पाणी आणि आजार


सध्या बाजारात जे पाणी शुध्द करण्याचे फिल्टर्स मिळतात त्या यंत्रांची पाणी शुध्द करण्याची काही ठराविक क्षमता असते - ती ठराविक लिटर्सची क्षमता संपली की त्या यंत्रातून येणारे पाणी व साध्या नळातून येणारे पाणी यांच्यात काही फरक नसतो म्हणजेच नळातून येणारे पाणी ज्या प्रतीचे त्याच प्रतीचे पाणी, त्या यंत्राची ठराविक लिटर्स पाणी शुध्द करण्याची क्षमता संपल्यावर, आपल्याला मिळते. आणि हे ठराविक लिटर्स पाणी शुध्द करणे कधी झाले, त्याची क्षमता कधी संपली हे आपल्याला कळण्याचे काहीही मोजमाप नाही. म्हणून हे फिल्टर्स उपयोगाचे नाहीत.म्हणून आपल्याला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्याचा उपाय - रात्री उकळून ठेवणे व सकाळी गार झाल्यावर ते वापरण्यास सुरूवात करणे.

पाण्यातून निरनिराळ्या प्रकारचे जंतू पोटात गेल्यामुळे कॉलरा, टायफाईड, आवेचे जुलाब, पाण्यासारखे जुलाब होणे या सारखे आजार होतात व त्यावर बंदबाटलीतले पाणी पिणे हा उपाय बरेच जण सुचवितात.

वास्तविक सध्या पुण्यात जे नळाचे पाणी आपण पितो ते बऱ्याच प्रमाणात शुध्द असते. आपल्या पोटात हैड्रोक्लोरिक अॅसिड निर्माण होते या हैड्रोक्लोरिक अॅसिडमुळे पाण्यातील बहुसंथ्य जंतू मारले जातात व त्यामुळे आजार होत नाहीत. मी व बहुसंख्य पुणेकर नळाचे पाणी वर्षानुवर्षे पीत आहोत. त्या बहुतेकांना पाण्यातील जंतूमुळे होणारे आजार होत नाहीत. आणि पाण्यातील जंतूंचे प्रमाण वाढले तर त्यावर पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा व स्वस्त उपाय आहे. पिण्याचे पाणी दहा मिनिटे उकळून थंड झाल्यावर पिपात भरून ठेवल्यास ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.

ऑफिसमध्ये कामाला जाताना, शाळेत जाताना, हॉटेलमध्ये सुध्दा उकळून गार केलेले पाणी काचेच्या बाटलीत भरून बरोबर नेले तर खराब पाण्यापासून होणारे आजार दूर राहतील. उकळून गार केलेले पाणी काचेच्या बाटलीतून नेल्यामुळे प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण टळेल.

एका मिनरल पाण्याच्या बाटलीला 10 ते 15 रूपये पडतात. पाणी दहा मिनिटे उकळण्यात अंदाजे 80 पैसे ते 1रूपया खर्च येतो. मिनरल वॉटरच्या 4 -5 बाटल्या जर दिवसभरात लागत असतील तर त्याचा खर्च 60 रूपये येईल. आयुर्वेदात पाण्याबद्दल काय सांगितले आहे ते पाहू -

दीपने पाचने कण्डये लघुष्ण बस्तिशोधनम् ।16
हिध्माध्मानानिलश्लेष्मसद्य:शुध्दे नवज्वरे
कासामपीनसश्वासपार्श्वरूक्षु च शस्यते : ।।17।।
सार्थ वाग्भट - सूत्रस्थान


उन, पाणी, दीपक, पाचक, लघु, मूत्रशाधक असून कुष्ठरोग, उचकी, पोटफुगी, वात, कफ, नवज्वर, कास, श्वास, सर्दी, अजीर्ण, पार्श्ववेदना इत्यादी.विकारांना व जुलाबाचे औषध घेतलेल्यांना हितकर आहे.

अनभिष्यन्दि लघू च तोयं कथितशीतलम्।
पित्तसुक्ते हितं दोषे व्युषितं तात्विदोषकृत ।।18।।
सार्थ वाग्यभट - सूत्रस्थान


तापवून गार केलेले पाणी लघू असून कफ उत्पन्न करीत नाही. पित्ताधिक्य असलेल्या विकारांमध्ये ते हितकर आहे हेच पाणी शिळे झाल्यावर त्रिदोष उत्पन्न करते.

हल्ली बरेच डॉक्टर पेशंटना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. काही जण तर दोन दोन तासांनी एक ग्लास पाणी पिण्यास सांगतात. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका प्रमुख वृत्तपत्रात आरोग्याचा सल्ला या सदरात घरात पाण्याचे मोठे पिंप भरून ठेवून येता जाता पाणी प्या म्हणजे तुमची तब्येत चांगली राहिल असे सांगितले होते.

कोणतीही गोष्ट अती करणे चांगले नाही. शरीरास जरूरीपेक्षा जास्त पाणी पिण्यामुळे ते जास्तीचे पाणी किडनीतून गाळून शरीरीबाहेर मूत्र रूपाने टाकले जाते. जास्त पाणी पिण्याने किडनीला जास्त काम करावे लागते हे किडनीला अपायकारक आहे. काही लोक म्हणतील की जास्त व्यायाम केल्यामुळे स्नायू बळकट होतात त्याप्रमाणे किडनी बळकट होईल पण व्यायामाचे तत्व येथे लागू पडत नाही. जसे जास्त जेवण्याने आतड्यास व्यायाम होऊन ती बळकट होत नाहीत उलट अपचन होते तसेच किडनीचे आहे.

मूतखडा झाल्यावर जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मूतखडा झाल्यावर जास्त पाणी पिण्यामुळे मूतखडा पडण्यास मदत होत नाही असे आधनिक वैद्यकशास्त्र म्हणते. व्हेलमासा पाण्यात राहून सुध्दा त्यांना मूतखडा होतो व पाण्यात राहून सुध्दा तो बरा होत नाही. शौचास मळाचे खडे होत असतील तर अधिक पाणी पिऊन उपयोग होत नाही. जास्त प्यायलेले पाणी आतड्याच्या वरच्या भागात शोषले जाते. पाणी मळाच्या खड्यांपर्यंत पोहोचत नाही.

मूत्रभागातील आजार होऊन लघवी अॅसिडिक झाली की लघवीची जळजळ होऊ लगाते. त्यावेळी मात्र जास्त पाणी पिण्यामुळे लघवीतील अॅसिड कमी होऊन जळजळ थांबू शकते.

आता आयुर्वेदात पाणी पिण्यासंबंधी काय म्हटले आहे ते पाहू. वाग्भट कृत अष्टांग हृदय या ग्रंथात सूत्रस्थान अध्याय पाच मध्ये पुढील श्लोक आहेत -

नाम्बु पेयामशक्या वास्यल्पमल्पाग्निगुल्मिभि:।
पाडुंदर तिसारार्शाग्रहणी दोषशोथिभि:।
ऋते शरन्निदाधाम्यां पिबेतत्स्वस्योडपिचल्पश:।


मंदाग्नि, गुल्म, पांडू, उदर, अतिसार, मूळव्याध, संग्रहणी व सूज हे विकार ज्यांना झाले आहेत त्यांनी जास्त पाणी पिऊ नये. तृष्णा सहन न झाल्यास थोडेसेच पाणी प्यावे. निरोगी मनुष्याने देखील शरद ऋतु व ग्रिष्म ऋतुखेरीज इतर ऋतुमध्ये थोडे थोडे पाणीच प्यावे.

पाणी कसे व केव्हा प्यावे या संबंधी वाग्भटात पुढील श्लोक दिला आहे -
समस्थूलकृशा भक्तमध्यन्त प्रथामाम्बुपा:।

जेवणाच्या आरंभी पाणी पिण्याने मनुष्य कृश होतो. जेवणाचे मध्यात पाणी प्यायल्यास सडपातळ होतो व जेवणाचे शेवटी पाणी पिण्याने व्यक्ती स्थूल होते. या सर्व लेखाचा निष्कर्ष - तहान लागल्यावर तहान भागवण्यापुरते पाणी प्यावे ते पाणी उकळून गार केलेले असावे.

पण कामावर जाताना, शाळेत जाताना अशा किती बाटल्या तुम्ही बरोबर नेणार. पुष्कळशी मुले वॉटर बॉटल मधले पाणी संपले की शाळेतील पाणी बाटलीत भरतात. शिवाय बाहेर खाणेपिणे झाले की अशा लोकांना बाधते.

सध्या बाजारात जे पाणी शुध्द करण्याचे फिल्टर्स मिळतात त्या यंत्रांची पाणी शुध्द करण्याची काही ठराविक क्षमता असते - ती ठराविक लिटर्सची क्षमता संपली की त्या यंत्रातून येणारे पाणी व साध्या नळातून येणारे पाणी यांच्यात काही फरक नसतो म्हणजेच नळातून येणारे पाणी ज्या प्रतीचे त्याच प्रतीचे पाणी, त्या यंत्राची ठराविक लिटर्स पाणी शुध्द करण्याची क्षमता संपल्यावर, आपल्याला मिळते. आणि हे ठराविक लिटर्स पाणी शुध्द करणे कधी झाले, त्याची क्षमता कधी संपली हे आपल्याला कळण्याचे काहीही मोजमाप नाही. म्हणून हे फिल्टर्स उपयोगाचे नाहीत.

म्हणून आपल्याला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्याचा उपाय - रात्री उकळून ठेवणे व सकाळी गार झाल्यावर ते वापरण्यास सुरूवात करणे.

डॉ. वा.वा. भागवत , पुणे - (भ्र : 9657725436)

Path Alias

/articles/paanai-anai-ajaara

Post By: Hindi
×