सूक्ष्मसिंचन - शेतीसाठी महत्वाच


सूक्ष्म सिंचन सुविधेतून पाण्यात विरघळणारी खते पाण्यातूनच दिल्यास पिकाचे वाढीचा वेग बळावतो कारण विजेचा प्रवाह जसा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे संभवतो तसेच सिंचनातील एउ म्हणजे क्षारता जर पुरेशी असेल तरच अन्नरसांचा उर्ध्व दिशेचा प्रवास वेगवान आणि पर्याप्त वाढ होत रहायला पूरक होतो या अन्नरसप्रवाहाचे नवे उच्चांक म्हणजे हायड्रोपोनिक आणि एरोपोनिक थोडक्यात सूक्ष्म सिंचनाची व्यापकता म्हणजे सर्वच पिकासाठी त्याचा स्वीकार झाला तर !

पाणी सर्वच प्राणिमात्रांसाठी अत्यंत गरजेचे आहे पंचमहाभूतांमधील एक म्हणजेच ५ अति महत्वाच्या घटकातील एक आहे पाणी प्रवाही आहे गतिमान आहे पर्जन्यात अन्नसम्भवहः म्हणजे पावसापासून अन्न निर्माण होते, तसेच अन्नात भवन्ति भूतानि -अन्न निर्मितीमधून सर्व सजीव जगतात आणि वाढतात अशा पाण्याची संचयासाठी सरोवरे, धरणे, बंधारे, विहिरी, पाझरतलाव व अलिकडे जलयुक्त शिवार व नद्यांची -ओढ्याची पात्रे रुंद आणि खोल करून वर्षभर पाणी मिळावे ,जमिनीखालील पाण्याची पातळी अक्षुन्ह रहावी असे प्रयत्न झाले पौराणिक काळात भगीरथाने तप करून स्वर्गातील गंगा आणली असे म्हणतात म्हणूनच प्रखर प्रयत्नाला भगीरथ प्रयत्न म्हणतात.

वाढते शहरीकरण, वाढतच राहणारी लोकसंख्या, वाढते उद्योग आणि रस्ते रेल आणि विमानतळ अशा मूलभूत सुविधाया मुळे शेतजमिनीत घट होत आहे, त्यातच बेसुमार जंगलतोड आणि उद्योगातून आणि वाहनांच्या उत्सर्जनातून वाढते प्रदूषण वाढते वैश्विक तापमान यामुळे पर्जन्यराजाची अवकृपा लहरीपणा म्हणून अवकृपा आणि अतिकृपा यांचा लपंडाव चालूच आहे परिणामी कमी जमिनीतून अधिक उत्पादन हे निरंतर आव्हान असणार आहे वाढत्या लोकसंख्येला अन्न हवे अन्न पौष्टिक हवे प्यायला शुद्ध निर्जंतुक पाणी हवे मानवाच्या अन्नातील मोठा घटक दूध आणि मांस त्यासाठी सर्वच पाळीव प्राण्यांना सुद्धा शुद्ध पाणी आणि खुराक हवा चारा हवा हे सर्व हवे ची बहुतांशी निर्मिती पिकाऊ जमिनीतून होते हे समजले पाहिजे अशा पिकाऊ जमिनीची सुपीकता चांगली असायला हवी पण वास्तव काय आहे?

पिकाऊ मातीमधील सेंद्रिय कर्रब किमान एक टक्का हवा पण महाराष्ट्रातील मातीमध्ये तो केवळ ०.४% इतकाच शिल्लक आहे आणि महाराष्ट्रात २५लाख एकर जमिनी क्षारपड झाल्या आहेत . म्हणजे खालावलेली सुपीकता आणि घटणारे क्षेत्र या प्रतिकूल परिस्थिती मध्येच आपल्याला अधिक उत्पादने घ्यायची आहेत कारण ती वाढत्या लोकसंख्येची गरज आहे हे कसे शक्य होईल ?

असे म्हणतात -प्रतिकूल काळात गुणात्मक वृद्धी करावी , शेतीचे क्षेत्र सिंचन युक्त केले आणि सिंचनाला सूक्ष्म सिंचनाची व्यापक जोड दिली तर अशी गुणात्मक वृद्धी होईल का ?

आज डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला, फुलशेती, अशी नगदी पिके ठिबक वर आणण्यात आपण यश मिळविले आहे त्यामुळे ठिबकमुळे अधीक आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन कमी क्षेत्रामधून मिळविणे आता अनुभवसिद्ध आहे उसाच्या लागवडीतून साखर आणि मद्यार्क निर्मितीमुळे मोठे ग्रामीण भाग संपन्न झाले उद्योजकतेचा विस्तार झाला हे निर्विवादच आहे पण कै अप्पासाहेब पवारांनी उसाला ठिबकनेच पाणी द्यावे याचा अंगिकार प्रचार आणि प्रसंगी कठोर पाठपुरावा केला त्यांनी सुचविलेल्या मार्गावर प्रत्येक ऊस उत्पादक जाईल आणि सर्व साखर कारखानदार त्याला मदत करतील तर हे अशक्य मुळीच नाही या पाण्याच्या बचतीमधून जे पाणी हंगामी पिकासाठी मिळेल त्यातून मोठे क्षेत्र वाढीव सूक्ष्म सिचंनाखाली आणणे शक्य होईल यातील म्हणजे वाढीव क्षेत्रातील अधिक पिके धान्य, कडधान्य, तेलबिया आणि चारा अशी निवडली तर समतोल आणि सकस समृद्धी आणता येईल मानवास धान्याबरोबरच डाळी आणि तेले आणि पशुसाठी पौष्टिक चारा आणि खुराक भरपूर पिकविता आल्यास कुपोषण, नापिकी आणि अपव्यय या दूषण त्रयींमधून आपण मुक्त होऊ सूक्ष्म सिंचनातील काही शास्त्रीय बारकावे पाहूया ..

पिकाची वाढ होण्यासाठी मुळ्यांचा विस्तार व्हायला हवा अशा असंख्य पांढर्‍या केश मुळ्याद्वारे जमिनीतील अन्नरसांचे ग्रहण आणि पाने व शेंड्याकडे संचलन व्हायला हवे मुळ्यांचा विस्तार म्हणजेच जारवा सजीव आणि क्रियाशील असण्यासाठी मातीच्या कणांमध्ये हवेचा म्हणजेच प्राणवायूचा संचार असायला हवा म्हणजेच वाफसा सदैव टिकवायला हव एकीकडे सिंचन आणि दुसरीकडे जारवा टिकविणे हे सूक्ष्म सिंचनानेच शक्य आहे शिवाय ,सूक्ष्म सिंचन सुविधेतून पाण्यात विरघळणारी खते पाण्यातूनच दिल्यास पिकाचे वाढीचा वेग बळावतो कारण विजेचा प्रवाह जसा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे संभवतो तसेच सिंचनातील एउ म्हणजे क्षारता जर पुरेशी असेल तरच अन्नरसांचा उर्ध्व दिशेचा प्रवास वेगवान आणि पर्याप्त वाढ होत रहायला पूरक होतो या अन्नरसप्रवाहाचे नवे उच्चांक म्हणजे हायड्रोपोनिक आणि एरोपोनिक थोडक्यात सूक्ष्म सिंचनाची व्यापकता म्हणजे सर्वच पिकासाठी त्याचा स्वीकार झाला तर !

याचा शंभर टक्के स्वीकार इस्राएल सारख्या छोट्या देशाने केला त्या देशाला आपले अनेक कृषिनिष्ठ ,कृषी पंडित आणि निर्णय क्षम अधिकारी व राज्यकर्ते जातात त्याचे पर्यवसान आता सर्व पिकासाठी सूक्ष्म सिंचन अशा व्यापक कार्यवाहीत व्हायला हवे तीच मा कै अप्पासाहेब पवार आणि भवरलालजींना समर्पक श्रद्धांजली ठरेल शासनाचे निर्णय ,यंत्रणेद्वारे कार्यवाही आणि त्यामध्ये लोकसहभाग यातून हे शिवधनुष्य नक्कीच उचलले जाईल साने गुरुजींच्या शब्दात -तो सोन्याचा दिन येवो

बलशाली भारत होवो विश्वात शोभुनी राहो

Path Alias

/articles/sauukasamasaincana-saetaisaathai-mahatavaaca

Post By: Hindi
×