेत. ज्याठिकाणी बॉयलर्स व कूलिंग टॉवर्स यांचा वापर होतो तिथे ही उपकरणे विशेषत: जास्त उपयुक्त झाली आहेत.

या यंत्राच्या वापरापासून फायदे :


1. हे उपकरण बसवायला अत्यंत सोपे आहे.
2. पाईपची तोडफोड करण्याची आवश्यकता नाही.
3. या उपकरणासाठी कोणतीही रसायने लागत नाहीत.
4. या उपकरणाला कोणतेही मेनटेनन्स लागत नाही.
5. येणारा खर्च अत्यंत नाममात्र.
6. उपकरणाची किंमत अत्यंत कमी काळात वसूल.
7. पर्यावरणाशी कोणतेही शत्रुत्व नाही.
8. इतर भांडवली गुंतवणूकीचे आयुष्य वाढविते.
9. कारखान्याच्या उत्पादनातील अडथळे कमी होतात.
10. उपकरणात कोणताही बिघाड संभवत नाही.
11. कूलींग टॉवर्स मध्ये पाण्याची 50 टक्के बचत.
12. उपकरणांवर विजेचा खर्च अत्यल्प.
13. विजेचा व कारखान्यातील लोखंडी उपकरणांचा कोणताही संबंध येत नसल्यामुळे शॉक बसत नाहीत.

या उपकरणाचा वापर कोणत्याही जलवाहक पाईपवर करता येतो. मग तो पाईप लोखंडी असो अथवा तांब्याचा, प्लॅस्टिकचा अथवा काचेचा सुध्दा असू शकतो. पाईपचा घेर 1 इंचापासून 80 इंचापर्यंत असला तरी चाललो. अर्थात त्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेचे स्केलवॉचर उपकरण बसवावे लागते. हे उपकरण घरगुती पाण्याच्या वापरापासून तर वेगवेगळ्या औद्योगिक संस्थांच्या गरजा पूर्ण करते. घरगुती वापरासाठी जे उपकरण वापरले जाते त्याची किंमत दहा हजाराच्या आतच आहे. कारखान्यात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे उपकरणाची किंमत जास्त असली तरी तिचा लाभ लक्षात घेता दीर्घ काळात ती स्वल्प ठरते. संपूर्ण जगात या उपकरणाचा वापर केला जातो. भारतात या उपकरणाची एजन्सी अेबी डायकेम सिस्टिम्स प्रा.लि या कंपनीकडे असून त्यांचेशी www.abdiachem.com या वेबसाईटवर संपर्क साधला जाऊ शकतो.

सम्पर्क


श्री. दीपनारायण मैंदर्गीकर, सोलापूर

Path Alias

/articles/paanayaataila-jadapanaa-kamai-karanaarae-upakarana-sakaelavaocara

Post By: Hindi
×