पाऊस जपून ठेवला पाहिजे - 2


लेखाचा उत्तरार्ध .......

भूगर्भातील पाणी हे पिण्याच्या व ओलितासाठी लागणार्‍या पाण्याच्या मत्वचा स्त्रोत आहे. आपल्या राज्यात सध्या होत असलेल्या ओलिताखालील एकूण क्षेत्रांपैकी विहीरींद्वारे भूगर्भातील पाण्याचा उपसा करून भिजणारे क्षेत्र 55 टक्के आहे व इतर साधनांनी भिजणारे क्षेत्र 45 टक्के आहे. म्हणजेच भूगर्भातील पाणीसाठा हा उपलब्ध विविध प्रकारच्या जलस्त्रोतांपैकी शाश्‍वत व वर्षभर उपलब्ध असणारा जलस्त्रोत आहे. त्याचा वापर नीट काळजीपूर्वक व्हायलाच पाहिजे.

यावरूनही काही अंदाज काढता येईल. श्री. व्ही. एस. अभ्यंकर यांनी या विषयाचा प्रकराच्या जमिनींचा अभ्यास केला आहे. त्यात त्यांनी मोकळ्या जागेचे प्रमाण 46 पासून 63 पर्यंत दिले आहे. या जमिनी कोकणातील व महाराष्ट्रातील 15 - 20 ठिकाणच्या आहेत. यावरूनही काही कल्पना येईल. महाराष्ट्रातील जमिनीत साधारणपणे 45 ते 55 टक्क्यांपर्यंत मोकळी जागा असते असे मानण्यास हरकत नाही. याच हिशोबाने त्या त्या जमिनीत 45 ते 50 टक्क्यांपर्यंत पाणी जाण्यास हरकत नाही. याच प्रयोगात पाणी किती प्रमाणात मावू शकते याचाही अभ्यास त्यांनी केला आहे. त्यावरून काही काही जमिनीत शेकडा 80 टक्के पर्यंत पाणी मावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्रातील जमिनीत अशा प्रकारे पाणी साठविण्यास बराच वाव आहे. एवढी गोष्ट या संशोधनावरून स्पष्ट आहे. जमिनीत मुरणारे पाणी हे जमिनीच्या कणांवर अवलंबून आहे. जमिनीचे कण जर अगदी बारीक असले तर त्या दोन कणांमधून पाणी आत शिरताना बरेच घर्षण होवून ते पाणी आत शिरेल व त्यास साहजिकच वेळ लागेल व पडणारा पाऊस जर जोराने येत असेल आणि जागेस जर उतार असेल तर पाणी आत मुरण्यास वाव नसल्याने वाहून जाईल. ही परिस्थिती जमिनीचे कण मोठे असल्यास जरा कमी प्रमाणात होईल व वाळू असल्यास सर्वच पाणी मुरेल. वाळूंत जरी पाणी लवकर मुरले तरी बारीक कणांच्या जमिनीत असणारी, मोकळी जागा मात्र वाळूपेक्षा जास्त असते. मात्र त्यात पाणी मुरण्यास वेळ लागतो. या प्रकारे मुरणार्‍या पाण्याचे पडणार्‍या पावसाशी काय प्रमाण असते ते काही प्रयोगात ठरविले आहे.

पाण्याचा निचरा :


पावसाच्या मुरलेल्या पाण्याच्या विल्हेवाटीत मुरलेले पाणी वाहून जाण्याचा एक पर्याय आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरले म्हणजे ते उताराकडे वहात जात असतेच हे पाणी मुरण्याच्या अवस्थेत असले व उतार असला म्हणजे जमिनीतून वाहून जाते. ते किती प्रमाणात जाते याचेही संशोधन केले आहे. यात निचरून जाण्याजोगे पाणी असून त्या जमिनीत उघडीप पडून अथवा पिक काढून पाणी वाफ होवून बाहेर जावू दिले नाही तर किती निचरा होवू शकेल याचे निष्कर्ष काढले आहेत.

या सर्व निषकर्षाचा विचार करता भूगर्भात साठलेले पाणी, जे विहीरीमार्फत मिळते, त्या पाण्याची जपणूक करणे आवश्यक आहे. त्या जपणुकीत अनेकांचा म्हणजे पिकाचा विचार अभिप्रेत आहे.

पाणी साठवण म्हणजे पाण्याची जपणूक :


भूगर्भातील पाणी हे पिण्याच्या व ओलितासाठी लागणार्‍या पाण्याच्या मत्वचा स्त्रोत आहे. आपल्या राज्यात सध्या होत असलेल्या ओलिताखालील एकूण क्षेत्रांपैकी विहीरींद्वारे भूगर्भातील पाण्याचा उपसा करून भिजणारे क्षेत्र 55 टक्के आहे व इतर साधनांनी भिजणारे क्षेत्र 45 टक्के आहे. म्हणजेच भूगर्भातील पाणीसाठा हा उपलब्ध विविध प्रकारच्या जलस्त्रोतांपैकी शाश्‍वत व वर्षभर उपलब्ध असणारा जलस्त्रोत आहे. त्याचा वापर नीट काळजीपूर्वक व्हायलाच पाहिजे.

त्यादृष्टीने भूगर्भातील पाण्याचा वापर करून पावसाळ्यानंतर भूजल पातळी कायम ठेवण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा स्त्राव दरवर्षी होतो की नाही याकडे शेतकर्‍यांचे लक्ष असणे जरूरीचे आहे. तशी ती सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी आहे. याकडे दुर्लक्ष केल्याने पुष्कळशा भागातील भूजल पातळी खूप खोलवर गेेलेली आहे. व त्यामुळे काही भागातील बगीचेसुध्दा वाळलेले आहेत. (विदर्भातील वरूडचा भाग) म्हणून भूगर्भातील पाणी साठवण ही तरी नैसर्गिक होणारी क्रिया असली तरी त्यात मानवी प्रयत्नानी भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य उपाय योजून भूगर्भातील पाण्याचा भराव वाढविणे जरूरीचे आहे. त्यासाठी खालील उपायांद्वारे पावसाचे पाणी जमिनीवर किंवा खाली अडवून भूगर्भात जिरविता येईल.

जलपुनर्भरणाचा विचार आज होणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीत मुरलेल्या पाण्याचा विचार करावा लागेल.

महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वार्‍याबरोबर येणार्‍या पावसाचे प्रमाण सह्याद्री डोंगराच्या दुतर्फा सानिध्यातील प्रदेशात जास्त (2700 ते 6000 मि.मी) आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या भूप्रदेशात पावसाचे प्रमाण घटत जाते (500 ते 750 मि.मी) व ते विदर्भात बर्‍यापैकी म्हणजे (750 ते 1300मि.मी) आहे. सर्वसाधारण कोरडवाहू पिकांची पाण्याची गरज पाहिली तर वेगवेगळ्या विभागातील हा पाऊस फार कमी आहे. असे म्हणता येणार नाही. कारण बहुतेक कोरडवाहू पिकांना त्यांच्या पूर्ण वाढीकरता 40 ते 50 सें.मी पाणी लागते व बहुतांशी इतका पाऊस मराठवाड्यातील काही भूप्रदेश सोडल्यास महाराष्ट्रात सर्वत्र पडतो. तरीसुध्दा आपण पाहतो की, आपल्या राज्यात वेगवेगळ्या विभागात बर्‍याचदा एक पीक सुध्दा आपल्याला घेता येत नाही. बहुतांशी एका पाण्याने पिकांची अपरिमीत हानी होते. या स्थितीकरीता प्रामुख्याने पुढील दोन कारणे देता येतील.

1. मोसमी वार्‍यांबरोबर येणारा पाऊस हा अनियमित व लहरी आहे. दिवसेंदिवस त्याचे वितरण बेभरवशाचे होत चालले आहे. आवश्यकता नसतांना पाऊस खूप येतो व जेव्हा गरज असते तेव्हा येत नाही.

2. आपल्या पारंपारिक शेती करण्याच्या पध्दतीत अवेळी झालेला व जास्त झालेला पाऊस साठवून ठेवून तो जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरण्याची काहीच व्यवस्था नाही.

एकूण पडणार्‍या पावसापैकी काही पाणी जमिनीत मुरते काहींचे बाष्पीभवन होते तर काही भूपृष्ठावरून जावून नदीनाल्यांना मिळते. तसेच खोलगट भागात साठून राहिलेले पाणी जमिनीत खोल मुरून ते भूगर्भातील पाण्याला जावून मिळते. अशा तर्‍हेने निसर्गापासून मिळणार्‍या पाण्याचा विनीयोग होत असतो.

अभ्यासावरून असे आढळून आले आहे की, एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी साधारणत: 16 ते 20 टक्के पाणी भूपृष्ठावरून वहात जाते. 65 ते 70 टक्के पाणी पिकांच्या उपयोगी येते. जमिनीतून बाष्पीभवन होते व काही जमिनीतच राहते. 1 ते 12 टक्के पाणी भूगर्भातील पाण्याला जावून मिळते. जमिनीवरून वहात जाणारे पाणी शेताबाहेर गेल्यानंतर ओढा, नाला, याद्वारे ते नदीला मिळते आणि समुद्रापर्यंत वहात जाते. म्हणून अशा प्रकारे वाया जाणार्‍या पावसाच्या पाण्याला जागोजागी अडविले किंवा जमिनीमध्ये जिरविले तर कोरडवाहू शेतीला दरवर्षी भेडसावणार्‍या पाण्याच्या प्रश्‍नांची तीव्रता नक्कीच कमी होवू शकते.

भूगर्भात साठलेले पाणी म्हणजेच आपल्या हातात आहे. ह्या पाण्याची जपणूक करून शेती करणे फायद्याचे होणार आहे.

महाराष्ट्राच्या पाणी पुरवठ्याचा विचार करता भूगर्भातील पाणीपातळी वृध्दिंगत करणे, जलपुनर्भरणाच्या सर्व यशस्वी तंत्राचा वापर करणे, पाणी वाया जावू न देता, त्यात ठिकठिकाणी अडवून उपयोगात आणणे या सर्व गोष्टीचा विचार आज अभ्यासपूर्ण रितीने होणे आवश्यक आहे. पाणीटंचाई व पाण्याचे दुर्भिक्ष्य यावर मात करण्यासाठी जलपुनर्भरण आवश्यक आहे. याचा आता गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात पडणारा पाऊस, खडकांचे प्रकार, पाणी मुरण्याची क्षमता व मिळालेले पाणी जपून ठेवण्याचा उद्योग करणे आवश्यक आहे.

जमिनीत मुरलेले पाणी मुख्यत: 3-4 अवस्थेत भूगर्भात असते. यापैकी काही अवस्था या भूगर्भातील पाणी पुरवण्याच्या दृष्टीने उपयोगी नाहीत. त्यापैकी म्हणजे हायग्रास्कोपी व कॅपिलरी पाणी या होत. या दोन अवस्थांत असलेले पाणी मातीच्या कणांच्या भोवती व त्याच्या आकर्षण कक्षेत असल्याने ते कणांपासून अलग होवू शकत नाही. झाडाच्या मुळातच फक्त जास्त आकर्षाने शोषण करू शकतात. साहजिकच या दोन प्रकारच्या पाण्याचा विहीरीच्या पाण्यास किंवा नदीच्या पाण्यास झर्‍याच्या स्वरूपात वर्षभर पुरवठा झाल्यास उपयोग नाही. जमिनीतील कणांमध्ये जी जागा असते त्या जागेत साठलेले जे पाणी असते ती जमिनीतील पाण्याची तीसरी ग्रॅव्हीटेशनल (गुरूत्वाकर्षणाने खाली निचरून जाणारे) अवस्था होय. हेच पाणी मुख्यत: विहीरीच्या पाणीपुरवठ्यास व नद्यांमधून वाहणार्‍या झर्‍यांना पुरवठा करण्यास उपयोगी पडते. पाण्याची ही अवस्था या दृष्टीने फार महत्वाची आहे. यानंतर काही ठिकाणी नैसर्गिक विवरे आहेत. त्यातून पाणी साठल्याने जमिनीत एक प्रकारचे डोहच निर्माण होतात. एखाद्या ठिकाणी एखादा (Outcrop) भाग वर आला व मागे खोलगट भाग असला तर अशा ठिकाणीही भूगर्भात पाण्याचा साठा होवू शकतो.

याचप्रमाणे दगडाच्या दोन थरांमधील मुरमाचे थर व दगडास असलेल्या भेगा यांचाही उपयोग होवून तेथे पाणी साठते. या सर्व प्रकारच्या जमिनीच्या कणांमधील साठलेले निचरून जाण्याजोगे जे पाणी असते तेच मुख्यत: उपयोगी असते. त्याच्या प्रमाणास निश्‍चितता आहे. साठे वगैरे जे प्रकार आहेत त्यात अनिश्‍चितता आहे व त्यातील पाणी अनपेक्षितपणे मिळविता येते.

श्रीमती रजनी जोशी, मो : 2184224067

Path Alias

/articles/paausa-japauuna-thaevalaa-paahaijae-2

Post By: Hindi
×