देवपाल-वडेवस्ती
देवपाल-वडेवस्ती
पाणीटंचाईचे जोखड झुगारणारी
Posted on 11 Nov, 2016 11:51 AMवेल्हे : ऐतिहासिक तोरणा व राजगड किल्ल्याच्या मधोमध डोंगर रांगांच्या कुशीत लपलेली देवपाल-वडेवस्ती ही वेल्हे तालुक्यातील एक चिमुरडी वस्ती आहे. जेमतेम शंभर एक लोकसंख्या असणारी ही वस्ती मेट पिलावरे या ग्रामपंचायतीमध्ये मोडते. मेट पिलावारे व पाल खुर्द या दोन गावांच्या बेचक्यात ही वस्ती वसलेली आहे.