शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी - सिंचन सहयोगाच्या प्रेरणेने


हे काम करवून घेण्यासाठी सिंचन सहयोग, वाशिम कारणीभूत आहे. सिंचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे हमखास पिके काढायला लागलो. हमखास पिकाला ह्या कार्यक्रमाची साथ मिळाली तर याच मेहनतीत जास्त पैसा मिळणार म्हणून सिंचन सहयोगचे सचिव श्री. चौधरी यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. प्रथम जिरायत जमिनीला सिंचित केले. सिंचनाला बियाण्याची जोड व बियाण्याला प्रक्रियेची साथ अशी ही साखळी आहे. यामध्ये मालेगांव तालुक्यातील 27, वाशिम तालुक्यातील 26, व सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा 1, असे 54 शेतकरी आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा बिज प्रमाणिकरण अधिकारी, वाशिम व सचिव, सिंचन सहयोग, वाशिम यांनी परिश्रम घेतले आहेत.'शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी' या साधुसंतांनी सांगितलेल्या म्हणीचा शेतकऱ्यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. शेतीमध्ये इतर बाबीसोबतच उत्पादन वाढीसाठी बियाणे हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे आणि हेच ध्यानी धरुन आम्ही शेतकरी शुद्ध उत्पादनक्षम असे दर्जेदार बी-बीयाणे निर्माण करीत आहोत. यामध्ये बियाण्याची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.

(1) पैदासकार बियाणे (Breeder Seed) : हे बियाणे विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार होते.

(2) पायाभूत बियाणे (Foundation Seed) : हे बियाणे पैदासकार बियाणापासून, विद्यापीठ, तालूका, बिज गुणण प्रक्षेत्र व शेतकऱ्यांच्या शेतावर कृषि अधिकारी व महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्या देखरेखीखाली तयार करता येते.

(3) प्रमाणित बियाणे (Certified Seed) : हे पैदासकार व पायाभूत बियाणे यापासून तयार करता येते. बियाणे तयार करण्याची पद्धत पायाभूत बियाणाप्रमाणेच आहे.

शेतकऱ्यांनी स्वत: बियाणे तयार केले तर त्याचे आर्थिक शोषण होणार नाही. शिवाय भेसळ राहणार नाही व दर्जेदार - उत्पादनक्षम बियाणे असल्याने पुढच्या पिकाच्या पिढीतसुद्धा भरघोस उत्पादन मिळणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत: बियाण्याची निर्मिती केल्यास विलिगीकरण अंतरसुद्धा योग्य राखले जाते. विलिगीकरण म्हणजे त्याच बियाण्याला लागून दुसऱ्या जातीचे पीक नको. हे अंतर पीक आणि दर्जा यावर अवलंबून आहे. तूर पिकासाठी ' पायाभूत बियाण्याला ' 250 मीटर परिसरात दुसऱ्या जातीची तूर नको व ʅप्रमाणित बियाणेʆ निर्मितीला 150 मीटर परिसरात दुसऱ्या जातीची तूर नको. सोयाबीनला 3 मीटर व मूग या पिकाला 5 मीटर, कांद्याला 1000 मीटर असे वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळे विलिगीकरण अंतर ठेवावे लागते.

शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतावर बियाणांची निर्मिती केल्यामुळे शेतकऱ्यांना तिहेरी फायदा होणार आहे. (1) भेसळ नसलेले बियाणे निर्विवाद मिळणार, (2) पुढच्या पिढीत जास्त उत्पादन मिळणार व (3) बियाणे तयार केल्यामुळे प्रोत्साहन राशी मिळणार. यासाठी थोडी अधिक मेहनत आणि ती ही बौद्धिक, घेणे गरजेचे आहे.

आम्ही शेतकरी गटशेती करत आहोत. सन 2009-10 या वर्षात बोरगावात सोयाबीन जेएस 335 या वाणाचे 16 शेतकऱ्यांनी 359 क्विंटल, कच्चे बियाणे तयार केले होते. त्यावर प्रक्रिया (प्रतवारी, स्वच्छता, 30 किलो पिशवी ई.) आम्ही स्वत:च केली. यातून 142 क्विंटल चांगले बियाणे तयार झाले. यौपकी 60.90 क्विंटल बियाणे प्रयोगशाळेत पात्र झाले व त्याला प्रोत्साहन म्हणून 60900 रुपयांचे बक्षीस मिळाले. हेच सोयाबीनचे बियाणे बाजारात दर 1750 रुपये प्र.क्वि. असताना, 2500 रुपये क्विंटल ने विकले. यामुळे आम्हाला 750 रुपये क्विंटलमागे जास्त मिळाले आणि विकत घेणाऱ्या शेतकऱ्याला बाजारभावापेक्षा 500 रुपये क्विंटलने कमी दराने खरेदी करता आले. म्हणजे आमचा एका क्विंटलला रुपये 750 चा फायदा आणि विकत घेणाऱ्याचा रुपये 500 चा फायदा झाला. दोघेही फायद्यात. गेल्यावर्षी 16 शेतकऱ्यांचे 55 एकर क्षेत्र होते.

गेल्यावर्षीचा अनुभव पाहता या वर्षी (2010) या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. 3 तालुक्यात, 6 गावात, 54 शेतकरी एकत्र येऊन 410 एकर क्षेत्रावर 3 पिकांचे, विविध दर्जाचे बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तूर 250 एकर, सोयाबीन 146 एकर व मूग 12 एकर क्षेत्रावर आहे. यामध्ये तूर - विपुला पायाभूत 70 एकर, तूर प्रमाणित 180 एकर, सोयाबीन पायाभूत 71 एकर, प्रमाणित 1 ते 2, 75 एकर, मूग, वैभव 12 एकर पायाभूत, असे नियोजन आहे. यासाठी तुरीचे मूलभूत बियाणे रुपये 9000 प्रती क्विंटलप्रमाणे राहुरी कृषि विद्यापीठातून 61 क्विंटलच खरेदी केले आहे तर मूग 65 किलो (90 रुपये किलो प्रमाणे) व सोयाबीन पायाभूत बियाणे बिज गुणण प्रक्षेत्र वनोजा, तालुका: रिसोड येथून रुपये 3600 क्विंटल प्रमाणे 13.50 क्विंटल खरेदी केले व उर्वरित 21 क्विंटल बियाणे हे आम्हीच निर्माण केलेले पेरले आहे. याची महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला यांचेकडे नोंदणी केली आहे. तपासणी शुल्काची 43240 रुपये रक्कम यंत्रणेच्या खात्यात चलनाद्वारे भरलेली आहे.

यामधून उत्पादन होणाऱ्या बियाणावर आम्हीच प्रक्रिया करणार आहोत. उत्पादित प्रयोगशाळेत पात्र होणाऱ्या बियाणावर आम्हाला एका क्विंटल बियाणाला एक हजार रुपयांचे प्रोत्साहनपण मिळणार आहे. तूर 2000 क्विंटल, सोयाबीन 1500 क्विंटल व मूग 60 क्विंटल बियाणे तयार होईल अशी आम्हाला खात्री आहे. यामधून 25 टक्के लो ग्रेड वजा जाता, तूर 1500 क्विंटल, सोयाबीन 1200 क्विंटल, मूग 45 क्विंटल तयार होऊन एकूण 2745 क्विंटल बियाणे प्रयोगशाळेत पात्र होऊन आम्हा सर्व शेतकऱ्यांना जवळपास यातून 24.00 लक्ष रुपये मिळणार आहेत. हे पात्र बियाणे आम्ही बाजारभावापेक्षा 200 रुपये क्विंटल कमी दराने इतर शेतकऱ्यांना विकणार आहोत. हा आमचा निर्धार आहे. या बियानापासून साधारणपणे 20 हजार एकरावर पेरा होईल.

हे काम करवून घेण्यासाठी सिंचन सहयोग, वाशिम कारणीभूत आहे. सिंचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे हमखास पिके काढायला लागलो. हमखास पिकाला ह्या कार्यक्रमाची साथ मिळाली तर याच मेहनतीत जास्त पैसा मिळणार म्हणून सिंचन सहयोगचे सचिव श्री. चौधरी यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. प्रथम जिरायत जमिनीला सिंचित केले. सिंचनाला बियाण्याची जोड व बियाण्याला प्रक्रियेची साथ अशी ही साखळी आहे. यामध्ये मालेगांव तालुक्यातील 27, वाशिम तालुक्यातील 26, व सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा 1, असे 54 शेतकरी आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा बिज प्रमाणिकरण अधिकारी, वाशिम व सचिव, सिंचन सहयोग, वाशिम यांनी परिश्रम घेतले आहेत.

सम्पर्क


श्री. वसंता लांडकर बोरगाव, जिल्हा : वाशिम - (भ्र : 9423701498)

Path Alias

/articles/saudadha-baijaapaotai-phalae-rasaala-gaomatai-saincana-sahayaogaacayaa-paraeranaenae

Post By: Hindi
×