सेंटर फॉर अफोरडेबल वॉटर एंड सॅनिटेशन टेक्नॉलॉजी ही एक ना-नफा संस्था असून परवाना धारक अभियांत्रिकी संस्था आहे जी विकसनशील देशाकरिता स्वच्छ पाणी आणि मुलभूत स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टी ने तंत्रज्ञान उपलब्ध करून देते. CAWST चे मुख्य कार्यालय कॅनडा येथे असून , ८२ देशांच्या लहान मोठ्या शेकडो संस्था , सरकारी संस्था , समुदाय CAWST शी तंत्रज्ञान विकसित करून स्थानिक पातळीवर पाणी आणि स्वच्छता कार्यक्रम विकसित करून त्यांची क्षमता वाढवतात. CAWST ची स्थापना सन २००१ कॅनडा येथे झाली व ती लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी कसे घ्यायचे , स्वास्थ्य संबधित सोपे उपाय, म्हणजे सगळ्यांना परवडतील असे, तंत्र विकसित करून सामान्य जनते पर्यंत पोहचविण्याचे काम करते व त्या करिता संस्था ट्रेनिंग आणि सलाहगार ही कामे पण संस्था सांभाळते.
आता पर्यंत CAWST ने जग भरातील १३.१ दश लक्ष लोकांना शुद्ध पाणी आणि सॅनिटेशन बद्दल जागरूक केले असून ६६ लाख लोकांना संस्थेचेच ट्रेनिंग मटेरीअल देऊन ,ट्रेनिंग दिले आहे. CAWST १६४ देशांशी जुळले असून , ६५०० संस्थांना सपोर्ट पण करते .
जरुरतमंद लोकांपर्यंत संस्थेचे कार्य पोहोचावे त्याकरिता CAWST वचनबद्ध आहे आणि त्याकरीता हि लोकांना सबसिडाईझ्ड दरात ट्रेनिंग देऊन, ट्रेनिंग मटेरीअल पण उपलब्ध करून देते कारण संस्थेचे उद्देशच आहे की बिलकुल साधारण तर्हेने व परवडणार्या खर्चात लोकांना पाणी आणि स्वच्छते बद्दल सगळ्या शंकांचे समाधान करायचे जेणे करून ते स्वतः त्याला अपडेट करून व त्याचे रखरखाव करण्यात समर्थ व्हावे .
CAWST ने सन २००१५ पर्यंत १९० देशातील ५००० संस्थांना आणि ८२ देशातील १०९१ लोकांना पाणी व सॅनिटेशन वर आपले प्रोजेक्ट्स दिले असून त्यांची अंमलबजावणी पण होत आहे.
संस्थेच्या अजून एका उपलब्धीवर प्रकाश टाकायचा झाला तर त्यांनी सन २०१५ साली दिलेले ट्रेनिंग . CAWST ने त्यांचीच एक संस्था WET Centers ( Water Expertise and Training Centers) हिला हाताशी धरून सन २०१५ मधे पाणी व सॅनिटेशन वर ५८०० लोकांना प्रशिक्षित केले आणि हा आकडा संस्था स्थापनेच्या वर्षा पासून (सन २००१)ते २०१४ च्या आकड्याचा तिसरा हिस्सा आहे.
CAWST जग-भरातल्या कुठल्या संस्था जुळल्या आहे हे खाली दिले आहे,
संस्था | नंबर |
लोकल चॅरिटेबल संस्था | १५९ |
सरकारी | ८५ |
मोठ्या जागतिक संस्था | ७८ |
लहान जागतिक संस्था | ५९ |
लोकल औद्योगिक संस्था | ३५ |
शिक्षण संस्था | १३ |
UN च्या | ४ |
बायोसँड फिल्टर (BSF) :
हे एक साधे वाळूचे उपकरण आहे. प्राचीन काळात जसे पाणी फिल्टर करायला वाळूचे एकावर एक मडके ठेऊन पाणी फिल्टर करत असे बिलकुल इतके साधे . याची उंची १ मीटर आणि चोही बाजूने ३० से.मी.रुंद. फिल्टर कंटेनर प्लास्टिक किंवा काँक्रीट कशाचे पण असू शकते. या फिल्टर मधे एक वेगळी सिलेक्ट आणि तैयार केलेली रेती व ग्रावेल याचा उपयोग केला जातो. दुषित पाण्यातील तरंगणारे व दिसणारे (Suspended Solid) हे रेती मुळे फिल्टर होते आणि ज्या पाण्यातील जिवाणू मुळे आपण आजारी पडतो ते रेतीच्या वरच्या दोन लेयर (Bio-layer) मध्ये नष्ट होतात कारण इथे बॅकटेरिया वाढवल्या जातात. म्हणून याचे नाव बायोसँड फिल्टर ठेवले असे मानायला हरकत नाही.
या फिल्टरची विशेषता ही की याच्यात कुठल्याही प्रकारचे पाणी फिल्टर होते, मग ते विहिरीचे , बोरवेलचे , तलावाचे किंवा पावसाचे असुदे. आणि म्हणूनच हे फिल्टर ग्रामीण भागात वापरायला एकदम सोपे कारण पाणी कुठलही असले तरी ते शुद्धच करणार. एकच मर्यादा आहे ती अशी की पाणी केमिकल मुक्त असावे .कारण वरच्या दोन लेअर मधे आपण जे बॅकटेरिया वाढवतो ते मरून जातील .
![. .](https://farm5.staticflickr.com/4560/38375209312_9c247b0520_m.jpg)
CAWST च्या २०१३ च्या एका रिपोर्ट प्रमाणे ५५ पेक्षा जास्त देशां मधे ६,५०,००० फिल्टर उपयोगात आणले जात असून ४ दशलक्ष लोकांना त्याचा फायदा मिळाला आहे.
![. .](https://farm5.staticflickr.com/4519/38375208912_5980eca6a7_m.jpg)
![. .](https://farm5.staticflickr.com/4562/24536048208_cc07e99294_m.jpg)
अफोरडेबल वॉटर
या जगात सगळ्यांना स्वच्छ पाणी आणि त्याची उपलब्धता एक गरजेची वस्तू आहे. पाणी नाही अशातील भाग नाही पण आपले चुकीचे अर्थशास्त्र आणि खराब स्थितीतली मुलभूत सुविधा , पाण्याची कमी , सॅनिटेशन व हायजीन या कारणाने दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक मरण पावतात, त्यात मुलांचे प्रमाण जास्त आहे .
पाण्याची कमी, दुषित पाणी आणि अस्वच्छता, याचा, जग भरातील गरीब कुटुंबातील मुलांच्या अन्न सुरक्षा , बालपण व त्यांचे शिक्षण या गोष्टींवर विपरीत परिणाम होतो . दुष्काळात तर ही परिस्थिती आणखी तीव्र होते. सन २०५० पर्यंत अशी वेळ येऊ शकते की चार पैकी एक माणूस अशा परिस्थितीत राहील जिथे पाण्याचा दुष्काळ असेल किंवा जिथे वारंवार शुद्ध पाण्याचा अभाव असेल.
CAWST चे असे मत आहे की
![. .](https://farm5.staticflickr.com/4536/24536047928_d3d2f6d15c_m.jpg)
कमीत कमी १.८ बिलियन लोकांना असे पाणी उपलब्ध असते जे मल मुळे दूषित असते २.४ बिलियन लोक स्वच्छता-गृह किंवा संडास पासून वंचित आहे. इत्यादी इत्यादी.
अशा लोकांना स्वस्त आणि परवडणार्या दरात शुद्ध पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने CAWST तंत्रज्ञान विकसित करून त्याचे ट्रेनिंग व साहित्य , संस्था व लोकां पर्यंत जावे या दृष्टीने प्रयत्नशील असते.
![. .](https://farm5.staticflickr.com/4537/24536047698_582081a666_m.jpg)
१. | व्यक्तिगत | ६७ टक्के |
२. | शासकीय | २१ टक्के |
३. | कंपनी | ६ टक्के |
४. | CAWST ची कमाई | ४ टक्के |
५. | संस्था | १ टक्का |
६. | सामाजिक संस्था | १ टक्का |
श्री. विनोद हांडे, नागपूर - मो : ९४२३६७७७९५
Path Alias
/articles/sansathaa-paraicaya-saentara-phaora-aphaoradaebala-vaotara-enda-saenaitaesana
Post By: Hindi