वहात्या नद्या वस्तुस्थिती काय दर्शवते


हे एवढे वर्णन एवढ्यासाठी की नगर येथे अधीक्षक अभियंता, नगर पाटबंधारे मंडळ कार्यरत असताना भंडारदरा धरण माझ्याच कार्यक्षेत्रात होते. मोठ्या हौसेने संगमनेर मुक्कामी प्रवरा नदीचे दर्शन घेण्यास गेलो तर एक लांबच लांब वालुकामय वाळवंट दृष्टोपत्तीस आला व लांबून कोठूनतरी प्रवरा वनदीच आक्रोशाने आपल्या व्यथा व्यक्त करीत आहे का असा भास झाला.... आणि हो काही कवी कल्पना नाही तर वास्तवाचे विदारक चित्र !

थोडा पूर्व इतिहास :


शुष्क नद्यांचा आक्रोश हा विषय कानावर पडला आणि नद्या बाबतचा भारतीय इतिहास डोळ्यांसमोरून सरकत गेला. आकाशातून गंगा नदी भूतलावर झेपावत आहे आणि भगवान शिवशंकारांनी आपल्या जटेत सामावून घेतले व समस्त मानवांसाठी पाणी, नव्हे जीवनच जणू बहाल केले आहे हे चित्र सर्व भारतीयांचे हृदयातच कोरले गेले आहे. राजा भगीरथाचे भगीरथ प्रयत्नाने गंगा नदी वळवून हजारो वर्षांपूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर दूर केले हे त्या चित्राचे मूर्त स्वरूप ! गेले हजारो वर्षे आपण हा आदर्श थोड्या फार फरकाने आपल्या देशात गिरविला आणि म्हणूनच भारत देश सर्व जगात सुवर्ण भूमी म्हणून पुढे आला व येथे सुवर्ण धूर निघतो असा जगभर दबदबा निर्माण झाला. लॉर्ड मेकॉले यांनी 2 मे, 1835 साली ब्रिटीश पार्लमेंट मध्ये म्हटले .... मी भारतामध्ये कन्याकुमारी पासून श्रीनगर, कलकत्ता ते मुंबई पहाणी केली, तो देश समृध्द , सुजलाम सुफलाम असून लोक बुध्दिवान व तर्तुत्ववान आहेत... तेथे मला एकही भिकारी दिसला नाही... त्याच्यावर राज्य करायचे असल्यास त्यांचा बुध्दीभ्रंश करून त्यांना गुलाम केले तरच आपण त्यांच्यावर राज्य करू शकू…

स्वातंत्र्योत्तर काळ :


ब्रिटिशांनी अर्थात त्यांचे राज्य व व्यापार चांगला चालण्यासाठी रस्ते, आगगाडी, टपाल-तार, धरणे (मुख्यत्वे शेती व पिण्याचे पाणी यासाठी) यांना चालना दिली व त्याचा निश्‍चित फायदा आपल्याला झाला. तो पर्यंत अखंड भारत देश आपल्या समोर येत नव्हता. त्या नंतर पाणी हेच जीवन या भावनेतून आपण आपल्या जलसंपत्तीचे योग्य नियोजन व वाटप केले असते तर भारत खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला असता व वंदे मातरम हे राष्ट्रगीत आपल्या देशाचे खरे चित्र सादर करीत आहे असे झाले असते. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेनंतर पाणी हा विषय मध्यवर्ती म्हणून राहिला नाही. प्रगतशील देशासाठी म्हणून जी प्रशासकीय नियमावली आपण कार्यान्वित केली त्यात किमान दर दहा वर्षांनी योग्य ते बदल केले असते तर नद्यांचा आक्रोश आपल्या कानावर न येता तृप्त बहिण / आई घरी आली असे दृश्य दिसले असते.

1975 साली मला ब्रिटिश पब्लिक सर्विस कमिशनचे अधिकार्‍याचे बराबेर चर्चेची संधी मिळाली. आपण त्या काळात पण ब्रिटीश प्रशासकीय नियमावलीचेच पालन करीत आहोत हे समजल्यावर त्यांना खूपच आश्‍चर्य वाटले. भारतासारख्या प्रगतीशील देशाने तर दर दहा वर्षांनी प्रशासकीय नियमावली सुधारित केली पाहिजे असा विचार पण त्यांनी प्रकट केला. अजूनही वेळ गेलेली नाही. चीन सारखा गेश महासत्ता होऊन (...त्यात काय तो प्रजासत्ताक प्रणाली देश थोडाच आहे ? हे तुणतुणे वापरणे आता न थांबविल्यास तार तुटायची वेळ येतील) थ्री गोर्जेस सारखा भव्य नद्या जोड प्रकल्प अंदाजे वीस लाख प्रकल्प ग्रस्त लोकांचे पुनर्लसन करून पुरा करीत आणला आहे. मग आपल्या देशातील नद्यांवर आक्रोश करण्याची पाळी का आली या प्रश्‍नाला एक उत्तर असेही वाटते की तीव्र इच्छा शक्ती, काटेकोर , कालबध्द कार्यक्रम व नियोजनाचा गेले 60 - 65 वर्षे दिसलेला काहीसा अभाव.... सर्व भारत वासीयांनी एकत्रितपणे विचार करण्याची ही बाब आहे.

वहात्या नद्या आटण्याच्या मागील काही समर्पक कारणे :


सर्व स्थारातील वाचक समूह लक्षात घेता एखाद्या माहितीतील नदीचे उदाहरण समोर ठेवून विश्‍लेषण करणे जास्त योग्य होईल असे वाटते. 1954 साली माझे वडील एक पोलीस अधिकारी म्हणून संगमनेर जिल्हा नगर येथे कार्यरत असताना मी तेथील पेटीटमाध्यमिक शाळेत शिकत होतो. त्या दरम्यान एका लग्नानिमित्ते वाई येथे जावे लागले. तेथील कृष्णी नदीत धोम क्षेत्र ठिकाणी स्नानास गेलो असताना डोहात बुडून वर जायची पाळी आली होती ! संगमनेर ला परत आल्याआल्या तेथील अतिशय निर्मल, पवित्र अशा प्रवरा नदीत पोहण्यास शिकून तेथील केशवतीर्थ डोहात सूर मारून 150 - 200 फूट रूंद नदी पात्रातून जेव्हा नदी पार केली तेव्हा कृतकृत्य वाटले !

हे एवढे वर्णन एवढ्यासाठी की नगर येथे अधीक्षक अभियंता, नगर पाटबंधारे मंडळ कार्यरत असताना भंडारदरा धरण माझ्याच कार्यक्षेत्रात होते. मोठ्या हौसेने संगमनेर मुक्कामी प्रवरा नदीचे दर्शन घेण्यास गेलो तर एक लांबच लांब वालुकामय वाळवंट दृष्टोपत्तीस आला व लांबून कोठूनतरी प्रवरा वनदीच आक्रोशाने आपल्या व्यथा व्यक्त करीत आहे का असा भास झाला.... आणि हो काही कवी कल्पना नाही तर वास्तवाचे विदारक चित्र ! आता अशी परिस्थिती तेथे का निर्माण झाली हे जाणून घेणे महत्वाचे ठरले. ही आतात स्थानिक बाब राहिली नसून सर्वसाधारण पणे हीच परिस्थिती सर्वत्र दिसते. वाढते शहरीकरण, उद्योगधंदे, नदी कालवा पाणीसाठा जणू आपली खाजगी मालमत्ता आहे असे समजून त्यातून बेकायदेशीर पाणी उचल ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम वरील बिकट परिस्थितीस कारणीभूत असावा असे म्हणता येईल.

सद्य परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही उपयुक्त मार्ग :


1. पुणे शहराची वाढ काही वर्षात इतरी झपाट्याने वाढली आहे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली आहे. असे काही ऐकले की मती गुंग होते. जर पाणी, वीज सांडपाणी, रस्ते ह्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर प्रगत देशांना तर ते काहीच अवघड नाही. वरील सर्व बाबी ह्या तेथे जीवनावश्यक समजल्या जातात आणि म्हणूनच शहरवासी सामान्य जीवन आनंदाने जगू शकतात. शहरीकरण नियोजनाचा नगर नियोजन खात्याचा हिरवा कंदील मिळाल्या नंतरच बांधकाम चालू व्हावे, नदी नाल्यात अवैध बांधकामास बंदी साठी कडक कायद्याची गरज. मोठ्या शहरातील जमीनी खालील पाणी वाटप नळजोडणी नेहमी / नीटस पणे कार्यान्वित असावी.

2. शहरासाठी लागणार्‍या पाणी पुरवठा या बाबत जरूर तो मंजूर करार असावा व त्याप्रमाणे पाणी वाटप व्हावे. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, उद्योगधंद्यासाठी लागणारे पाणी याचे प्रचलित नियमानुसार विभाजन आखून वर्षभरासाठी कालबध्द कार्यक्रम असावा.

3. आयोग / कोर्ट यांचे आदेशानुसार जर सर्व प्रकल्प पूर्ण करण्यास निधी उपलब्ध नसल्यास वा कालमर्यादा असल्यास आधी पाणी साठा करण्यास प्राधान्य देणे जरूरी होईल .देशातील जवळ जवळ 45 टक्के ते 50 टक्के पावसाचे पाणी व वापरता समुद्रास मिळत आहे. यासाठी नद्याजोड प्रकल्प अग्रक्रमाने होणे गरजेचे. नद्यांचा आक्रोश या मुळे निश्‍चितच कमी होईल.

4. पर्यावरण रक्षक प्रवाह :


धरण होण्याचे अगोदर जर एखाद्या नदीत बारमाही पाणी, थोडका असेना, वाहत असेल, तीर्थ क्षेत्राचे ठिकाणी व इतर काही आवश्यक बाबी साठी जर धरणातून नदीत पाणी सोडण्याची तीव्र मागणी असेल तर त्याचा प्रकल्प नियोजनात समावेश असावा. आजकाल जागतिक पातळीवर अशी मागणी होत आहे. जायकवाडी प्रकल्पाचे वेळी पैठण क्षेत्र साठी असे नियोजन होते.

इं. सुरेश शिर्के, पुणे - (मो: 08275066606)

Path Alias

/articles/vahaatayaa-nadayaa-vasatausathaitai-kaaya-darasavatae

Post By: Hindi
×