पाणी म्हणजे जीवन


अमूल्य पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करणे काळाची गरज -

पर्जन्यचक्र पाण्याचे स्रोत, पाण्याचा पुरवठा व मागणी याची माहिती देणे, पावसाचा थेंबथेंब अडविणे व जमिनीत जिरवणे, वाहून जाणारे पाणी धरणे बांधून अडविणे व संचित करणे तसेच पाण्याचे संरक्षण व संवर्धन करणे, जबाबदारीने भूमीजलाचा उपसा करून टाकणे व पाण्याचा पुनर्भरणाने प्रयत्न करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, मानवी कृत्यामुळे जलाचे (पाण्याचे) प्रदूषण थांबविणे आणि पाण्याचा होणारा अपव्यय व गळती थांबविणे अशा दृष्टिकोनातून जनजागृती निर्माण करणे म्हणजे जलसाक्षरता होय.

पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवसृष्टी जीवंत राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात.

निसर्गत: पाणी पृथ्वीवर मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी वापरण्यास योग्य फारच थोडे पाणी आहे.

पाण्याचा वापर


1) शेतीवापरासाठी
2) वीज (ऊर्जा) निर्मितीकरिता पाणी
3) पिण्याचे पाणी
4) औद्योगिक वापरासाठी पाणी.

पाणी हे सर्व प्राणीमात्राला लाभलेले वरदान आहे. मानवप्राणी पाण्याचा वापर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सतत करीत असतोच. मृत्यूनंतरदेखील मयत व्यक्तीच्या तोंडात शेवटचे पाणी पाजले जाते.

जल म्हणजे पाणी हा विषय एक चर्चेचा, जिव्हाळयाचा आणि चिंतेचा बनला आहे.

पर्जन्यचक्र पाण्याचे स्रोत, पाण्याचा पुरवठा व मागणी याची माहिती देणे, पावसाचा थेंबथेंब अडविणे व जमिनीत जिरवणे, वाहून जाणारे पाणी धरणे बांधून अडविणे व संचित करणे तसेच पाण्याचे संरक्षण व संवर्धन करणे, जबाबदारीने भूमीजलाचा उपसा करून टाकणे व पाण्याचा पुनर्भरणाने प्रयत्न करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, मानवी कृत्यामुळे जलाचे (पाण्याचे) प्रदूषण थांबविणे आणि पाण्याचा होणारा अपव्यय व गळती थांबविणे अशा दृष्टिकोनातून जनजागृती निर्माण करणे म्हणजे जलसाक्षरता होय.

पाण्याची मागणी वाढत आहे. परंतु तेवढा पाण्याचा पुरवठा नाही. त्यामुळे पाणी हा देशातील खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. म्हणून जलसाक्षरतेची संकल्पना रुजविणे व वाढविणे फार निकडीचे आहे.

पाणी देणे म्हणजे जीवदान देणे. त्यामुळे ऐहिक, उन्नती, तृप्ती, सर्व इच्छाची पूर्ती, कीर्तीप्राप्त होते. जल स्रोत, तळी, कालवे, विहिरी निर्माण केल्याने पाण्याची सोय होण्यास मदत होते.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 'नगरेची रचावी। जलाशये निर्मावी। महावने लावावीत नाना विधि ।'

समर्थ रामदास स्वामी म्हणतात, नद्या पर्वताहुनी कोसळल्या । नाना साकडीमध्ये रचविल्या । छबाबा खजाना चालिल्या । असंभव्य । गायमुखे पाठ्याती । नाना कालवे वाहती। नाना झिऱ्या झिरपती। झरती निरे । उरे विद्धि पाझर। पर्वत फुटोन वाहे। तीरे । समर्थांनी दिलेला सल्ला म्हणजे पाण्याबाबतची जाणीव व जागृतीच आहे. तुकोबा म्हणतात, ' वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ' काय करायला हवे

1) शिक्षण अभ्यासक्रमात पाणी हा घटक समाविष्ट करावा. तसेच शालेय व महाविद्यालयस्तरावर पाण्याच्या विषयावर चर्चासत्रे, पोस्टर्स, प्रदर्शन, चित्रफित दाखविल्याने जलसंरक्षण, संवर्धन व विकासाला चालना मिळेल.

2) वृत्तपत्रे व नियतकालिके इत्यादीमधून तसेच आकाशवाणी केंद्र व विविध दूरचित्रवाणीच्याद्वारे पाण्याबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी, लेख लिहिणऱ्यांना व व्याख्याने देणाऱ्यांना प्रवृत्त करावे व त्यांना योग्य ते मानधन द्यावे किंवा बक्षीस द्यावे.

3. जलसाक्षरता अभियान देशभर राबवावे.

4. प्रत्यक्ष पाणलोट क्षेत्र विकास, जलस्रोत विकसित करणे, जलस्रोताचे संरक्षण, पाणी प्रदूषण टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर या दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना सदरील कार्य करण्यास प्रवृत्त करणे.

5. शासनाने - छतावरील पावसाचे पाणी साठवून पाण्याचा निचरा जमिनीत करण्यास प्रवृत्त करावे.

6. ठिबक पद्धतीने शेती करावी.

7. शेतकऱ्यांना सेंद्रीय खताची निर्मिती व वापरास प्रोत्साहन द्यावे.

8. पाणी शुद्ध ठेवण्यासाठी प्रवृत्त करावे.

9. पाऊस, पाणी उपलब्धता, जमिनीत मुरणारे पाणी, बाष्पीभवनाने उडणारे पाणी, नद्यातून वाहून जाणारे पाणी, पाण्याची मागणी, वापर, पाणी तूट, प्रदूषणाचे परिणाम इत्यादी माहिती देणे.

10. जंगलसंपत्तीची भूमीजलाशी असणारा संबंध स्पष्ट करताना आणि त्यांचा वृक्ष लागवड व संवर्धनास करण्यास लोकांना प्रवृत्त करावे.

11. प्रचारफेऱ्या आयोजित करून पाण्याबाबत जाणीव व जागृती निर्माण करावी.

12. पौराणिक व धार्मिक ग्रंथातील जलसाक्षरतेचे प्रसंग लोकांपर्यंत पोहोचवावे.

13. पाण्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, हल्ली पाणी हे मौल्यवान वस्तूंच्या यादीत जाऊन बसलेले आहे. सर्वांना याची दखल घेऊन सामुहिक स्तरावर पाणी संरक्षण, संवर्धन व विविध कामासाठी काटकसरीने वापरण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तरच पाणी हे खऱ्या अर्थाने जीवन किंवा अमृत बनेल,.

'दैवाने हा नियम पाडील, रात्री मागे दिवस जोडील. दु:खा मागे सुखे योजिली, कधी ऊन तर कधी सावली हवी असेल जर नित्य सावली, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा पावलो- पावली.'

प्रदीप पुराणिक, चाळीसगाव

Path Alias

/articles/paanai-mahanajae-jaivana

Post By: Hindi
×