नेवासा ते पैठण जलदिंडी


पाण्याचे महत्व पटवून देणारा अनोखा उपक्रम, बोटींच्या आधारे गोदावरी प्रवास

पाण्याचे प्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. ज्याचा पर्यावरणासोबतच मानवी जीवनावरही विपरित परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर पाण्याच्या प्रदूषणाविषयी प्रबोधनाद्वारे मात करता यावी या उद्देशाने विविध संस्थांच्या सहयोगाने नेवासा ते पैठण दरम्यान दि.29 ते 30 जानेवारी 2013 गोदावरीत जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. नदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी हा उपक्रम हाती घेतला.

औेरंगाबाद..... पाण्याचे प्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. ज्याचा पर्यावरणासोबतच मानवी जीवनावरही विपरित परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर पाण्याच्या प्रदूषणाविषयी प्रबोधनाद्वारे मात करता यावी या उद्देशाने विविध संस्थांच्या सहयोगाने नेवासा ते पैठण दरम्यान दि.29 ते 30 जानेवारी 2013 गोदावरीत जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. नदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी हा उपक्रम हाती घेतला. यामध्ये एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन, जलदिंडी प्रतिष्ठान पुणे, वन्यजीव विभाग, औरंगाबाद, भारतीय जलसंस्कृती मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ अधिकारी, कल्याणकारी संघटना, अ.भा. वारकरी संघ आणि रोटॅक्ट क्लब यांचा या उपक्रमात सहभाग होता.

विशेष म्हणजे नेवासा येथील माऊलींच्या मंदिरातून दिंडीची सुरूवात करण्यात आली तर समाप्ती पैठण येथील नाथ मंदिरात झाली. या उपक्रमास विविध क्षेत्रातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. दिंडीदरम्यान मार्गात येणाऱ्या गावांमध्ये जलसाक्षरतेसंबंधी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

जलदिंडीचा प्रवास :


दि. 29 जानेवारी रोजी सकाळी नेवासा येथील माऊलींच्या मंदिरातून दिंडीची सुरूवात झाली. त्यानंतर नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संकुल येथे डॉ. दिलीप यार्दी, डॉ. येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रवरासंगम ता. नेवासा येथून जलदिंडीला सुरूवात झाली. सहा बोटींमध्ये सुमारे 30 स्वयंसेवक सहभागी झाले. तसेच 30 स्वयंसेवकांनी नदीवर येणाऱ्या गावांमध्येे विविध कार्यक्रम सादर केले. सायंकाळी 5 वाजता दहेगाव ता. शेवगाव येथे दिंडीचा मुक्काम झाला. या ठिकाणी दिंडीतील स्वयंसेवकांनी गावकऱ्यांशी पाण्यासंदर्भात संवाद साधला. दि. 30 जानेवारी रोजी सकाळी दिंडीला प्रारंभ झाला. दुपारी 1 वाजता दहीफळ ता. शेवगाव. येथे दिंडीचा मध्यांतर झाला. त्यानंतर जलदिंडी पैठणच्या दिशेने मार्गस्थ झाली.

सायंकाळी 5 वाजता दिंडीचे पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात आगमन झाले. मंदिर परिसरात पायी दिंडी काढण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. समारोप समारंभा प्रसंगी पाण्यासंदर्भात निबंध, चित्रकला, पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. मोरवंचीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पाण्याचे पावित्र्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जलदिंडी उपक्रमासाठी डॉ. दिलीप यार्दी - औरंगाबाद, डॉ. विश्वास येवले-पुणे, डॉ. दत्ता देशकर - पुणे, डॉ. कुटे-श्रीरामपूर, डॉ. शिवाजी सांगळे विद्यापीठ - औरंगाबाद, प्रा.डॉ. रमेश पांडव - औरंगाबाद, डॉ. चाकूरकर - पैठण, बापूसाहेब भोसले - शेवगाव, प्राचार्य डॉ. मतकर - शेवगाव, प्रवीण जोशी - औेरंगाबाद. प्रा. म्हसके - अहमदनगर, ह.भ.प.शिवाजी देशमुख महाराज - नेवासा, शंकरराव लोखंडे - नेवासा, पंचशिल दिघे, बि.यु.पाठक, प्रियंका पुराणिक, किरण काळे, राहुल पाटील, वैशाली ठाकूर, विशाखा राय, संतोष आदमाने, शंतनु चौधरी, अमृता मुळे, वर्षा गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

डॉ. दिलीप यार्दी, औरंगाबाद

Path Alias

/articles/naevaasaa-tae-paaithana-jaladaindai

Post By: Hindi
×