प्रश्न पाण्याचा


धरतीला साह्य करणाऱ्या जलरक्षक वृक्षांची तोड केल्यानेच धरती वरील पाणी कमी झाले आहे. त्यात लोकसंख्येने गावागावातून वाहणारे ओढे, नाले, तलाव, व विहिरी बुजवून आपण सिमेंटची जंगले वाढविली. निसर्ग ह्या धरतीच्या स्वर्गाचे नरकात रूपांतर करत आहोत. ओढे, नाले, विहिरी बंद केल्या. नद्यांमध्ये जाडारोडा टाकून नद्यांचे मार्ग बदलले. सागरावर घरे व पुल बांधले ह्याचमुळे वरूणाचे हे पाच सहाय्यक (ओढे, नाले, विहिरी, नद्या व सागर) मानवावरच कोपले आहेत. कारण धरतीवरील उष्णता वाढली. वृक्ष तोडीने पाऊस कमी झाला. धरणे आटू लागली कारण ओढे, नाले, तलाव, नद्यांमुळे मिळणारे पाणी कमी झाले. पण आम्हा शहरवासियांना खरी पाण्याची किंमतच कळत नाही. पाणी वाया घालविणे हा शहरवासियांचा जन्मसिध्द हक्कच शहरात (पुणे) दोनदा पाणी येते. मग सकाळचे भरलेले पाणी संध्याकाळी ओतून संध्याकाळी ताजे भरायचे.

पाणी ह्या शब्दाला उदक, जल, आणि जीवन हे समान शब्द आहेत. त्यातील जीवन ह्या शब्दाचे पुन्हा दोन अर्थ : जीवन म्हणजे पाणी हा वर आलाच आहे. पण जीवन म्हणजे ईश्वर निर्मित सजीव जे जन्मापासून मृत्यू पर्यंत जगतात ते सुध्दा जीवनच आहे. ह्याचाच अर्थ जीवनाशिवाय नाही जीवन.

आपण जर पाहिले तर, पाणी व आपले अर्थात सजीवांचे जीवन हे दोन्हीही संयुगे आहेत. पाणी तयार होण्यासाठी प्राणवायू व हायड्रोजन वायू एकत्र झाल्यावर पाणी निर्माण होते. वर स्त्री व पुरूष अर्थात माता पिता ह्यांच्या तनुमिलनातून मानवी तर स्त्री व पुरूष नरमादी ह्यांच्या मिलनातून प्राणी - पक्षी, वृक्ष पुंकेशर (+ स्त्री केशर) प्राणी जीवन सुरू होते.

जीवन ह्या शब्दात आणखी एक गंमत आहे. जीवन ह्या शब्दातील पहिली दोन अक्षरे घेतली तर जीव हा शब्द जीव म्हणजे हालचाल किंवा मुंगीपासून मानवापर्यंत सर्व जीवांची हालचाल. दुसरे तिसरे अक्षर घेतले की वन. वन ह्या शब्द तयार होतो. वन म्हणजे वृक्षांचे घनदाट जंगल किंवा वृक्षाचे निवासस्थान होय. मानवापेक्षा जास्त वृक्षांना पाणी अर्थात जीवनाची गरज असते.

वृक्ष हे आपल्या मुळाशी पाणी साठवून ठेवतात. तसेच जमिनीला आधार देतात. दिवसा स्वत: विषारी कार्बनडाय वायू घेऊन शुध्द चांगला सजीवांना लागणारा प्राणवायू देतात. प्राणवायू शिवाय जीवनच नाही. हे वृक्ष जाणतात म्हणून सजीवांसाठी पाणी साठा करतात. ह्यामुळे धरतीची धूप थांबते वातावरणातील उष्णता कमी होते. हे आता शास्त्रज्ञ म्हणू लागले.

आपल्या भारतीय संस्कृतीत वृक्षांना महत्व आहे. वृक्षांची पूजा केली जाते. जेष्ठात वटवृक्ष, अश्विनात आपरावृक्ष, कार्तिकात आवळा वृक्ष, तसेच दररोज तुळस वृक्षाची पूजा ही घरोघरी अंगणात केली जाते. अहो! येवढेच काय तर ह्या निसर्गाला ज्या ʇक्षʈ शक्तीने अर्थात सगुण निर्गुण अशा परमेश्वराने निर्माण केले. त्या परमेश्वर अर्थात ईश्वराला सुध्दा वृक्ष फार आवडतात. म्हणूनच श्री.शिवशंकर (पार्वतीला बेलाचे पान - बेलवृक्ष) त्यांचे सूपूत्र विग्नहर दु:खहर्ता देवता श्री गणेशाला दुर्वा वनस्पती वाहिली जाते. श्री विष्णूंना तुळस वाहिली जाते. ह्याचाच अर्थ वृक्षांशिवाय खरे जीवन नाही. म्हणूनच संत शिरोमणी श्री पांडुरंग भक्त श्री संत तुकारामांनी म्हटले वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे.

खरे जिथे नाही वन, तेथे कसा वाहिल पवन, पवना शिवाय नाही वरूण, वरूण म्हणजे धरती वरील सजीवांचे खरे जीवन जिथे माही मन तेथे कसले सुखी जीवन ह्या वनस्पती अर्थात वृक्षांमुळे भारत खंडात वसंत, ग्रीष्म, वर्षा व शरद ऋतूत पाऊस पडतो. ह्या चार ऋतूत जलाभिषेक करतो. पण आपण अर्थात मानवाने स्वत:च्या स्वार्थी निवासाकरता शहरावर शहरे वसवून वृक्षांची तोड केली ह्याचमुळे सर्व विश्वात पावसाचे प्रमाण कमी झाले. खरे तर सुंदर सुखी जीवनाची खरी हमी आहे पाणी.

खरे तर विश्वात वृक्ष कमी झाल्याने धरती ही रूक्ष होऊ लागली आहे. वरूण अर्थात पावसाचे स्वागत करायला वृक्षच नाही. मग तो येणार कसा. वरूण म्हणजे पाऊस नाही. पाऊस म्हणजे पाणी नाही. पाणी नाही म्हणजे सुखी जीवन नाही.

आता ह्या वरूण मधील पावसाची गंमत पहा. हा पाऊस धरतीवर बिंदूरूपाने पडतो. असंख्य बिंदूतून धरतीवर वर्षाव केल्यावर हे बिंदू एकत्र येऊन डोंगर उतारावरून स्वत:ला ओढा, झरा, विहीर, नदी, सागरात अर्थात सिंधूत रूपांतर करतात. ह्या सिंधूचा बिंदू होण्यासाठी निसर्गाचे एक महान कोडे आहे. ते असे (दोन पुरूषांच्या मिलनातून एका स्त्रीचा जन्म होतो.) ती स्त्री एका पुरूषाला जन्म देते. तो पुरूष धरतीला जीवन अर्थात पाणी देतो. तर हे तीन पुरूष कोण? व एक स्त्री कोण?

ह्या कोड्याचे उत्तर आहे - रत्नाकर - अर्थात सागर आणि सूर्य अर्थात सूर्याचा किरण व सागराचा बिंदू ह्यांच्या मिलनातून वाफ ही स्त्री तयार होते (पहा सूर्य व सागर हे दोन्ही पुरूष ह्या मिलनातून वाफ ही स्त्री (लिंग) वाफ ही मेघाला (ढगाला) जन्म देते वाफे पासून (मेघ) ढग तयार होतो. ह्या (मेघा) ढगापासून पाऊस पडतो (ढग अर्थात मेघ पुन्हा पुरूष) हा निसर्ग पहाना बिंदू पासून सिंधू तर सिंधू पासून बिंदू निर्माण करतो (सिंधू व बिंदू दोन्ही स्त्रीलिंग)

तर पाण्याचा हा सिंधू बिंदू खेळ अनादिकालापासून चालू आहे. हा सिंधू बिंदू खेळ धरतीवर घडवून आणतो जीवनाचा अर्थात पाण्याचा मेळ ह्या सिंधू बिंदू खेळाचा खरा साक्षीदार वरूण. वरूणाचे (पाऊस) आपल्या धरतीवर खरेच आहे ऋण. वरूण आपल्या असंख्य बिंदूद्वारा धरतीवर पाण्याचे ठिबक सिंचन करतो. ह्यामुळे ओढे, नाले, विहिरी, सरिता (नद्या) व सागर सतत वाहत असतात.

आता पहा पाणी अर्थात पाण्याचा प्रश्न पाऊस व्यवस्थित पाहिजे असेल तर वृक्ष जोपासना केली पाहिजे. पाऊस व्यवस्थित व चांगला पडला तर झरे, ओढे, विहिरी, नद्या, भरभरून वाहतील सागराला चांगली भरती येईल. वृक्षांमुळे धरतीवरील उष्णता कमी होईल. अन्नधान्याचे उत्पादन जास्त होईल.

धरतीला साह्य करणाऱ्या जलरक्षक वृक्षांची तोड केल्यानेच धरती वरील पाणी कमी झाले आहे. त्यात लोकसंख्येने गावागावातून वाहणारे ओढे, नाले, तलाव, व विहिरी बुजवून आपण सिमेंटची जंगले वाढविली. निसर्ग ह्या धरतीच्या स्वर्गाचे नरकात रूपांतर करत आहोत. ओढे, नाले, विहिरी बंद केल्या. नद्यांमध्ये जाडारोडा टाकून नद्यांचे मार्ग बदलले. सागरावर घरे व पुल बांधले ह्याचमुळे वरूणाचे हे पाच सहाय्यक (ओढे, नाले, विहिरी, नद्या व सागर) मानवावरच कोपले आहेत. कारण धरतीवरील उष्णता वाढली. वृक्ष तोडीने पाऊस कमी झाला. धरणे आटू लागली कारण ओढे, नाले, तलाव, नद्यांमुळे मिळणारे पाणी कमी झाले. पण आम्हा शहरवासियांना खरी पाण्याची किंमतच कळत नाही. पाणी वाया घालविणे हा शहरवासियांचा जन्मसिध्द हक्कच शहरात (पुणे) दोनदा पाणी येते. मग सकाळचे भरलेले पाणी संध्याकाळी ओतून संध्याकाळी ताजे भरायचे. संध्याकाळचे सकाळी ओतून पुन्हा ताजे भरायचे. त्यात हंडा, घागर वाहून गेली तरी ह्याची चिंता नाही. ह्यासाठी एकच गोष्ट करायची दिवसातून एकदाच तीन तास पाणी सोडायचे. तरच पाण्याची बचत होऊ शकते.

आपल्या पुणे शहराबद्दल बोलायचे झाल्यास पुणे तेथे काय उणे. हे वाजविले जाते तुणतुणे. खरे तर म्हणायची पाळी आली पुणे तिथे सारेच उणे. कारण ना येथे कोणाचे लक्ष. खरे तर पुणे तेथे काय उणे हे खरे आहे. पुणे करांना वाटते खडकवासला व पानशेत ही धरणे ह्यांच्या पाण्यासाठीच आहेत. पाणी कपात करायचे म्हटले तर लगेच आंदोलन करायला सिध्द.

खरे तर पुणे हे शहर डोंगराने वेढलेले आहे. हे पाहूनच श्री शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांच्या कालापर्यंत पाहिले तर त्यातल्या त्यात पेशवे काळी पेशव्यांनी पुणे शहराभोवती कात्रज येथे कात्रज तलाव, पाषाण येथे पाषाण तलाव, सासवड मार्गावरील दिवाघाटातील मस्तानी तलाव बांधले. ह्या तलावाच्या पाण्याचा वापर होत होता तो लोकांच्या पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी. कात्रज व पाषाण तलावाचे पाणी पुणे शहरात अर्थात सदाशिव, नारायण, शनिवार, कसबा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार तसेच नागेश व रस्ता पेठेला पुरवले जात होते. ह्या खुणा पूर्वी होत्या. ह्या पाणीपुरवठ्याचा मार्ग आहे. तो बंद केला. ह्या मार्गाचे अर्थात पाणी पुरवठा मार्गाचे पुन्हा निरीक्षण करावे ह्यासाठी पाणी पुरवठाधिकारी जलमंत्री ह्यांनी खडकवासला येथील जलसंशोधन केंद्राची अर्थात सी डब्ल्यू पी आर एस ह्यांच्याशी संपर्क करावा. तसेच पाषाण तलावाचे पाणी हे वापरता येईल ते पाषाण, औंध, सुतारवाडी ते हिंजेवाडी पर्यंत तसेच पाषाण पासून कोथरूड बावधन, शिवाजीनगर परिसरातील पाणी पुरवठा केला जाईल असे पहावे. ह्यामुळे खडकवासला व पानशेत ह्यांचा भार कमी होईलच. ह्या धरणांच्या पाण्याचा वापर कालव्याद्वारे जास्तीत जास्त केला जाईल तो शेतीसाठी. येथे शेतकरी हित होय.

आता पुणे शहरावर उपनगरे खूप झाली परंतु येथे विहीरी होत्या. लोक विहिरींचे पाणी वापरायचे. साधे धनकवडी ह्या उपनगराचे उदाहरण घेऊ. येथे कात्रज तलाव जवळ आहे. तळजाई टेकडीवर मोठी विहीर आहे. सध्या राऊत बाग वसाहत आहे तेथे मोठी विहीर आहे. ह्याला बारामाही पाणी झऱ्याद्वारे येते. जनकवडी बस स्टॉप जवळ मोडकांची विहीर ह्या सगळ्या विहीरी बुजवल्या गेल्या त्यावर बोअर केले आणि पंपाद्वारे एका मोठ्या उंच टाकीवर जर पाणी सोडले तर नक्की धनकवडी, आंबेगाव, बालाजीनगर ह्यांना ह्याचा पाणी पुरवठा होऊ शकतो.

आपल्या महाराष्ट्रात वसंत ऋतूत वळवाचा पाऊस पडतो तेव्हा हा पाऊस पाणी पाणी करून जातो. ग्रीष्म व वर्षाऋतूत पाऊस पडतो. पाऊस जाता जाता अर्थात शरदऋतूत हस्ताचा पडतो तेव्हा सुध्दा सर्वत्र पाणी वाहते ह्या पाण्याचा वापर करावा. तो विहीरीवर तलावासाठी पुणे शहरातून कात्रज वरून येणारा अंबीलओढा तो कात्रज,पद्मावती, सहारानगर, अरण्येश्वर, पर्वती पायथा पार करून नदीला मिळतो. हे पाहून पेशवेकाळी तळ्यातील श्री गणपती होता. आता तेथे सारसबाग आहे म्हणजे तळे बुजवून बाग तयार झाली. पाण्याचा मार्ग अडला मग ह्या ओढ्याला पूर आला की लोकांच्या घराचे नुकसान होते. ह्यापेक्षा ह्याच अंबील ओढ्यावर जर छोटेसे धरण किंवा तलाव तयार केला तर ह्या पाण्याचा वापर होऊ शकतो.

ह्याला म्हणतात पुणे तेथे काय उणे. आता पहा केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. ते म्हणजे पुण्याभोवती भरपूर टेकड्या आहेत. ह्यावर वृक्ष जोपासना करू त्यामुळे पाऊस चांगला होईल. ह्या गोष्टीचा महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे. अहो निसर्गाला व परमेश्वराला सर्व सजीवांच्या जीवांची काळजी आहे. म्हणूनच प्रत्येक गावातून ओढे, नाले, विहिरी, नद्या आहेत. पण आपण आपले नुकसान करतो. हे आपल्या लक्षात येत नाही. असा विचार केला तर प्रत्येक गावातील पाण्याचा प्रश्न फार कमी होईल. फक्त लक्षात घ्यायचे कमी तेथे आम्ही. निसर्गाला आम्ही नाही लेखणार कमी. पुन्हा म्हणावे वाटते केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आपण लक्षात घेतले पाहिजे.

जिथे नाही वृक्ष वन तेथे कसा वाहिल पवन. पवनाशिवाय नाही वरूण. वरूण म्हणजे (पाऊस) धरतीवरील सजीवांचे जीवन, अर्थात पाणी. ह्याचे करू आम्ही रक्षण. तर खरे होईल धरतीवरील सुखी जीवन.

श्री. यशवंत वाळवेकर, पुणे

Path Alias

/articles/parasana-paanayaacaa

Post By: Hindi
×