पाणी : एक समस्या, जल साक्षरता मोहीम


खरे तर याबाबत महिला फार महत्वाचा वाटा उचलू शकतात. घागुती पाण्याचे वापरात महिला 50% पेक्षाही जास्त पाण्याचा वापर, धुणे, भांडी , फरशा सफाई या साठी करताना दिसतात. राजस्थान सारख्या दुष्काळ भागातील भगिनींना लाकडाचे फळ्यांवर कुटुबियांना जेवण देण्याची पाळी येते हे आपणास माहितही नसते . हि बाब त्या पैकी काहींनी सन 2003 साली क्योटो, जपान मधे झालेल्या पाणीपरिषदेत निदर्शनास आणून दिली !

दरवर्षी पाण्यावरुन राजकारण पेटते त्या मुळे समाजाला आर्थिक, सामाजिक अशा सर्वच निर्माण होणार्‍या बाबींना तोंड द्यावे लागते. ह्या कडे गांभीर्याने पाहणे व त्यातून मार्ग काढणे हि खरे तर काळाची तातडीची गरज झाली आहे. देशात तसे पहाता सरासरी पर्जन्य वृष्टी फार कमी आहे असेही नाही. मग काय झाले तर पाण्याची साठवण ,वितरण व वापर याचे नियोजनाकडे गेल्या साठ सत्तर वर्षात झालेले अक्षम्य दुर्लक्ष ! एकंदरीतच जनतेचे पाण्याकडे राष्ट्रीय जलसंपत्ती म्हणून पाहण्यापासून ची अलिप्तता व जलअशिक्षितता. पाणी कमी पडले कि आरडा ओरडा करणे , प्रशासनास नावे ठेवणे हे करत असताना आपण काय करतो ,काय करायला पाहिजे,नागरिक म्हणून प्रशासन नियोजनात ज्या निरनिराळ्या माध्यमातून भाग घेता येण्यासारखा आहे ते आपण करतो का हे लक्षात घेतले पाहिजे . आता काही देशात परकीय राज्य सत्ता नाही ,आपले स्वराज्य आहे. आपलेच दांत व आपलेच ओठ !!

पाणी हेच जीवन व राष्ट्रीय जलसंपत्ती असल्याने ती आपण जपणे अगत्याचे आहे. निसर्ग आपणास पावसाचे स्वरुपात हजारो कोटी रुपयांचे पाणी अगदी फुकट देतो . परंतु एखादी गोष्ट फुकट मिळाली कि आपल्याला त्याची किंमत नसते हे मात्र खरे दिसते पावसामुळे आपल्याला हिरवागार निसर्ग पाहण्यास मिळतो नाहीतर बोडके पिवळे डोंगर बघण्याची पाळी आली असती . पाणी या विषयावर प्राथमिक शाळे पासून एक स्वतंत्र विषय म्हणून पाहिले गेले पाहिजे. आंतराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या पाणी परिषदेत शाळकरी मुलांना प्राधान्याने सामील करण्यात येते हि बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे.,राज्यात किती धरणे आहेत ,त्यात किती पाणी असते ,शेती , पिण्याचे पाणी उद्योगधंद्यास किती पाणी असते,पावसामुळे पडणार्‍या पाण्यापैकी अंदाजे 50 %पाणी समुद्रात न वापरता वाया जाते , आशा प्रकारची उपयुक्त माहिती समाजात पोहचत नाही. ते माहितीकरून घेण्याचे महत्व समजण्यासाठी लागणारी जलसाक्षरता /जागृतपणा दिसून पडत नाही. त्या साठी युध्द पातळीवर समाजात जल साक्षरतेचे कार्य झाले पाहिजे .

शाळा कॉलेज मधे भूगोल विषयात आपल्या देशात नद्या किती आहेत ,त्या समुद्राला कोठे मिळतात हे शिकवले जाते परंतु त्यावर किती धरणे आहेत ,मोठी ,लहान कि मध्यम प्रकारची किती ,पिण्याचे पाण्यासाठी, उद्योग -कारखान्यासाठी शेती साठी की जलविद्यूत साठी हि माहिती खर्‍या अर्थाने जलसाक्षरता मोहिमेखाली जनतेपुढे आली तर जनता स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनास सहकार्य करेल असे वाटते.पाण्याचे वितरण व्यवस्थापनेचे बाबत देखभाल दुरुस्ती ला फार महत्व आहे,आजकाल जवळ जवळ 30-40% पाणी गळक्या -फुटक्या पाईपलाईन,मोठ्या टाक्या ,नळ या मुळे वाया जाताना दिसते. हजारो कोटी रुपयांचे पाणी निसर्गातून जवळ जवळ फुकट मिळत असताना ,या साठी अनुदाना अभावी हे काम मागे पडते, असे जलसाक्षर व्यक्तीस नक्कीच वाटणार नाही.

खरे तर याबाबत महिला फार महत्वाचा वाटा उचलू शकतात. घागुती पाण्याचे वापरात महिला 50% पेक्षाही जास्त पाण्याचा वापर, धुणे, भांडी , फरशा सफाई या साठी करताना दिसतात. राजस्थान सारख्या दुष्काळ भागातील भगिनींना लाकडाचे फळ्यांवर कुटुबियांना जेवण देण्याची पाळी येते हे आपणास माहितही नसते . हि बाब त्या पैकी काहींनी सन 2003 साली क्योटो, जपान मधे झालेल्या पाणीपरिषदेत निदर्शनास आणून दिली ! पाकिस्तान सारख्या लहान देशातील महिला जल संपत्ती बाबत किती जागरूक आहेत हे सन 2002 साली इस्लामाबाद येथे झालेल्या S-W-F-II पाणी परिषदेच्या वेळी दिसून पडले.

त्या वेळी त्यांनी पाकिस्तान वूमन वाटरनेटवर्क ची स्थापना केली. तेथून आल्यावर पुणे येथील Institution of Engineers माध्यमातून, इंडिया वूमन वाटरनेटवर्क व्यासपीठ कार्यान्वित करण्यात आले. जलसाक्षरता मोहिमेसाठी खरेतर आत्ता पर्यंत याचा खूप उपयोग करून घेता आला असता . थोडक्यात सांगायचे झाल्यास जल साक्षारता मोहीम फार मोठ्या प्रमाणावर राबविण्याची नितांत गरज असून त्यात जलतज्ज्ञ मंडळींनी प्राथंम्याने लक्ष घालून पुढाकार घेणे फार जरुरीचे वाटते. त्या मुळे आहे त्या पाण्यातच उत्कृष्ट पाणीवाटप व नियोजन होऊ शकते,मात्र त्यासाठी जरूर ती इच्छाशक्ती मात्र सर्वत्र प्रकर्षाने दिसून पडली पाहिजे.

असे झाल्यास पाणी हा सध्या ज्वलंत झालेला विषय सुलभ व सुटसुटीतपणे व खर्‍या अर्थाने जलसाक्षर जनतेचे सहकार्याने तत्परतेने सुटू शकेल अशी आशा वाटते.

लायन सुनिता शिर्के, पुणे , मो : 020-24226107

Path Alias

/articles/paanai-eka-samasayaa-jala-saakasarataa-maohaima

Post By: Hindi
×