सागरशृंखला सागरमित्र अभियान - पार्श्वभूमी


अति प्रदूषित नाल्याच्या काठीच विचारमंथन झाले. सुझन राज, ललित राठी आणि विनोद बोधनकर यांनी पदरात बांधून ठेवलेले त्यांच्या जीवन- गुरूंचे संस्कार आणि आशिर्वाद एकत्र आले. तीन वेगवेगळ्या जीवन धारा, अध्यात्म, पर्यावरण, शिक्षण क्षेत्र, समाजकार्याचे क्षेत्र, उद्योग जगताचा अनुभव- अशा जीवन अनुभवांचे सार एकत्र आले :

सागरशृंखलेतील हा पहिला लेख. सागरमित्र अभियानाचे यंदा सहावे वर्ष सुरू आहे.

डॉ. विश्वास येवले यांच्या जलदिंडी मध्ये २००३ ते २००८ या वर्षात जो प्रवास व अनुभवाभ्यास झाला त्यात पुणे शहरातील जड कचरा व सांडपाणी मुळा, मुठा, पावना, इंद्रायणी व रामनदीच्या प्रवाहातून उजनी जलाशयापर्यंत पोहोचतात हे प्रत्यक्ष दिसले.

सेरी चे संदीप जोशी आणि आयलेक (ILEC - International Lake Environment Committee) चे डॉ. नाकामुरा यांच्याबरोबर पुण्यातील नदी- नाल्यांची आणि मैलापाणी शुध्दीकरण केंद्रांची पाहणी करतांना समजले की भविष्यात ज्या वर्षी पुणे शहरातून उजनीकडे जाणारे जड आणि वाहते प्रदूषण पूर्णत: थांबेल, त्यानंतर आणखी ६० वर्षांनी उजनी धरणातले पाणी पूर्ववत स्वच्छ होवू शकेल.

वसुंधरा स्वच्छता अभियानाचे अनिल गायकवाड यांच्या बरोबर रामनदी तट आणि परिसर येथे ‘दर आठवडाला एक दिवस, एक ते दोन तास, कार सेवा’ हा अनुभव घेतांना समजले की कचरा फेकणार्‍या प्रत्येक हाताने मुळात कचरा फेकूच नये. दोन वर्षे रामनदी परिसरात काम केल्यानंतर पुणे शहरातील काही नाल्यांवर ‘रामनदी स्वच्छता मॉडेल’ आम्ही काही जणांनी सुरू केले. त्यात कम्मिन्स व सीडीएसएस चे अधिकारी आणि कर्मचारी यांसोबत कोथरूड व वारझे क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत उत्साहाने काम करणारे पुणे म.न.पा. चे सॅनिटेशन इन्सपेक्टर दीपक ढेलवान व त्यांची सफाई कर्मचार्‍यांची टीम या सर्वांचा सहभाग होता.

२००९ पर्यंत, लोकसहभागातून रचलेल्या नाला सफाई कामाची पाहणी व त्यात स्वहाताने सहभाग घेवून प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंघही येवून गेले. २०११ मध्ये NSCC (National Society for Clean Citizen) च्या एका म.न.पा मध्ये संपन्न झालेल्या कार्यशाळेत, माझे ‘लोकसहभागातून जड कचरा व्यवस्थापन ’ असे व्याख्यान झाले, त्यात ‘द अकॅडेमिक अ‍ॅडव्हायझर्स’ TAA च्या सूझन राज यांना कार्म, ध्येय, तत्व आणि कार्यपध्दती आवडल्यामुळे त्यांनी हडपसर येथे वानवरी - भैरोबा नाल्यावर दर आठवडाला रामनदी मॉडेल स्वच्छतेचे अभियान सुरू केले. त्यात सीमान्तिनी खोत यांच्या पुढाकारामुळे सुझलॉन कंपनीचा सहभाग आणि सुझन राजच्या नेटवर्किंग मुळे स्थानिक प्रशासनाचाही सहभाग होता.

या अंतर्गत आम्ही विद्याभुवन, हडपसर येथील विद्यार्थ्यांना या नाल्यांवर सफाईच्या कामासाठी आणले होते. नाल्यातील व काठावरील व परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा केल्यावर त्याचे नक्की काय करायचे हे समजण्यासाठी सी.जी.एम.पी. एल (CGMPL - CLEAN GARBAGE MANAGEMENT PVT. LTD.) चे ललित राठी पण तिथे उपस्थित होते.

विद्यार्थी नाल्याजवळ पोहोचताच आम्हाला सर्वांना वाटले- हे काम त्यांच्याकडून करून घेणे योग्य नाही. काचेच्या बाटलीचा तुकडा एखाद्या विद्यार्थ्याच्या पायात घुसला तर ? चिखलात घसरून विद्यार्थी नाल्यात पडला तर ? नाल्यांच्या काठावर सापडणार्‍या मेडिकल वेस्ट मधील सुईमुळे जखम झाली तर?नको, नको ! मुलांनो, मुलींनो तुम्ही परत शाळेत जा. आम्ही लवकरच तुमच्यासाठी सुरक्षित असा कार्यक्रम रचून आणू. ’

अति प्रदूषित नाल्याच्या काठीच विचारमंथन झाले. सुझन राज, ललित राठी आणि विनोद बोधनकर यांनी पदरात बांधून ठेवलेले त्यांच्या जीवन- गुरूंचे संस्कार आणि आशिर्वाद एकत्र आले. तीन वेगवेगळ्या जीवन धारा, अध्यात्म, पर्यावरण, शिक्षण क्षेत्र, समाजकार्याचे क्षेत्र, उद्योग जगताचा अनुभव- अशा जीवन अनुभवांचे सार एकत्र आले :

‘मुलांनी घरातच स्वच्छ, कोरडे आणि रिकामे प्लास्टिक जमा करावे. फक्त स्वत: च्या घरातून , बाहेरून कदापी नाही. ते महिनाभर जमा झाल्यावर शाळेत आणावे, ते प्लास्टिक CGMPL विकत घेते आणि त्याचे वर्गीकरण होवून ते रीसायकल होते’ असा हा साधा कार्यक्रम.

२०११ आणि २०१२ मध्ये या ‘पुणे स्कूल स्टुडन्ट्स प्लास्टिक रिकव्हरी अन्ड रिसायकल प्रोजेक्ट’ मध्ये १० शाळा व त्यातील १० हजार विद्यार्थी यांनी केवळ आपापल्या घरातून जमा केलेले प्लास्टिक शाळेत दर महिन्यात आणले आणि ते पाच हजार किलो होते. ते CGMPL ने रॉ मटेरियल (कच्चा माल) म्हणून विकत घेतल्यामुळे मुलांना आणि सर्वांना स्पष्ट कळले की हे प्लास्टिक आम्ही पुढे लॅडफिल वर वगैरे मुळीच फेकणार नाही. तो करचा नाहीच मुळी.

२०१३ - १४ पर्यंत, प्लास्टिक कचर्‍यामुळे जगातील सरोवर, नदी आणि समुद्रातील जीवसृष्टीलाच धोका आहे, असे समजत गेले. २०१३ पासून या कार्यक्रमाचे ‘सागरमित्र अभियान’ असे नामकरण झाले.

तसे पाहिले तर पहिल्या दोन वर्षांच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, पालकांची व स्वयंसेवकांची मानसिकता समजत गेली. त्यातूनच विद्यार्थ्यांना सहज करता येईल असे रोजचे कार्य, शिक्षकांना अजिबात अतिरिक्त भार वाटणार नाही असा प्रकल्प, केवळ घरातील टाकाऊ प्लास्टिक आणायचे (घराबाहेरचे अजिबातच नाही) या नियमामुळे पालक ‘आमच्या मुलांना वेठीस धरून घाण कचरा उचलायला लावता’ असा अक्षेप घेणार नाहीत याची खात्री आणि मदत करण्यासाठी सरसावलेल्या स्वयंसेवकांना झपाटाने या मिळवत एका शाळेतून तीन देशांत जाणार्‍या कार्यक्रमात सहभाग - हे सगळे जुळत गेले.

आज सागरमित्र अभियान - भारत, अमेरिका आणि मोरोक्को - या तीन देशात, पुणे, जळगाव, कोटा (राजस्थान), बेनीमेल्लाळ (मोरोक्को) आणि न्यू यॉर्क (अमेरिका) या सहा शहरात सुरू आहे. त्यात केवळ पुण्यात ११० शाळा आणि त्यातील १.०५,००० विद्यार्थी सहभागी आहेत. पुण्यातील १२,००,००० विद्यार्थी सागरमित्र होणारच आहेत. त्या दिशेने वाटचाल करतांना भारत स्वच्छता अभियान, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय, स्मार्ट सिटी पुणे अभियान या अंतर्गत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर येथे १४ जानेवारी २०१६ रोजी ‘प्लास्टिक कचरा मुक्त शहर’ या राष्ट्रीय कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेने शाळा व कनिष्ट महाविद्यालयातील १२०० मुख्याध्यापकांना एकत्र आणले व १ तासाची सागरमित्र ओरिएन्टेान कार्यशाळा संपन्न झाली.

सम्पर्क


श्री. विनोद बोधनकर, पुणे , मो : ९८५०२३००६४

Path Alias

/articles/saagarasarnkhalaa-saagaramaitara-abhaiyaana-paarasavabhauumai

Post By: Hindi
×