प्रयत्न भूजल पातळीच्या वाढीचे


पावसाच्या पाण्याचा स्थळ वैशिष्ट्यानुसार सांभाळ केल्यास पाणी (भूजल) पातळी स्थिरावता येते. उँचावता येते. लाव्हापाषाणांच्या थरांची रचना जवळजवळ एकमेकांस हॉरिझोन्टलंपणे तयार झालेली आहे. या थरथरांच्या भूपृष्ठीय तसेच भूगर्भिय उतारामुळेच ड्रेनेजक्षेत्रातील होणार्‍या भूपृष्ठीय पाणीवहन (रन ऑफ) द्वारे विविध थर पाणीधारक शेतात व विविध खोलीवर पाणी उपलब्ध होते.

मार्च २०१७ च्या अखेरीस आलेल्या दोन महत्वाच्या बातम्याची दखल घेणे गरजेचे आहे. पहिली बातमी म्हणजे स्कायमेट वेदर या संस्थेनुसार यंदा मान्सून सरासरी पेक्षा कमी (९५ टक्के) असेल, तसेच मान्सूनच्या काळातही सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस असणार आहे. दुसरी बातमी म्हणजे हवामान खात्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळे व नुंरबार जिल्ह्यात मागील ५-६ वर्षांदरम्यान पावसाचे प्रमाण सततपणे कमी होत आहे.

जमिनीवर साठविलेले पाणी व भूगर्भातील पाणी (भूजल) स्त्रोत पडणार्‍या पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. प्रश्‍न असा आहे, की पावसाचे पाणी भूगर्भात सांभाळायचे कसे ? त्यात वाढ करणे किती शक्य आहे ?

भूपृष्ठावर साठविलेल्या पाण्याच्या मात्रेपेक्षा भूगर्भातील पाण्याचा विस्तार खूपच मोठा आहे. राज्याच्या ८१-८२ टक्के क्षेत्रात भूपृष्ठावर व भूगर्भात अस्तित्वात असलेले लाव्हापाषाण थर इतका कठीण पाषाणाच्या तुलनेत चांगले भूजलधारक आहेत. या पाषाणातील भूजल साठवणीत पडणार्‍या पावसाच्या पाण्याचा भरणा करणे व पाणी टिकविणे म्हणजेच पाणी सांभाळणे.

उत्तर माहारष्ट्रातील तापी नदी क्षेत्रातील वाळू कणांच्या पाषाणांत पाणी सांभाळणे शक्य आहे. विशेषत: लाव्हापाषाण स्थित कार (डाईक) दरम्यानचे क्षेत्रात पावसाचे पाणी उत्तम प्रकारे सांभाळता येते. मात्र, भूजलशास्त्रीय कारणांमुळे अडचणी उद्भवतात. लाव्हापाषाणांचे निर्मितीच्या वेळी सर्वच लाव्हापाषाण थर राशी एकाच भूशास्त्रीय काळ खंडात निर्माण झालेले नाहीत. या पाषाणांची निर्मिती भूशास्त्रीय क्रेटेशियस काळखंड तसेच इयोसिन काळखंडात झालेली आहे.

प्रत्येक उद्रेक दरम्यानचे अल्पशा उद्रेकरहीत भूशास्त्रीय काळात लाव्हारस भिज प्रक्रियेमुळे लाव्हापाषाणांची निर्मिती झाली. सोबतच या अल्पशा काळखंडात पाषाणथर विघटन, धुपणी उतारनिर्मितीबरोबरच पाणीसाठवण, वहन इत्यादीस अनुकूल अशी स्थितंतरे लाव्हा पाषाण थरांत घडत होती. म्हणूनच खोलवरची पाणी उपलब्धी होत आहे.

पावसाळ्यात माती थरांबरोबरच पाषाणांतील पाणी, हवा याच्या विस्तारानुसार (वेडोज झोन विस्तार) व निर्माण होणार्‍या पाणीपातळी (खालील पाषाण साठवणीतील पाणी (भूजल) संपृक्तता व त्यामुळे निर्माण होणार्‍या सततच्या भूजल वहन प्रक्रियेमुळे ठिकठिकाणी भूजलस्त्रोत निर्माण झालेले आहेत.

पावसाच्या पाण्याचा स्थळ वैशिष्ट्यानुसार सांभाळ केल्यास पाणी (भूजल) पातळी स्थिरावता येते. उँचावता येते. लाव्हापाषाणांच्या थरांची रचना जवळजवळ एकमेकांस हॉरिझोन्टलंपणे तयार झालेली आहे. या थरथरांच्या भूपृष्ठीय तसेच भूगर्भिय उतारामुळेच ड्रेनेजक्षेत्रातील होणार्‍या भूपृष्ठीय पाणीवहन (रन ऑफ) द्वारे विविध थर पाणीधारक शेतात व विविध खोलीवर पाणी उपलब्ध होते.

वर नमूद केलेल्या परिस्थितीत शेत शिवारांचे उतारावरून वाहून जाणार्‍या (पावसाच्या) पाण्याचा वापर केल्यास, पाऊसपाणी सांभाळल्यास, विहीर /बोअरवेल पाणीपातळी मार्च अखेरपर्यंत स्थिरावता येते व भूजल सांभाळता येते.

१. विहीर क्षेत्रे : या क्षेत्रात विहीरपाणी पातळीच्या, नकाशीकरणाद्वारे परिसरातील भूजलधारण (रिचार्ज) शोधून, त्या क्षेत्रात पाऊसपाणी पसरणीपध्दतीद्वारे भूजल सांभाळता येते.

२. बोअरवेल क्षेत्रे : या क्षेत्रात बोअरवोल ड्रिलिंग कार्यवाही करतानाच जॅकेट पाईप टेक्नॉलॉजी वापरून भूजलधारणा (सांभाळ) साध्य करता येतो. हा भरणा पावसाळ्यात स्वयंभूपणे कार्यान्वित होतो.

३. तसेच, जॅकेट पाईप तंत्राद्वारे कोरडे झालेले बोअरवेल पावसाळ्यात स्वयंभूपणे रिचार्ज करता येतात.

लेखकाने वर नमूद भूजल सांभाळ / वाढ करण्यापाबतच्या संकल्पना प्रत्यक्षात अभ्यास / सर्वेक्षण व नकाशीकरण पध्दतीद्वारा कृतीत आणलेला आहे.

(लेखक महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे माजी संचालक आहेत.)

Path Alias

/articles/parayatana-bhauujala-paatalaicayaa-vaadhaicae

Post By: Hindi
×