जलवारकरी


पुंडलीक वरदे हरि विठ्ठल..... गजर झाला
नावा लवकरच काठाला लागणार होत्या. हा हा म्हणता 450 कि.मी. चे अंतर कापून नदीमार्गाने आम्ही कुठून कुठे आलो होतो. नुकतीच नाव पुढे गेल्याने तिच्या मागे निर्माण झालेल्या लाटेकडे नजर गेली. आमच्या प्रवासाच्या अस्तित्वाच्या खुणा कुठेही जाणवत नव्हत्या. या मार्गाने कोण कोण आले असेल ?

जलवारकऱ्यांमध्ये एकच जल्लोष उडाला. बारा दिवस ऊन, वारा, पाऊस, उजनी धरणातील महाकाय लाटा यांना सोसत जलवारकरी त्यात युगे अठ्ठाविस कडेवर हात ठेवून, मंदस्मित करत भक्ताची वाट पाहत तीष्ठत उभा असलेला, अवघ्या विश्वाचा पालनकर्ता, पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी आला होता.

ज्ञान पीठाकडून महायोग पीठा कडचा हा प्रवास दरवर्षी 11 दिवस न चुकता परंपरेच्या सकारकतेने विद्येचे स्थळ असलेल्या विठ्ठलाच्या स्वरूपाचे विविध पध्दतीने त्याच्या स्वरूपाचे वर्णन केलय..

हरिचीया दासा हरि दाही दिशा।

असे संत वचन आहे.


जलदिंडीच्या प्रवासातून तशी दृष्टी विकास पावावी, प्रत्येक जीवच त्या विठ्ठलाच स्वरूप व्हावं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म याच्या विचारांना घेत जलदिंडीचा प्रवास होतो.

मी कोण ? समाजाशी माझे काय नाते ? पर्यावरणा बरोबर माझा काय संबंध ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जलदिंडीच्या या प्रवासात मिळतील. अन् त्याच्या शिवाय नदी संवर्धनाचा जो जागर आपण मांडला आहे तो तरी कसा पूर्णत्वास जाणार.

आणि म्हणून जलदिंडी हे जलसंवादचे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. जल म्हणजे जीवन आणि त्यामुळेच हा जीवनाचा संवाद आहे.

ज्या पाण्याच्या संवर्धनासाठी अनेक ज्ञानयोगी, कर्मयोगी प्रयत्नशील आहेत. त्या पाण्याचे संवर्धन जीवनाशी झालेल्या संवादाशिवाय कसे शक्य आहे ? परंपरेची 750 वर्षांहून जुनी वीणा जलदिंडीने आपल्या गळ्यात घेवून हा जागर मांडला आहे.

या जागरात समाजातील देवाण घेवाण होते. कोण पर्यावरणाचा अभ्यास करत तर कोण समाजशास्त्राचा, कोण जैववैविध्याचा करतं तर कोण राजकारणाचा !

आणि या सर्वातून येथे येणारा जलवारकरी जीवनशास्त्र शिकतो. म्हणजे जीवनाचे शिक्षण घेतो. लहान मोठे पणाचे सर्व भेद गळून पडतात. स्वत:ची ओळख 'जल' अशी होते. वेगळे असे म्हणता येत नाही. या सृष्टीतील प्रत्येक जीवाला त्या जलाचीच ओळख

पाण्याशी मैत्री, पाण्यावर भक्ती
जलसंवर्धन हीच जीवन शैली ।।

होवून बसते.


अशा मार्गाने मी आलो होतो ओळखी शिवाय मैत्री नाही आणि मैत्री शिवाय भक्ती नाही. आम्ही जल भक्त झालो होतो. ज्ञानाची ओढ ठेवणारं मन आता म्हणू लागल होतं ...

भक्ती प्रेमा विन, ज्ञान नको देवा।।

होणारं कर्म स्वत:साठी होतं. स्वत:च्या आनंदासाठी. कुणी त्याला वंदावे किंवा निंदावे याची पर्वा उरलीच नाही. कारण ज्ञानाबरोबर भक्ती आणि प्रेमाचा विवेक लक्षात आला. विवेक म्हणजे काम हेही समजलं. त्यामुळे शहरातील लोक नदीचे प्रदूषण करतात. म्हणून चिडणारे मन त्यांना जल मैत्रीचे आवाहन करू लागले, प्रत्येकाने येथे यावे.

यारे यारे लहान थोर । याती मलती नाही नर ।।

पाणी ही सर्व समाजाला जोडणारी एक नाळ आहे. तिच्या संवर्धनासाठी आपण एकत्र आले पाहिजे. हे काम अवघड आहे परंतु अशक्य नाही.

ओले मुळ भेदी खडकाचे अंग ।
अभ्यासासी सांग कार्य सिध्द ।।

महाराष्ट्रातील विविध नद्यांवर आता जलदिंडीचा उपक्रम सुरू झाला आहे. लोक नद्यांवर येऊ लागली आहेत. पाण्याशी नातं निर्माण होवू लागले आहे. घरा घरात जलदिंडी पोहचू लागली आहे. प्रत्येक जण आता जलवारकरी होवू लागला आहे. स्वत:ने स्वत:त घडवून आणलेले हे बदल भविष्यातील आव्हानांना आव्हान देणारे ठरत आहे. त्यासाठी आव्हाने बदलली जाणार नाहीत. हे आता आमच्या लक्षात आले आहे. मुळ ओळखी नुसारच आता कर्म होणार आहे.

कोण संगणक तज्ज्ञ आहे, तर कोण अभियंता, कोण वैद्य तर कोण शिक्षक, कोण प्रशासक तर कोण विद्यार्थी, कोण समाजकार्यकर्ता, परंतु या सगळ्या ओळखीच्या पलिकडची मूळ ओळख म्हणजे जलवारकरी, अकरा शेतांचा शेतकरी... (नावाडी)

शेताची मशागत करून दर अकराव्या दिवशी विठ्ठलाची, विद्येची, ज्ञानाची उपासना करणारा.... ही मूळ ओळख... त्याचं स्वरूप शोधतात जलवारकरी... जलदिंडीवर प्रवास कर्ता झाला आहे.

श्री. अजित मालुंजकर, पुणे - मो : 9922269617

Path Alias

/articles/jalavaarakarai

Post By: Hindi
×