पवई सरोवर - भारतातील प्रसिद्ध सरोवरे : 5


हे एक कृत्रिम रित्या निर्माण करण्यात आलेले सरोवर होय. या सरोवराखालील जागा फ्रामजी कावसजी पवई यांना इंग्रज सरकारने लीजवर दिली होती. हे श्रीमान पवई पश्‍चिम भारतातील अ‍ॅग्रीकल्चरल व हॉर्टिकल्चरल सोसायटीचे उपाध्यक्ष होते. त्यांचे जागावर १८९१ साली या सरोवराची निर्मिती झाल्यामुळे त्यांचे नाव या सरोवराला देण्यात आले. या सरोवराच्या काठावर आयआयटी व निटी सारख्या प्रसिद्ध संस्था वसल्या आहेत. ज्यावेळी बांधण्यात आले त्यावेळी या सरोवराचा आकार २.१ चौरस किलोमीटर (म्हणजे ५२० हेक्टर) एवढा होता. हे सरोवर जास्त खोल नाही. त्याची सरोसरी खोली वेगवेगळ्या ठिकाणी ३ ते १२ मीटर एवढीच आहे. सुरवातीच्या काळात या सरोवरातील पाण्याचा वापर मुंबईकर पिण्यासाठी करीत असत. पण आता हे पाणी पिण्यासाठी अयोग्य म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे यातून शहरासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्यातरी हे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

ज्या ओढ्यावर बंधारा बांधून पवई सरोवर तयार झाले तो ओढा पूर्वी मिठी नदीला जाऊन मिळत होता. त्या ओढ्यावर दोन बंधारे बांधून या सरोवराची निर्मिती झाली आहे. हे अडविलेले पाणी मुंबई शहराला पुरविले जात असे.एका वर्षातच हे बांधकाम पूर्ण झाले. या साठी साडेसहा लाख रुपये खर्च आला. हे तयार झालेले सरोवर दररोज २०लाख गॅलन पाणी पुरवठा करीत होते. पाण्याचा दर्जा घसरल्यामुळे १८९० पासून हा पुरवठा बंद करण्यात आला. या नंतर हे सरोवर वेस्टर्न इंडिया फिशिंग असोसिएशनला भाडेपट्टीवर देण्यात आले. १९५५ साली महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन नावाची नियमित संस्था सुरु करण्यात आली व हे सरोवर त्या संस्थेला सोपविण्यात आले. या सरोवराची काळजी घेणे, ते स्वच्छ ठेवणे, त्याची डागडुजी करणे अणि त्याचे सौंदर्यीकरण करणे इत्यादी उद्देश त्याचा स्थापनापत्रात दाखविण्यात आले आहेत.

सध्या ही संस्था खालील कामात गुंतली आहे :
या सरोवरातील जलपर्णी काढणे
फिशरीज खात्याबरोबर संशोधनाला मदत करणे
सरोवराच्या पाण्याच्या गुणवत्तेचे विश्‍लेषण करणे
सरोवराचे संरक्षण करणे व अतिक्रमणे रोखणे

यो सरोवराच्या परिसरात २५०० मीमी च्या जवळपास पाऊस पडतो. दरवर्षी साधारणपणे सहादा या सारोवरातील पाणी मोठ्या प्रमाणात सांडव्यावरुन वाहते. हे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. सध्या या सरोवराचा वापर करमणूकीसाठी, जनावरे धुण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी व बगीचाला सिंचनासाठी करण्यात येतो. शिवाय शेजारील अरे कॉलनीला व लार्सन अँ टुब्रो कंपनीला स्वच्छतेच्या कामासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो.

सध्या काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येवून त्यांनी या ठिकाणी नौशाद अली सरोवर संवर्धिनी नावाची संस्था स्थापन करुन सरोवराच्या जलस्त्रेताची काळजी घेण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. असे करण्यासाठी इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅक्वॉटिक बायोलॉजिस्ट्स या संस्थेतर्फे प्रेरणा मिळाली आहे. शतकापेक्षा अधिक वर्षांचा इतिहास असलेले हे सरोवर वेगाने होणा-या शहरीकरणाचे भक्ष्यस्थान ठरले आहे. या सरोवरावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सुधारणा होणे दूरच पण संरक्षण कामातही मोठे अडथळे येत आहेत. यामुळे सरोवराचा आकार घटत चालला आहे. अनधिकृत बांधकामे व अतिर्क्रमणे मुळे सरोवराचे सौंदर्य नष्ट झाले आहे. आजूबाजूच्या टेकड्यांवर नागरी वस्ती वाढत आहे. तिथून पूर्वी जे पाण्याचे ओहेळ येत होते तिथून आता संडपाणी घेवून येणारे नाले तयार झाले आहेत. नागरी व्सीच्या विकासामुळे या परासरात जंगलतोडही वाढत आहे. सरोवरात येणा-या सांडपाण्यामुळे सरोवरातील जौवविविधता नष्ट होण्याचे मार्गावर आहे. सरोवराच्या परिसरात १०० मीटर पर्यंत कोणतेही बांधकाम करण्यात येवू नये हे संकेत असतांनाही अनधिकृत बांधकामे वाढत आहेत.

हे थांबवण्यासाठी या सरोवराचा वापर करणारे जे विविध घटक वा संस्था आहेत त्यांना एकत्र आणून त्यांचेमध्ये समन्वय घडवून आणणे आवश्यक आहे. यात संबंधित सरकारी संस्था, अशासकीय संस्था, मच्छीमार, कोळी संघटना व समाजीतील समाज सेवी संघटना यांची मोट बांधून सरोवराच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबोबदारी त्या संस्थावर सोपविण्यासाठी नौशाद अली सरोवर संवर्धिनी नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. श्रीमान नौशाद अली अंग्लिंग असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांचेच नाव घेवून ही संस्था निर्माण करण्यात आली आहे. या संस्थेची स्थापना २००८ साली करण्यात आली असून या संस्थेच्या माध्यमातून सरोवर संवर्धानाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.

Path Alias

/articles/pavai-saraovara-bhaarataataila-parasaidadha-saraovarae-5

Post By: Hindi
×