सिचंन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचनाचा वापर


सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करण्यासाठी किमान तीन दिवसांच्या सिंचनाच्या गरजे इतके पाणी पीकांना वारंवार पुरविणे गरजेचे ठरते. सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचनाचा वापर करावयाचा झाल्यास प्रचलित कालवा प्रवाही सिंचन वितरण प्रणाली मध्ये अनेक बदल करावे लागतील कारण प्रचलित कालवा प्रवाही सिंचन वितरण प्रणाली मध्ये सिंचन आवर्तन कालावधी 14 दिवसापेक्षा जास्तं असतो. बहूतांश प्रकल्पामध्ये हा कालावधी 30 दिवस असतो. पिकांसाठी एका पंधरवाडयात लागणाऱ्या सिंचनाच्या महत्तम गरजे इतके पाणी पुरविता यावे असे संकल्प न व बांधकाम प्रचलित कालवा प्रवाही वितरण प्रणाली मध्ये असते. प्रत्येक आवर्तनामध्ये मुख्य कालवा पूर्ण दिवस चालू व वितरीका सात दिवस चालू व सात दिवस बंद असे नियोजन केले जाते. यावर मात करण्यासाठी नलिका वितरण प्रणालीचे विशिष्ट प्रकारे संकल्पन करुन सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे शक्य होणार आहे.

नलिका वितरण स्विकारले तर सिंचनाची कोणतीही पध्दत अवलंबिता येते. राज्यातील उपलब्ध पाणी व लागवडी लायक क्षेत्र विचारात घेता संपूर्ण लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे हे जलसंपदा विभागाचे दूरगामी (Long-term) उद्दीष्ट आहे. हे साध्य करणेच्या दृष्टीने वितरण व्यवस्था निर्माण करणे व सद्याची वितरण व्यवस्था सूक्ष्म सिंचनास पुरक अशी रुपांतरीत करणे आवश्यक आहे. नलिकाव्दारे सिंचन वितरण धोरणाबाबतचा शासन निर्णय क्रमांक सिंचन 2015 / प्र.क्र.24 / 2015 / जसं (धोरण), दिनांक 13 जानेवारी, 2017 रोजी व मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक क्रमांक सिंचन 2015 / प्र.क्र.24 / 2015 / जसं (धोरण), दिनांक 02 फेब्रुवारी, 2017 रोजी निर्गमित करण्यात आल्या आहेत.

जल शास्त्रीय संकल्पन: पुढील प्रमाणे जल शास्त्रिय संकल्पन केल्यास छोटे विकेंद्रीत साठे पुरेसे होतील अथवा विहिरींचा उपयोग साठवणी करीता करता येईल.

अ. प्रकल्पीय पीक रचने नुसार पंधरवाडयातील जास्तीत जास्त पाणी गरज , Field Application Efficiency 75 टक्के व वहन व्यय 5 टक्के विचारात घेऊन पंधरवाडयातील 12 दिवस सर्व विमोचके 24 तास चालतील असे गृहीत धरावे व वितरण प्रणालिचा एकूण विसर्ग व त्यावरून प्रति हेक्टरी विसर्ग काढावा.

ब. पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लागवडीलायक क्षेत्राच्या प्रमाणात पुरवठा स्थानावरील आवश्यक विसर्ग काढावा.

जलवाहिन्यांचे आरेखन (Pipe Layout) :


1) प्रत्येक पाणी वापर संस्थेसाठी स्वतंत्र मुख्यवाहीनी व त्यावर पाणी मोजण्याचे साधन बसवावे.

2) नलिका वितरण प्रणालिचे नियोजनात चक चे नियोजन हा महत्वाचा घटक आहे. सूक्ष्म सिंचन व्यवस्था विकसित होईपर्यंत प्रवाही सिंचन करता यावे याकरीता विमोचकाचा विसर्ग किमान सर्व साधारण विहिरीवरील पंपांचा असतो तेवढा म्हणजे 5 ते 6 लिटर प्रति सेकंद इतका येईल असे 5 ते 12 हेक्टर आकाराचे चक नियोजन करावे. मात्र प्रकल्प सापेक्ष यात बदल करता येईल.

3) चक आकाराचे प्रमाणात विसर्ग Nearly equitable water distribution to all outlets and optimum cost ही दोन उद्दीष्ट्ये ठेऊन Network architecture अतिंम करावे.

4) सर्वसाधारण रचनेमध्ये वाहिन्यांची लांबी कमीत कमी असावी.

5) प्रत्येक चक साठी स्वतंत्र उपवाहिनी (Lateral) असावी.

6) चक मधील 1.5 हेक्टर पेक्षा मोठया प्रत्येक गटास अथवा समूहा sub-lateral प्रस्तावित करावे.

7) लाभधारकांच्या सोयी नुसार चकमधील पाण्याचे वितरण दोन पध्दतीने करता येईल.

र) चकच्या मुखाशी उपलब्ध होणारा संपूर्ण विसर्ग एकावेळी एकाने घ्यावयाचे ठरविल्यास आळीपाळीने प्रवाही सिंचन करता येईल यासाठी वहन कालावधी मालकीक्षेत्राच्या प्रमाणात वाटून घ्यावा. लॅटरलच्या मुखाशी टी जोडून शेतकऱ्याच्या संख्येच्या प्रमाणात शाखा व त्या चालू करण्यासाठी पी व्ही सी बॉल व्हाल्व् त्यावर बसवावे लागतील.

ल) किंवा सर्वांनी सूक्ष्म सिंचन करावयाचा पर्याय निवडल्यास, लॅटरलचे पाणी मुखाशी बांधलेल्या (वितरण कुंडाचे स्थान असे असावे की त्यापुढील वितरण गुरुत्विय पाणी प्रवाहाने करता येईल) छोटयाशा वितरण कुंडात (0.9 मी x 0.9 मी x 0.9 मी) सोडावे. समजा चकचा आकार (लागवडी लायक क्षेत्र) 5 हेक्टर असेल तर 63 मी मी व्यासाचे व 150 मी मी लांबीचे पी व्ही सी पाईपचे 25 तूकडे (20 आर साठी एक या प्रमाणात) वितरण कुं डावर सम पातळीत बसवावे तसेच लाभधारकाचे क्षेत्र 60 आर असल्यास त्याला 3 पाईपाचे पाणी व 100 आर असल्यास 5 पाईपाचे पाणी मिळेल. हे पाणी संबधितांने एकत्र करून स्वतंत्र पाईपाने वहन करून आपल्या शेतात विहिरीत अथवा साठवण व्यवस्थेत साठवावे व सोयी नूसार सुक्ष्म् सिंचन करावे असे अपेक्षित आहे (अश्या प्रकारची मिळतीजूळती व्यवस्था सिंचन पुरस्कार विजेती जय मल्हार पाणी वापर संस्था इंदोरे जिल्हा नासिक व वैतरणा जलाशयावरील अनेक उपसा सिंचन पाणी वापर संस्थांच्या लाभक्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत).

फायदे :


या प्रकारच्या संकल्पन व नियोजनामुळे पुढील फायदे मिळतील

1. एकाच वेळी सर्व विमोचके चालू राहणार असल्यामुळे हेड मिडल व टेल असा भेद राहणार नाही.

2. सर्व साधारण वर्षात हंगामामधील जवळपास सर्व दिवस प्रवाह मिळतो (12 दिवस चालू व 2 दिवस बंद)

3. सिंचनाच्या पाण्याची उपलब्धी सर्व साधारण वर्षाच्या तूलनेत 50 असेल तर सिंचन क्षेत्रात कपात करावी लागेल, आवर्तन कालावधी 3 दिवस चालू 3 दिवस बंद असा करता येईल त्यामुळे सुक्ष्म सिंचनास बाधा येणार नाही.

4. सिंचन व्यवस्थापनासाठी मनुष्य्बळ अत्यंत कमी लागेल.

5. वहन नाश लक्षणीय कमी झाल्यामुळे बचत पाण्यातून भाजीपाल्यासारखी जादा फायदा देणारी पीक घेता येतील

6. सोपे- स्वस्त व्यवस्थापन असणारी, पारदर्शक, कार्यक्षम, समन्यायी, विश्वासार्ह पाणी पुरवठा व्यवस्था, निर्माण करता येतील, त्यासमवेत सिचंन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढून पाण्याची उत्पादकताही वाढेल.

घ्यावयाची काळजी :


1. प्रचलीत कालवा प्रवाही सिंचनाच्या तुलनेत ही पध्दती अत्यंत वेगळी असल्यामुळे याची कार्यपध्दती Service Provider व उपभोक्ता या देाघांनी समजून घेतली पाहीजे.

2. पाणी वापर संस्था स्थापन के ल्यानंतर लोकसहभागातून संस्थानिहाय बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामे शक्यतो एकाच हंगामात करावीत व टेस्टिंग पुर्ण करुन पाणी वापर संस्थेला हस्तांतरण करावे

3. तयार होणाऱ्या बंद नलिकांचे देखरेख् व सूरक्षा करण्याचे काम लाभधारकांचे आहे याची वारंवार जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे.

4. चकच्या मुखाशी मिळणारा विसर्ग हा पारंपारीक पध्दतीनुसार 30 लिटर प्रति सेंकद नसून विहिरीवरील पंपाच्या विसर्गा एवढा ( 5 ते 6 लिटर प्रति सेंकद) व लागवडी लायक क्षेत्राच्या प्रमाणात असणार आहे परंतू तो चार ते पाच पट जास्त कालावधीसाठी मिळणार आहे तसेच हा विसर्ग / कालावधी चकमधील सर्व लाभधारकांनी क्षेत्राच्या प्रमाणात वाटून घ्यावयाचा आहे याचीही वारंवार जाणीव त्यांना करूण देणे आवश्यक आहे.

श्री. प्रदीप भलगे, औरंगाबाद , मो : 09404141543

Path Alias

/articles/saicanna-parakalapaacayaa-laabhakasaetaraata-sauukasama-saincanaacaa-vaapara

Post By: Hindi
×