स्वच्छता : रासायनिक की जैविक


जैविक शेतीतील विहिरीचे पाणी शुध्द समजावे. त्यात डासांची पैदास न होणे, तांबे न गंजणे हे गुणधर्म आढळतील. गरज पडल्यास 1 मीटर लांब, 1 मीटर रूंद आणि 1 मीटर खोलीचा हौद बांधून त्यात खाली मोठे दगड, मग छोटे गोटे, विटांचे तुकडे आणि सर्वात वर वाळू टाकावी. ह्या जैविक फिल्टरवर बहुविध वनस्पती वाढू द्याव्यात. त्यामुळे हा फिल्टर चोक न होता वर्षावर्षे चालतो आणि तळातून जैविक - स्वच्छ पाणी मिळते. थंड प्रदेशात, जेथे 6-9 महिने वनस्पती वाढू शकत नाहीत, तेथे मात्र नाईलाजाने रासायनिक पध्दत किंवा मेंब्रेन पध्दत वापरावी लागते. भारतात आपण जैविक फिल्टरच वापरणे अधिक चांगले त्यास परत - परत खर्चही येत नाही.

शेती जशी रासायनिक किंवा जैविक असते, तशीच स्वच्छताही रासायनिक किंवा जैविक असू शकते. जैविक म्हणजे निसर्गनियमांचे पालन करून केलेली पध्दती. इंग्रजीत जैविकाला ' इकॉलॉजिकल' हा शब्द योग्य आहे. मधल्या काळात पुढे आलेल्या ' केमिकल ' पेक्षा इकॉलॉजिकल हीच पध्दत आपल्या शेतीस किंवा स्वच्छताप्रणालीस योग्य आहे. ह्या लेखात आपण दोन्ही पध्दतींचे फायदे - तोटे समजून घेणार आहोत.स्वच्छतेची खरी व्याख्या :

■ शहरात नळातून येणाऱ्या ' स्वच्छ ' पाण्यात डेंगी किंवा चिकनगुनिया पसरविणारे डास वाढतात. त्यात ह्या डासांच्या अळ्या वाढण्यास आवश्यक असे अन्न असते. ' अन्नाद् भवन्ति भूतानि ' हे सुभाषित आपण जाणतो. मग हे पाणी खरोखरी स्वच्छ असते का?

ते तर रासायनिक पध्दतीने स्वच्छ केलेले असते. माणसास आजारी पाडून धोक्याची सूचना देणारे डास ज्याअर्थी त्यात वाढतात, त्या अर्थी ते जैविक - दृष्टीने अस्वच्छच असते. रसायनांद्वारे फक्त आपल्या डोळ्यास किंवा नाकास धोक्याच्या सूचना मिळी दिल्या जात नाहीत. थोडक्यात ते ' धोकादायक स्वच्छ ' असते, खरोखर स्वच्छ नसते.

■ पावसाचे पाणी जरी ढगांतून पडताना स्वच्छ असले तरी ते प्रदूषित वातावरणातून खाली पडताना दूषित होते. ह्या वेळी हवा काही प्रमाणात स्वच्छ होत असते, म्हणूनच पाऊस पडून गेल्यावर अशा हवेत बाहेर फिरण्यास गेल्यास बरे वाटते.

पावसाचे पाणी साठविल्यास साधे डास न वाढता डेंगीचे डास वाढतात, ह्याचाच अर्थ आहे की पावसाचे पाणी रासायनिक लॅबोरेटरीला जरी स्वच्छ वाटले तरी ते निसर्गाच्या दृष्टीने 'धोकादायक स्वच्छ' असते.म्हणूनच ते चटकन जमिनीत मुरत नाही.

केवळ जैविकरित्या स्वच्छ केलेले पाणी चटकन जमिनीत मुरते. एका दिवसात 200 मि. मीटर पाऊस क्वचितच पडतो. एवढा पाऊसही खरोखर स्वच्छ असेल तर जमिनीत मुरू शकतो. एरवी हल्ली तर 10-20 मि.मीटरहून जास्त पाऊस झाल्यास लगेच पाणी जमिनीवरून वाहू लागते. मग मातीची धूप होते, पावसाळ्यात पूर येतात, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते.

■ कुठल्याही साठलेल्या पाण्यात डासांची पैदास होते - असे आपण शाळेत शिकतो. परंतु ज्या भागात ' प्रदूषण हेच अन्न ' असे मानून जैविक शेती केली जाते, तेथील विहीरीत ' खरोखर स्वच्छ ' पाणी मिळते. त्यात कितीही दिवस साठविले तरी मलेरिया - डेंगीचे डास वाढत नाहीत. रासायनिक शेती असल्यास मात्र डेंगीचे डास वाढतात.

■ एअर - कंडिशनिंग प्रणालीतून निघणारे गरम पाणी कूलिंग टॉवरमध्ये थंड केले जाते, मग ते परत परत वापरता येते. हे पाणी काही वेळाने जैविक दृष्टीकोनातून अस्वच्छ होते. ते जरी डोळ्यांस / नाकास स्वच्छ वाटले तरी त्यात ' लेजिओनेला ' हे अत्यंत घातक असे ʇजिवंत मांसʈ खाणारे बॅक्टेरिया वाढतात. ते हवेतून लांबवर जाऊ शकतात.

■ सर्व रोगजंतूंना किंवा मलेरिया / डेंगी / चिकनगुनिया पसरविणाऱ्या डासांना त्यांच्या पैदाशीसाठी नायट्रेट हे रासायनिक प्रदूषण हवे असते. WHO ह्या जागतिक स्वच्छता वाढविणाऱ्या संस्थेच्या मानकानुसार (जे आपण विचार न करता पाळतो), पाण्यात 45 ppm पर्यंत नायट्रेट असण्यास हरकत नाही.

परंतु भारतासारख्या गरम प्रदेशात स्वच्छ पाण्याची ही रासायनिक कसोटी तोकडी पडते 45 ppm हून कमी नायट्रेटलाही मलेरिया / डेंगीचे डास वाढतात. म्हणून गरम प्रदेशात थंड प्रदेशात विकसित झालेले नियम लागू पडत नाहीत. आपण ' डासांची पैदास न करणारे पाणीच स्वच्छ ' असा सोपा नियम केला पाहिजे. ह्यासाठी परत कुठल्याही लॅबोरेटरीचीही गरज नाही.

■ अशा पध्दतीस हल्ली ' बायॉलोजिकल ' किंवा ' इकॉलॉजिकल ' इंडिकेटर म्हणजे ' सूचना ' देणारी पध्दत म्हणतात. आपल्या 10000 वर्षांच्या परंपरेतही अशा जैविक सूचना वाचल्या जात, त्या पाळल्या जात.

■ सर्वांनी स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी शासनाने ह्या आधुनिक ' जैविक सूचना - प्रणालींचा ' वापर सुरू केला पाहिजे. सामान्य माणसास त्या चटकन कळतातही.

■ हल्ली पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण करण्यासाठी अभियंते नेमलेले असतात. हल्लीच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणात कुठेही फारसे जैविक म्हणजे इकॉलॉजिकल ज्ञान येत नसते. आता ते जगभर येऊ लागले आहे. ते अत्यावश्यकही आहे.

■ एखादी खाद्य - वस्तू, समजा जिलेबी, जमिनावर पडली तर ती आपण डेटॉलसारख्या रसायनाद्वारे स्वच्छ करून खातो का ? मग कातडीच्या स्वच्छतेसाठी अशा रसायने का वापरावीत? ती कातडीवरील सूक्ष्म छिंद्रांवाटे रक्तात जातात ह्याचे भान ठेवावे. रासायनिक कारखान्यांत कुठलेही रसायन अंगावर उडल्यास ताबडतोब पाण्याच्या फवाऱ्याखाली 10 मिनिटे स्नान करावे - असा दंडक आहे. नाहीतर माणूस प्राणास मुकतो.

■ आधुनिक हॉस्पिटलमध्ये तसेच परदेशात घरोघरी भरपूर रासायनिक स्वच्छता साधली जाते. परंतु त्यामुळे ही घातक रसायनेही पचविणारे रोगजंतू तेथे तयार होतात. ते आधुनिक औषधांनाही जुमानत नाहीत. हल्ली सर्व नवीन आजार हे परदेशातून येत आहेत, कारण तेथे खोटी स्वच्छता असते.

■ आपल्याकडे पूर्वी देशी गाईचे शेण / मूत्र किंवा गंगाजल वापरून जैविक स्वच्छता साधली ज. परंतु मधल्या प्रदूषणाच्या काळात गाईचे चांगले शेण / मूत्रही मिळेनासे झाले, गंगाजलही अपवित्र झाले आणि मग आपणास परदेशात विकसित झालेली रासायनिक स्वच्छता - प्रणाली स्वीकारावी लागली.

■ आज अनेक जैविक शेती करणाऱ्या प्रयोगवीरांनी ʇपंचगव्यʈ म्हणजे देशी गाईचे पाच गव्य (पदार्थ) दूध - दही - तूप, शेण - मूत्र वापरून रोग - कीड नियंत्रण करण्यात यश मिळविले आहे. ह्यामुळे पिकांची वाढही चांगली होते. ह्याचाही शास्त्रीय अभ्यास झाल्यास त्यास शासनाचा पाठिंबा मिळेल.

■ पूर्वी जेव्हा नद्या बारमाही वाहत आणि त्या जैविक - स्वच्छ असायच्या तेव्हा नदीचा गाळ आरोग्यदायी होता. तो पुरामुळे मोठ्या प्रदेशावर दरवर्षी पसरत असे.

आता धरणांत पाणी सडत असते, त्यातील गाळातून मिथेनसारखे वातावरण तापविणारे घातक वायू निघत असतात. उन्हाळ्यात तेथील उघडा पडणारा गाळ कुणीही काढून नेत नाही, कारण त्यात काहीच उपयुक्त नसते.

■ नदीत जर तळात वाळू निर्माण होत असेल तर ती स्वच्छ समजता येईल. तसेच शंख - शिंपल्यांचे अस्तित्वही स्वच्छ नदी दर्शवितात.

हल्ली बांधकामांचा वाढलेला वेग आणि नद्यांच्या प्रदूषणामुळे वाळूची किंमत वाढली आहे. पूर्वी उन्हाळ्यात वाळूखालून वाहणारे पाणी शुध्द करण्यासाठी त्यावर कलिंगडे, खरबुजं, काकडी वगैरे पिके घेतली जात. ती जैविक पध्दतीने घेतल्यास त्यामुळे पाणी स्वच्छ होते. मात्र तेथे रासायनिक खते वापरल्यास उलटे पाण्यात नायट्रेट वाढतात. शिवाय त्यामुळे विषारी रोग - कीड - नाशकेही वापरावी लागतात.

■ दिल्लीत यमुना येते ती हरियानातील शेतीतील रासायनिक प्रदूषण घेऊन. तुरटी - क्लोरिन वापरून हे प्रदूषण कमी होत नाही, फक्त धोक्याच्या सूचना बंद पडतात.

म्हणूनच पाणी स्वच्छ राखण्यासाठी जैविक शेतीचा सार्वत्रिक प्रसार होणे आवश्यक आहे.

■ एका शहराचे सांडपाणी हे पुढच्या शहराचे पिण्याचे पाणी हल्ली असते. सांडपाण्यात रोगजंतू, नायट्रेट, हेवी मेटल (अॅल्युमिनियम, कॉपर, शिसे, पारा, वगैरे) विषारी रसायने आणि रासायनिक औषधे (अॅलोपॅथीची) असतात. हे सर्व सांडपाणी शुध्दीकरण प्रक्रियेतही निघत नाहीत आणि पुढील शहराच्या जलशुध्दीकरणातही नाही. फक्त धोक्याच्या सूचना तेवढ्या बंद पाडल्या जातात.

■ आज जी प्रदूषण मंडळाची मानकं आहेत, त्यात BOD - COD प्रदूषण मानकांवर अवाजवी भर दिला जातो. नायट्रेट / हेवी मेटल ह्यांकडे दुर्लक्ष होते. मग उजनीचे पाणी प्रदूषण मंडळाच्या मते स्वच्छ असते तर तेथे काठआवर राहणाऱ्या, जैविक सूचना समजणाऱ्या सामान्य जनांच्या दृष्टीने घातक असते.

■ वस्तुत: सांडपाणी स्वच्छ करून ते आपण स्वत: वापरणे आवश्यक आहे. ते बाहेर सोडले जात असल्यास ते वापरण्यास अयोग्य आहे - असे समजावे.

■ BOD आणि COD हे जैविक शेतीचे अन्न (सेंद्रिय खत) असल्यामुळे सांडपाणी जर जैविक शेतीस दिले जात असेल तर तेथे BOD - COD ची हल्लीची मानकं शिथिल केली जावीत.

मानवी मल - मूत्र हे पिकांचे अन्न आहे. ह्यालाच आधुनिक जगात इकॉसॅनिटेशन असे म्हणतात. सांडपाणी तसेच किंवा चुकीच्या पध्दतीने स्वच्छ करून नदीत सोडणे हा अक्षम्य गुन्हा आहे.

■ झाडाखाली जमिनीवर सेंद्रिय कचरा टाकल्यास किंवा लघवी केल्यास दुर्गंधी (धोक्याची सूचना) येत नाही. याउलट फरशीवर लगेच सूचना येते. ही सूचना समजून घेतल्यास योग्य ती कृती करता येते. दुर्गंधी दडपण्यासाठी रसायनांचा वापर करणे मात्र घातक आहे.

■ BOD हे वस्तुत: जैविक अन्न आहे. त्यामुळे दुर्गंधी ही धोक्याची सूचना मिळते. प्रत्यक्ष धोका असतो तो नायट्रेट आणि हेवी मेटल प्रदूषणामुळे.

सांडपाणी स्वच्छ केल्यानंतर केवळ अन्न (बॅटरी) कमी झाल्यामुळे पाणी डोळ्यास / नाकास स्वच्छ वाटते. त्यात मलेरियाचे डास वाढतात, मासे जगू शकत नाहीत. जास्त अन्न आणि कमी नायट्रेट / हेवी मेटल हे वातावरण असल्यास मासे वाढतात.

■ पाण्यातील प्राणवायू घटतो आणि ऑक्सिजनची डिमांड (मागणी) निर्माण होते, तो मात्र सेंद्रिय अन्नामुळे नाही. नायट्रेटमुळे पाण्यातील प्राणवायू घटतो.

■ सेंद्रिय अन्न / नायट्रेट हे प्रमाण अधिक असल्यास मासे वाढतात. ते पावसाळ्यात कमी होते कारण पावसाच्या पाण्यात नायट्रेट असतात. मग बेडूक, साधे डास, मलेरियाचे डास आणि शेवटी डेंगीचे डास हे वाढत्या वायट्रेटमुळे येतात.

■ नायट्रेटमुळे धातूही गंजतात. कमी नायट्रेटला जसे समाजात वाढत गेले तसे आपण पितळ, कल्हई, अॅल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, काच अशी स्वयंपाक घरात प्रगती केली.

तांब्याची वायर चकचकीच करून, ती पाण्यात बुडवून ठेवावी. ती 24 तासांहून अधिक काळ चकचकीत राहिल्यास पाणी खरोखर स्वच्छ समजावे.

जल - शुध्दीकरणाची जैविक पध्दत :
■ जैविक शेतीतील विहिरीचे पाणी शुध्द समजावे. त्यात डासांची पैदास न होणे, तांबे न गंजणे हे गुणधर्म आढळतील.

■ गरज पडल्यास 1 मीटर लांब, 1 मीटर रूंद आणि 1 मीटर खोलीचा हौद बांधून त्यात खाली मोठे दगड, मग छोटे गोटे, विटांचे तुकडे आणि सर्वात वर वाळू टाकावी. ह्या जैविक फिल्टरवर बहुविध वनस्पती वाढू द्याव्यात. त्यामुळे हा फिल्टर चोक न होता वर्षावर्षे चालतो आणि तळातून जैविक - स्वच्छ पाणी मिळते.

थंड प्रदेशात, जेथे 6-9 महिने वनस्पती वाढू शकत नाहीत, तेथे मात्र नाईलाजाने रासायनिक पध्दत किंवा मेंब्रेन पध्दत वापरावी लागते. भारतात आपण जैविक फिल्टरच वापरणे अधिक चांगले त्यास परत - परत खर्चही येत नाही.

सांडपाणी शुध्दीकरणाची जैविक पध्दत :
■ वर दिलेल्या पध्दतीप्रमाणेच जैविक फिल्टर बांधावा. सांडपाण्याच्या प्रतीनुसार फिल्टरचा आकार (लांबी व रूंदी) वाढेल. उंची 1 मीटरच ठेवावी.

■ जर सांडपणी वाहत असेल तर त्याच्या मार्गात दगड, विटांचे तुकडे टाकून प्रवाहाची रूंदी व खोली वाढवावी. प्रवाहात विविध वनस्पतींची वाढ होऊ द्यावी. त्यामुळे शुध्दीकरणास मदतच होते.

थोड्यात :
■ पाण्यातील मुख्य प्रदूषण असते नायट्रेट
■ हेवी मेटल्स म्हणजे नायट्रेटचा मोठा बाँब.
■ नायट्रेट आणि हेवी मेटलमुळे माणूस बिघडतो. त्यास वाईट संवयी व्यसने जडतात. त्याच्या हातून गुन्हे घडतात.
■ केवळ वनस्पतीच हे प्रदूषण वापरून कमी करतात.
■ बायोसॅनिटायझर पाणी शुध्द करण्यासाठी, पाण्याच्या पहिल्या टाकीत (फिल्टरपूर्वी) वापरणे चांगले. मग सांडपाणी शुध्दीकरण आपोआप होऊ लागते.

बायोसॅनियायझर म्हणजे काय ?
■ 1 एकर नैसर्गिक जंगल म्हणजे 100 मिलीग्रॅम बायोसॅनिटायझर. ते आजच्या आधुनिक काँक्रीटच्या जंगलात पाण्याच्या टाकीत ठेवल्यास पाणी, हवा आणि मानवी मनाचे प्रदूषण कमी होते.

■ हवेतील ग्रीनहाऊस वायू आणि पाण्यातील क्षार कमी होऊन गुणकारी, चविष्ट पाणी तयार होते. बाटलीतील शुध्द पाणी जर 3 रू. लिटर धरल्यास हे पाणी 300 रू. लिटर एवढे चांगले होते.

■ बायोसॅनिटायझर कुठल्याही द्रवात (पाणी) दूध, तेल, पेट्रोल, डिझेल वगैरे) ठेवता येते. त्यामुळे प्रदूषणातून संपत्ती तयार होते.

■ दीर्घकाळ काम करते. आज 10-12 वर्षे वापरणारे लोक आहेत.

■ बायोसॅनिटायझर वापरलेल्या पाण्यात रोगजंतू, विषारी रसायने, आपोआप निष्प्रभ होतात.
■ डासांची पैदास होत नाही, तांबे गंजत नाही.

■ हे पाणी (बायोसॅनिटायझर विहीरीत ठेवावे) शेतीस वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊन अधिक सकस अन्न तयार होते. पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते. सांडपाणी गुणकारी होते. ते वापरून घरातील, गोठ्यातील, शेतातील रोग - कीडी - तणे कमी करता येतात. उपयुक्त वनस्पतींची अधिक वाढ होऊ लागते.

■ अधिक माहितीसाठी www.wastetohealth.com किंवा www.biosanitizer.org पहावे.

Path Alias

/articles/savacachataa-raasaayanaika-kai-jaaivaika

Post By: Hindi
×