सागरमित्र अभियान : एक नवीन पर्व - एक अनुभव


सागरमित्र अभियानात प्लास्टिक कलेक्शन साठी तुषारजी तोतला व भारत विकास परिषद यांनी पाठविलेले कलेक्शन ऑटो तसेच स्वामी वेसेल्स चे इंगळे साहेब यांनी कधी स्वत: तर कधी गाडी पाठवून आम्हाला खूपच मदत केली. विशेष उल्लेख व कौतुक करावे तो अक्षय, सुचिता, अंकिता, प्रवीण, अशोक तायडे, चेतन यांचा ते नेहमीच कधी प्लास्टिक कलेक्शन वेळी कधी सेमीनार च्या वेळी या सागरमित्र अभियानाला व संकल्प फाऊंडेशनला नेहमीच मदत करत असतात.

संकल्प फाऊंडेशन ही आमची संस्था, जळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रात मागील ४ वर्षांपासून कार्यरत आहे. आमची संस्था ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, विविध तज्ज्ञांचे व्याख्यानांचे आयोजन, ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, जल संधारण, आरोग्य शिबीरे, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात कार्य करते आहे.

काही कामानिमित्त पुण्यात गेलो असताना सागरमित्र अभियान व कार्य या विषयी माहिती मिळाली. मला त्यावेळेपासून सतत वाटत होते हा उपक्रम सुरू करावा, म्हणून मी माझे काका गणेश शिरोडे यांच्याकडून बोधनकर सरांचा नंबर मिळविला. आधी त्यांना फोनवरून विनंती केली व नंतर प्रत्यक्ष भेट घेवून जळगावला येण्याचे आमंत्रण दिले. खूप वेळा फोन, इ-मेल या माध्यमातून मी बोधनकर सरांच्या सतत संपर्कात होतो.

सर्वप्रथम ज्यावेळी त्यांची आणि माझी भेट पुण्यात झाली, त्यांनी प्रेझेंटेशन द्वारे या अभियानाची माहिती दिली व आग्रहाने सांगितले की सागरमित्र अभियान कुठल्याही नवीन शहरात सुरू करण्यासाठी शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वी चे विद्यार्थी हे जितके महत्वाचे आहेत तितकेच त्या विद्यार्थ्यांनी शाळेत आणलेल्या सागरमित्र बॅग शाळेतून गोळा करून रिसायक्लर्स पर्यंत पोहचविणे हा महत्वाचा टप्पा आहे. याची जबाबदारी घेणार असाल तर नक्कीच हा उपक्रम तुमच्या किंवा नवीन शहरात सुरू करता येईल.

पुण्याहून आल्यानंतर मी सर्वप्रथम Plastic Manufacturers आणि Recyclers यांचा शोध घेतला. यात मला माझ्या बाबांचे मित्र अशोक वाघ काका यांची खूप मदत झाली. या शोधात Swami Vessels चे इंगळे साहेब, तुषारजी तोतला, लाठी साहेब आणि त्यांची भारत विकास परिषद या अभियान बद्दल सांगितले.

अशा रितीने ३०.०९.२०१३ रोजी बोधनकर सर सर्वप्रथम जळगाव शहरात सागरमित्र अभियानासाठी आले.

जसे मला Recyclers चा शोध लागला तसा जळगाव शहरातील शाळांमध्ये हा नवीन उपक्रम व अभियान पोहचविणे सुरू करण्यासाठी मला शाळेत ओळख करून देण्यासाठी सर्वात मुख्य मदत ही माझे मित्र व मार्गदर्शक महेश दादा यांची खूपच मदत झाली. जे स्वत: पहिल्या ४ ते ५ शाळेत हा उपक्रम सुरू करण्यासाठी सोबत आले. माझी ओळख व परिचय करून दिला. तसेच ज्यावेळी ३०.०९.२०१३ रोजी बोधनकर सर्वप्रथम जळगावला आले त्यावेळी महेश दादा स्वत: त्यांनी बस स्टॉप ला घ्यायला गेले व त्याची रहाण्याची सोय केली.

पहिल्याच भेटीत ३ शाळा मध्ये सेमीनार आयोजित केला, यात केंद्रीय विद्यालय, पलोड पब्लिक स्कूल आणि ए.टी. झांबरे विद्यालय. अशा रितीने सेमीनार ला सुरूवात झाली.

दिवसभाराच्या सेमीनारनंतर आम्ही बोधनकर सरांसमवेत लाठी साहेबांच्या फॅक्टरी मध्ये मीटिंग साठी जमलो व बोधनकर सरांनी त्यांना या अभियानाबाबत सविस्तर सांगितले.

३० सप्टेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१६ या तीन वर्षात तीन शाळांपासून सुरूवात होवून आज २२ शाळांमध्ये सागरमित्र अभियान व उपक्रम सुरू झाले आहेत.

माझा तीन शाळातील - एक अनुभव :


दि. ३०.०९.२०१३ रोजी सर्वप्रथम ज्यावेळी विनोद बोधनकर सर सागरमित्र अभियानाच्या निमित्ताने जळगावला आले त्यादिवशी थोडी भिती होती की इतक्या दूरून जळगावला सर येणार, शाळेत व्यवस्थित नियोजन होईल काय, Manufacturers ची भेट होईल का ? पण चांगल्या कार्याची सुरूवात चांगलीच होते. त्या पध्दतीने पहिला दिवस बोधनकर समवेत सागरमित्र अभियानाच्या व्यवस्थेत खूप सुंदर गेला. सरांचे विचार, उद्देश, कार्य, स्वभाव यामुळे तर माझी सर्वच भिती दूर झाली. व्यावसायिक वक्ता व समर्पित कार्यकर्ता किती वेगळा असतो हे मला जाणवले. बोधनकर सरांचे सागरमित्र अभियानासाठीचे योगदान व समर्पण हे एक दिव्यच होते माझ्यासाठी. अभियान सुरू करण्यासाठी सरांनी मला दिलेली जबाबदारी ही खरोखरच एक माझ्यासाठी परिक्षा सारखीच होती. त्या जबाबदारीची जाणीव ठेवून मी पण सागरमित्र अभियान हे एक नवीन आव्हान म्हणून स्वीकारले.

गेल्या तीन वर्षात तीन शाळांपासून सुरू केलेले हे अभियान आज जळगाव व पाचोरा तालुक्यातील २२ शाळांमध्ये सुरू आहे.

सागरमित्र अभियान खूपच सोपे व तितकेच जबाबदारीचे आहे. आम्ही विद्यार्थ्यांना एका पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे जगात व स्थानिक जलात होणारे प्रदूषण किती भयंकर आहे व त्यातल्या त्यात जगभरातील इयत्ता ५ वी ते ९ वी त्या विद्यार्थ्यांना या प्रदूषणातील सर्वात छोटी समस्या ही प्लास्टिक ची असून आपण त्यावर कशी मात करू शकतो हे त्यांना शिकवतो, ते सागरमित्र अभियानाच्या नियमावलीतून ते असे -

१. इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनीघरी सागरमित्र बॅग ठेवावी.
२. या मुलांनी / मुलींनी आपल्याच घरातील कोरडे, स्वच्छ व रिकामे प्लास्टिक हे सागरमित्र बॅगेत ठेवावे.
३. ही सागरमित्र बॅग महिन्यातून एकदा शाळेत आणावी.
४. सागरमित्र टीम ही बॅग Plastic Manufactures किंवा Recyclers कडे घेवून जाणार.
५. अशा रितीने जे प्लास्टिक कारखान्यात तयार झाले ते परत फॅक्टरीत पाठविले.

इतका सुंदर उपक्रम हे सागरमित्र अभियानात आहे. जळगाव शहरात सागरमित्र अभियान आज २२ शाळांमधून सुरू आहे. यातील विविध शाळांचा अनुभव हा खूप सुंदर आहे.

सौ. तळेले मॅडम यांनी त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांनी सागरमित्र अभियानात सामील होण्यासाठी घेतलेले उपक्रम, परिश्रम खूपच छान आहेत. प्रत्येक कलेक्शनच्या वेळी मॅडमची बॅग ही आवर्जून असणारच. डिसेंबर २०१५ ला त्यांनी संपूर्ण शाळेत सागरमित्र अभियानात सामील व्हावे म्हणून स्वत: खर्च करून वर्गानुसार पुस्तके बक्षिस म्हणून दिलेत. केंद्रीय विद्यालयातील श्रीकुमार सर यांनी तर प्रत्येक पालकांना मोबाईलद्वारे संदेश पाठवून सागरमित्र बॅग शाळेत आणायला सांगितले.

तसेच या शाळेतील मिनाक्षी पाटील, ज्योती कामत मॅडम आणि तारू सर यांचे नेहमीच विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सामील होण्यासाठी प्रोत्साहन असते. ओरिऑन सी.बी.एस.सी शाळेतील सुषमा कांची मॅडम या तर नेहमीच सागरमित्र अभियानात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून आव्हान करीत असतात. का.उ.कोल्हे शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षण कोळी सर हे नेहमीच सागरमित्र साठी मुलांना प्रोत्साहित करत असतात. सिध्दीविनायक विद्यालयात खोडपे सर, माकडे सर, पाटील सर हे नेहमीच सागरमित्र अभियान त्यांच्या शाळेत राबविण्यासाठी मदत करीत असतात. नंदीनाबाई विद्यालयातील चारू पाटील मॅडम यांचे झालेले व्याख्यान खरोखरच खूप सुंद अनुभव होता. शाळेव्यतिरिक्त आय.एम.आर महाविद्यालयात डॉ. काटवरे सरांनी वेळोवेळी केलेले योगदान व मार्गदर्शन हे खूपच महत्वपूर्ण आहे.

सागरमित्र अभियानात प्लास्टिक कलेक्शन साठी तुषारजी तोतला व भारत विकास परिषद यांनी पाठविलेले कलेक्शन ऑटो तसेच स्वामी वेसेल्स चे इंगळे साहेब यांनी कधी स्वत: तर कधी गाडी पाठवून आम्हाला खूपच मदत केली. विशेष उल्लेख व कौतुक करावे तो अक्षय, सुचिता, अंकिता, प्रवीण, अशोक तायडे, चेतन यांचा ते नेहमीच कधी प्लास्टिक कलेक्शन वेळी कधी सेमीनार च्या वेळी या सागरमित्र अभियानाला व संकल्प फाऊंडेशनला नेहमीच मदत करत असतात.

या सागरमित्र अभियानाच्या माध्यमातून त्या सर्व विद्यार्थ्यांची ताकद ही सर्वात महत्वाची आहे की जे मागच्या तीन वर्षांपासून आमच्या समवेत आहेत. सर्व शाळांचे मुख्याध्यापक - मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील आम्ही ऋणी आहोत की ज्यांनी स्वच:चा वेळ व शाळेचा महत्वाचा वेळ आम्हास या सागरमित्र अभियानास दिला. सर्वांपेक्षा मी विनोद बोधनकर सरांचा खूप ऋणी व आभारी आहे की त्यांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या अभियानाची जबाबदारी व्यक्तिश: व संकल्प फाऊंडेशनला दिली.

सम्पर्क


विशाल सोनकुल, मो : ९६६५२८३६२१

Path Alias

/articles/saagaramaitara-abhaiyaana-eka-navaina-parava-eka-anaubhava

Post By: Hindi
×