पालथ्या घागरीवर पाणी


पृथ्वीचे उदररूपी घागर रिकामी होते आहे. ती आपल्याला पुनर्भरणाद्वारा भरायला हवी हा विचार पटत होता पण कृतीतून उतरत नव्हता! किंबहुना पृथ्वीच्या उदरातील पाण्याचे साठे हीच भविष्यातील धरणे असतील! बांधकामाचा खर्च नाही आणि पाणी बाष्पीभवनाने उडून जाण्याचा धोका शून्य. असो. पाण्याबद्दल इतकी सामाजिक उदासीनता? स्वत:च्या अंगणात आणि गच्चीवर पडणाऱ्या पाण्याचा स्वत:लाच फायदा होणार आहे इतका स्वार्थी हेतू असूनसुध्दा!

मराठी विज्ञान परिषद, औरंगाबाद विभाग आणि बाएफ ही पुण्याची संस्था अशा संयुक्त विद्यमाने असं ठरलं की कमीतकमी दहा आणि जास्तीतजास्त पंन्नास घरांसाठी जल पुनर्भरण करणारी यंत्रणा प्रत्यक्ष उभी करून द्यायची. दहा घरांना प्रत्येकी रू. 2500/- देता येतील इतकी आर्थिक तरतूद आम्ही केली होती. प्रकल्प असा होता की प्रथम या संबंधी एक कार्यशाळा घ्यायची (चर्चासत्र नव्हे!) आणि लगेचच या यंत्रणेची पाहणी करण्यासाठी त्या स्थळाला भेट द्यायची.

50 लोक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. सगळा कार्यक्रम पार पडला आणि मोठ्या आशेने लोकांकडून प्रतिसादाची वाट बघच बसलो. मग मीच या सर्वांना फोनवरती विचारणा केली. आठवण करून दिली पण 'पालथ्या घड्यावर पाणी'. पृथ्वीचे उदररूपी घागर रिकामी होते आहे. ती आपल्याला पुनर्भरणाद्वारा भरायला हवी हा विचार पटत होता पण कृतीतून उतरत नव्हता! किंबहुना पृथ्वीच्या उदरातील पाण्याचे साठे हीच भविष्यातील धरणे असतील! बांधकामाचा खर्च नाही आणि पाणी बाष्पीभवनाने उडून जाण्याचा धोका शून्य. असो. पाण्याबद्दल इतकी सामाजिक उदासीनता? स्वत:च्या अंगणात आणि गच्चीवर पडणाऱ्या पाण्याचा स्वत:लाच फायदा होणार आहे इतका स्वार्थी हेतू असूनसुध्दा! विशेष म्हणजे प्रत्येकी 2500 /- रूपये प्लंबर सकट देणार असून सुध्दा! साधारण 1400 चौरस फूट क्षेत्रफळाच्या गच्चीसाठी विंधन विहिरीत जलपुनर्भरण यंत्रणेसाठी सरासरी रू.2500/- लागतात हा आमचा अंदाज. बहुमजली इमारतींना तर येवढ्या पैशात लाभधारकांची संख्या जास्ती असणार होती. पैसा उपलब्ध परंतु प्रतिसाद ठप्प अशी परिस्थिती होती.

निराश न होता घरोघरी जाऊन, प्रामुख्याने मित्रांना, पटवून द्यायला सुरूवात केली. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. या यंत्रणेचा आम्हाला फायदा काय? यंत्रणा बसवून सुध्दा पाणी वाढलच नाही तर ? तीन बोअर्स फुकट गेले आता त्यात पाणी ओतून काय होणार आहे ? या पाण्यातून घरात रोगराई पसरली तर ? ............

नको मिळू देत मला यातून पाण्याचा थेंबसुध्दा, पण मी यामुळे पृथ्वीच्या उदरातील पाण्याचे साठे वाढायला हवेत. असा व्यापक विचार आम्ही कधी करणार आहोत ? सामाजिक जलनिरक्षरतेचं हे विशाल दर्शन ! महापालिकेने नवीन बांधकामासाठी सक्ती केली म्हणून माझ्याकडे दोन घरमालक आले सल्ला घेण्यासाठी. प्रत्यक्ष जागेची पाहाणी करून त्यांनी आराखडा काढून दिला. कंम्प्लीशन सर्टिफिकेट साठी यंत्रणा उभी केली आणि काम होताच ती यंत्रणा तेथून अदृश्य झाली? तर म्हणे अशा यंत्रणा भाडेतत्वावर काही काळासाठी उभ्या करून देण्याची सोय बाजारात उपलब्ध आहे ! आता मात्र मला ʅकर्मदरिद्रीʆ या शब्दाचा अर्थ उमगला.

काय आहे ही यंत्रणा ?


यात प्रामुख्याने दोन बाबींचा विचार केला जातो.

1. उघड्या जागेवर पडणाऱ्या पाण्यासाठी काय करायचं ? आणि
2. घराच्या गच्चीवर पडणाऱ्या पाण्यासाठी काय करायचं? या दोन्ही यंत्रणा तांत्रिक दृष्ट्या अत्यंत साध्या आहेत.

1. प्लॉटवरच्या उघड्या जागेसाठी :


⧫ चारही बाजूच्या उघड्या जागेवर फरशा बसवतांना त्याचा उतार विंधन विहीर असलेल्या मागच्या बाजूला द्यावा.

⧫ बंगल्याच्या गॅरेजला जी पत्र्याची शेड केली जाते त्याचा उतार मागच्या बाजूला असावा, रस्त्याच्या दिशेने नसावा.

⧫ प्लॉटवरील उघड्या जागेत पडणारे पाणी घराच्या मागील बाजूस उतारावरून वाहात जाईल असे बघावे.

⧫ मागील बाजूला वाहून आलेले पाणी फरशीवर साचू न देता ते मातीत मुरेल असे बघावे.

⧫ यासाठी ते सर्व पाणी 5 -6 घनफूटाचा खड्डा करून त्यात मुरवले तर अधिक परिणामकारक होईल.

2. गच्चीवरील पाण्याचे पुनर्भरण :


⧫ गच्चीचे वॉटर प्रुफिंग चांगल्या प्रकारे केलेले असावे.

⧫ गच्ची पावसाळा सुरू होण्यापूर्वी डिटर्जंटने स्वच्छ धुवून घ्यावी.

⧫ धुतलेले पाणी फिल्टरच्या अलिकडून बाहेर पडण्यासाठी स्टॉप कॉक ची सोय करावी.

⧫ पहिल्या पावसाचे पाणी विंधन विहीरीत घेऊ नये.

⧫ गच्चीवर जेवणाचा कार्यक्रम झाल्यावर पाण्याने त्वरित स्वच्छ धुवून घ्यावी.

⧫ पाणी स्टेनलेसस्टीलच्या जाळीतूनच भिंतीवरील पाईपलाईन मध्ये सोडावे म्हणजे कचरा, काड्या, बिया, पाने इ. गाळले जाईल.

⧫ गच्चीस एकाच दिशेने उतार द्यावा म्हणजे पाण्याचे पाईपस् फक्त एकाच दिशेने खाली येतील पर्यायाने पाईपलाईनची लांबी कमी होईल.

⧫ उभ्या पाईपलाईन्स खाली जमिनीलगत एकत्र जोडून त्या ठिकाणी वाळूचा फिल्टर बसवावा.

⧫ जमिनीवरून जाणारी पाईपलाईन पायाने किंवा वाहनांनी तुडविली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.

⧫ पावसाळा संपला की सार्वजनिक ठिकाणी असलेली ही यंत्रणा म्हणजे पाईप्स व फिल्टर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

जलपुनर्भरणाची ही यंत्रणा राहत्या घरांव्यतिरिक्त पंचतारांकित हॉटेल्स, फ्लायओव्हर्स, शाळा, महाविद्यालये, कार्यालये अशा ठिकाणी उभी करता येते. यातूनच धरणीमातेच्या उदरातील घागरी भरू शकतील.

मराठी विज्ञान परिषदेने 10 घरांवरती उभी केलेली ही यंत्रणा म्हणजे जलसाक्षरतेच्या पूल बांधणीतला खारीचा वाटा आहे.

डॉ. रंजन गर्गे, औरंगाबाद - (भ्र : 9822634442)

Path Alias

/articles/paalathayaa-ghaagaraivara-paanai

Post By: Hindi
×