सार्थक सेवा संघ, पुणे ही एक स्वयंसेवी संस्था आहे जिचे उद्दिष्ट अनाथ, बेघर, रस्त्यावर राहणार्या, व्यसनाधीन मुला -मुलींचे चांगल्या रीतीने संगोपन करणे, स्वास्थ्य व शिक्षण देवून समर्थ नागरिक बनविणे आहे. सध्या संस्थेचा निवासी निशुल्क पुनर्वसन प्रकल्प गाव आंबळे, सासवड - यवत मार्ग, तालुका पुरंदर येथे सुरू आहे. या संस्थेत सध्या 42 लहान मुले - मुली असून त्यांची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे. निकट भविष्यात या मुलांच्या संख्येत दुप्पट - तिप्पटीने वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्याचा पुरंदर तालुका हा डोंगराळ व खडकाळ भाग असल्यामुळे कायमस्वरूपी कमी पाण्याचा पट्टा आहे. येथे मुबलक पाणी मिळणे ही एक मोठी अडचण आहे. आम्ही आमच्या संस्थेची पाण्याची गरज भागविण्यासाठी बोरवेल घेतली आहे. आमच्या जागेच्या शेजारीच एक ओढा आहे जेथून पुरंदर उपसा योजनेचे पाणी गावाकडून सरकारी शुल्क भरल्यावर सोडले जाते. Syngenta, Pune कंपनी व रोटरी क्लब, कल्याणी नगर यांच्या सहाय्याने आमच्या जागेला लागून असलेल्या 100 मीटर ओढ्याची खोली 1.5 मीटर व रूंदी 25 मीटरने वाढविण्यात आली आहे जेणेकरून पाणी ओढ्यात साचते व बोरवेलची क्षमता वाढते. यामुळे केवळ आम्हालाच नाही तर नजीकच्या 12 शेतकर्यांना ओढा खोलीकरणाचा फायदा झाला आहे व त्यांच्याही बोरवेलला पाणी वाढले आहे.
Syngenta, Pune कंपनी व रोटरी क्लब, कल्याणी नगर यांच्या सहाय्याने आमची बोअरवेल शास्त्रीय पध्दतीने रिचार्ज करण्यात आली आहे ज्यामुळे आम्हाला अपेक्षाकृत शुध्द पाणी उपलब्ध होत आहे.
Syngenta, Pune कंपनीने आमच्या संस्थेला एक मोठा वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून मुलं आता शुध्द पाणी पित आहेत.
वरील उपयोगी कार्यबद्दल Syngenta, Pune कंपनी व रोटरी क्लब, कल्याणी नगर यांचे मन:पूर्वक आभार.
डॉ. अनिल कुडिया - अध्यक्ष, सार्थक सेवा संघ, पुणे
Path Alias
/articles/saarathaka-saevaa-sanghaanae-kaelae-jalasandhaarana
Post By: Hindi