वाघाड प्रकल्पस्तरीत पाणी वापर संस्था


वाघाड प्रकल्पाची सिंचन प्रणाली टेल टू हेड अशीच आखणी संस्थांनी केली, त्यामुळे पाण्याचा नाश, पाण्याची चोरी व उधळपट्टीला आळा बसला. शेतकऱ्यांमध्ये पाण्याची जाणीव निर्माण होवून त्याचा वापरही शेतकरी जबाबदारीने करायला लागले. हे असे काम वाघाड प्रकल्पावरील 24 पाणी वापर संस्थांच्या वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेने समाज परिवर्तन केंद्र ओझर, नाशिक, जलसंपदा विभाग, पालखेड पाटबंधारे विभाग, यांनी एकसंघ होऊन केले, त्यातून काम उभे राहिले. हे बघून देश विदेशातील, विविध राज्यातील शेतकरी, अधिकारी, तज्ञ, अभ्यासक ह्यांच्या सतत वाघाड प्रकल्पाला भेटी होऊ लागल्या. त्यांनी घेतलेल्या माहितीच्या अभ्यासातून वाघाड प्रकल्पाला ह्या वर्षी तीन प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले.

वाघाड प्रकल्पाच्या टेलला सिंचन व्यवस्थापनांत लाभधारकांचा प्रत्यक्ष सहभाग ही संकल्पना समाज परिवर्तन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष व स्वातंत्र सैनिक, कृतिशिल समाजवादी नेते बापू उपाध्ये यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली. त्यातून ओझरला तीन पाणी वापर संस्थांची स्थापना झाली. शासनाकडून घनमापनाने पाणी मोजून घेवून त्याचे समान वाटप करावे व उपलब्ध पाण्याचा वापर सुयोग्य, सुनियंत्रीत व काटकसरीने करावा हा विचार शेतकऱ्यांच्या मनात रूजविला. त्यातून सिंचन क्षेत्र तर वाढले, लाभार्थी शेतकऱ्यांचे उत्पन्न व देशाचे उत्पादनही वाढून शेतकऱ्यांचे जिवनमानही उंचावले. ओझरचा प्रयोग यशस्वी होवून त्याचा प्रचारही शेतकऱ्यांमध्ये झाला.

त्यातून वाघाड प्रकल्पावरील इतर शेतकरी संघटीत होवू लागले व त्यांच्यामध्ये नवा विश्वास निर्माण झाला. पाण्याची जाणीव तयार होवून सिंचन व्यवस्थापन जबाबदारीने आपण करू शकतो असा विश्वास त्यांचेमध्ये तयार झाला. पाणी वापर संस्था ग्रामीण विकासाचे एक नवे हत्यार शेतकऱ्यांच्या हाती मिळाले. हे लक्षात घेवून संपूर्ण वाघाड धरणांवरील लाभार्थी शेतकरी संघटीत झाले. त्यांनी 24 पाणी वापर संस्था स्थापन करून 10 हजार हेक्टर क्षेत्रासाठी संपूर्ण धरणांचे सिंचन व्यवस्थापनांसाठी शासनाकडून ताब्यात घेण्याचा नवा अध्याय सुरू केला. ही घटना अनेकांना आश्चर्यकारक तर होतीच परंतु आव्हानात्मकही होती. 24 तास पाणी वापर संस्थांचा मिळून वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था स्थापन करून शेतकऱ्यांनी हे आव्हानात्मक काम स्वत: होवून जबाबदारीने आपल्या अंगावर घेतले. सर्व बाजूने अनेक प्रकारच्या सुचना/ भिती/अविश्वास ह्यावर मात करून ह्या पाणी वापर संस्थांनी आपल्या भागातील, गावातील विकासाचे काम करण्याची चळवळ उभी केली.

जलसंपदा विभागाकडून सन 1989 - 90 पर्यंत 10 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सर्व साधनांचा वापर करूनही मोठ्या प्रयत्नानेही 1 हजार हेक्चटर सिंचन होवू शकत होते. सिंचन व्यवस्थापनात, लोक सहभागातून 1760 हेक्टर सिंचन होवू लागले. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपापली जमीन विकसीत करून परंपरागत पीक रचना बदलून द्राक्ष, डाळीब, फुलशेती निर्यातक्षम भाजीपाला, गहू, सोयाबीन ह्या प्रकारची शेती करायला प्रोत्साहित झाले. त्यातूनच उत्पादन व उत्पन्न वाढीला चालना मिळाली. लाभार्थी शेतकऱ्यांना काटकसरीने पाण्याचा वापर झाल्याने एड्ढ नवा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला व म्हणूनच वाघाड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांत शेतकऱ्यांनी स्वत: होवून पॉली हाऊस संरक्षीत फुलशेती, शितगृहे, वायनरी, इमोपालन, बेदाणा असे आधुनिक तंत्राचा वापर करून उद्योग सुरू केले.

सन 1991 - 92 मध्ये ह्या शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न हेक्टरी 2500 - 2700 रू. होते आता शेतकरी सरासरी 1 लाख 25 हजार रू. उत्पन्न घेवू लागले.

टेलचे शेतकरी त्यावेळी रोजगार हमीच्या कामावर किंवा इतर प्रकल्पावरील शेतकऱ्यांकडे शेतमजुरी करण्यास जायचे. आता हे शेतकरी बाहेरून मजूर आणून चांगली शेती करतात.

शेतमजूरांची स्थिती तर फारच वाईट होती. सन 1990-91 मध्ये शेतमजूरांना वर्षातून सरासरी दोन - तीन महिने काम मिळत होते, आता सिंचन क्षेत्र वाढून व पीक पध्दती बदलल्याने त्यांना वर्षातून किमान 8-9 महिने काम मिळत आहे.

शासनास सन 1993 - 94 पर्यंत सिंचनातून केवळ 1 लाख 75 हजार रू. महसुल मिळत होता अशी माहिती उपलब्ध आहे. लोकसहभागातून व सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थांकडे हस्तांतरण झाल्यानंतर 24 तास पाणी वापर संस्था शासनास दरवर्षी किमान 25 ते 27 लाख रूपयांचा महसुल म्हणून देत आहेत व शासनाची कोणत्याही प्रकारची थकबाकी ठेवत नाहीत. उलट नियमाप्रमाणे भरलेल्या पाणीपट्टीतून 50 टक्के परतावा शेतकरी घेत आहेत.

खरीप व रब्बीत पाण्याचा सुयोग्य, सुनियंत्रित व काटकसरीने पाण्याचा वापर करून शिल्लक राहिलेले, बचत केलेल्या कोट्यातील पाणी उन्हाळी हंगामासाठी राखून ठेवण्याची तरतूद ह्या पाणी वापर संस्थांनी केली, वाघाड प्रकल्प आठमाही परंतु सिंचन बारमाही हा नवा आदर्श महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी निर्माण केला.

वाघाड प्रकल्पाची सिंचन प्रणाली टेल टू हेड अशीच आखणी संस्थांनी केली, त्यामुळे पाण्याचा नाश, पाण्याची चोरी व उधळपट्टीला आळा बसला. शेतकऱ्यांमध्ये पाण्याची जाणीव निर्माण होवून त्याचा वापरही शेतकरी जबाबदारीने करायला लागले.

हे असे काम वाघाड प्रकल्पावरील 24 पाणी वापर संस्थांच्या वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेने समाज परिवर्तन केंद्र ओझर, नाशिक, जलसंपदा विभाग, पालखेड पाटबंधारे विभाग, यांनी एकसंघ होऊन केले, त्यातून काम उभे राहिले. हे बघून देश विदेशातील, विविध राज्यातील शेतकरी, अधिकारी, तज्ञ, अभ्यासक ह्यांच्या सतत वाघाड प्रकल्पाला भेटी होऊ लागल्या. त्यांनी घेतलेल्या माहितीच्या अभ्यासातून वाघाड प्रकल्पाला ह्या वर्षी तीन प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले.

या विषयी पत्रकार मित्रांशी संवाद करावा व या यशस्वी प्रयोगाची माहिती आपल्या मार्फत सर्व दूर मिळावी. शेतकऱ्यांनी त्यांचे भागातील सिंचन व्यवस्थापन आपल्या हाती घ्यावे.

1. I.C.I.D. ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा WATSAVE ANNUAL AWARD - 2009 FOR Innovative Water Management चा पुरस्कार चेअरमन चंद्र ए. मद्रामुट्टु आय.सी.आय.डी. यांचेकडून दि.10.12.2009 रोजी 60 व्या इंटरनॅशनल एक्झीक्युटीव्ह कौन्सील, नवी दिल्ली येथे प्रदान केला.

2. CII (Confedration of India Industry) हैद्राबाद या संस्थेचा Excellence in Water Management - 2009 चा पुरस्कार श्री.एल.एस.गणपती चेअरमन नॅशनल अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन वॉटर मॅनेजनेंट 2009 व श्री.रंगनाथ एन.के.चेअरमन वॉटर मॅनेजमेंट कौन्सील गोदरेज जी.बी.सी. यांच्या हस्ते दि.10.12.2009 रोजी हैद्राबाद येथे प्रदान केला.

3. राष्ट्रीय उत्पादकता परिषद नवी दिल्ली या संस्थेचा द्वितीय सर्वोत्तम उत्पादकता पुरस्कार वाघाड पाटबंधारे परियोजना करीताचा पुरस्कार पाटबंधारे विभागास दि.24.सप्टेंबर 2009 रोजी प्रोफेसर के.व्ही. थॉमस माननीय कृषीराज्य मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान केला.

दोन्ही पुरस्कार वाघाड प्रकल्पास्तरीय पाणी वापर संस्था मोहाडी व तिसरा उत्पादकता पुरस्कार वाघाड सिंचन योजनेला पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांना प्राप्त झाला आहे. वरील तिनही पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे असून वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 24 पाणी वापर संस्था, उचल पाणी वापर संस्था, तसेच लाभधारक शेतकरी यांचे कार्याला निरंतर पाठबळ देणारे आहेत.

महाराष्ट्र शासनानेही महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था अभियान पुरस्कार स्पर्धेच्या राज्यस्तर व प्रादेशिक स्तरावरील पुरस्कारासाठी वर्ष 2009 -10 करीता खालील संस्थांची निवड झाली.

राज्यस्तरीय पुरस्कार : वाघाड प्रकल्प स्तरीय पाणी वापर संस्था, मोहाडी, ता.दिंडोरी, जि.नाशिक ह्या संस्थेला सात लाख रूपयाचा प्रथम पुरस्कार तसेच प्रादेशिक स्तरावर जय योगेश्वर पाणी वापर संस्था, ओझर, ता. निफाड, जि.नाशिक या संस्थेला रू.तीन लाखाचा प्रथम पुरस्कार तर महात्मा ज्योतिराव फुले पाणी वापर संस्थेला रू.दोन लाखचा द्वितीय पुरस्कार दि.26.2.2010 रोजी नांदेड येथे प्रदान करण्यात आला.

समाज परिवर्तन केंद्र, ओझर, ता.निफाड, जि.नाशिक प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये


1. प्रकल्पाचे नाव

वाघाड पाटबंधारे प्रकल्प

2. प्रकल्पस्तरीय संस्थेचे नाव

वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था मोहाडी ता.दिंडोरी. जि.नाशिक

3. मार्गदर्शक सेवाभावी संस्था

समाज परिवर्तन केंद्र ओझर (नाशिक)

4. उपखोरे

कोळवन नदीचे खोरे

5. उपयुक्त पाणीसाठा

2550 द.ल.घ.फु. (72.20 द.ल.घ.मी)

6. वाघाड कालव्यावरील

सिंचन + बिगर सिंचन = एकूण पाणी वापर द.ल.घ.फु 1351 द.ल.घ.मी 38.25

7. सिंचन क्षेत्र

प्रवाही +   उपसा  +  एकूण 6750     989     9642 ठिबक 1903   एकूण 2882

8. कार्यान्वित पाणी वापर संस्था

एकूण संस्था + क्षेत्र प्रवाही 24 + 6750 हेक्टर (उजवा कालवा - 20, डावा कालवा, - 4 ) तसेच कालवा उचल नियोजित संस्था - 21 + 675 हेक्टर

9. कालवा लांबी

उजवा कॅनाल 45 कि.मी. (5100 हेक्टर) डावा कॅनाल 15 कि.मी. (1650 हेक्टर)

10. एकूण शेतकरी कुटुंबे

15926

11. सरासरी जमीनधारणा

0.50 ते 1.00 हेक्टर

12. सरासरी पर्जन्यमान

750 मी.मी. (जरणक्षेत्र पश्चिम भाग)

13. मुख्य पिके

द्राक्षे, फुलशेती, भाजीपाला, कांदा, गहू, सोयाबीन, मका, भुईमूग, भात इ.

14. नवीन उपक्रम

वाघाड अॅग्रीकल्चरल प्रोड्युसर कंपनीची स्थापना

 

समाज परिवर्तन केंद्र, ओझर,ता.निफाड,जि.नाशिक

Path Alias

/articles/vaaghaada-parakalapasataraita-paanai-vaapara-sansathaa

Post By: Hindi
×