नेवासा ते पैठण जलदिंडीचे आयोजन


जलप्रदूषण ही एक समस्या बनली असून त्याचा मानवीय जीवन व निसर्गावर विपरित परिणाम होत आहे. यामुळे जलप्रदूषणावर प्रबोधन व जनजागृतीसाठी विविध संघटना व संस्थांच्या सहभागातून नेवासा ते पैठण गोदावरी नदी पात्रातून जलदिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी दिली.

जलप्रदूषण ही एक समस्या बनली असून त्याचा मानवीय जीवन व निसर्गावर विपरित परिणाम होत आहे. यामुळे जलप्रदूषणावर प्रबोधन व जनजागृतीसाठी विविध संघटना व संस्थांच्या सहभागातून नेवासा ते पैठण गोदावरी नदी पात्रातून जलदिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी दिली.

जलदिंडीद्वारे विविध शाळा, महाविद्यालय व नदी तीरावर असणाऱ्या गावातील नागरिकांना जलप्रदूषणाविषयी मान्यवर मार्गदर्शन करणार असून पिण्याच्या पाण्याचे महत्व पटवून दिले जाणार आहे. 29 जानेवारी नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर येथून सकाळी 8 वाजता जलदिंडीत प्रारंभ होणार असून 30 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता पैठण येथील नाथमंदिरात या जलदिंडीचा समारोप होणार आहे. 30 स्वयंसेवक हे सहा बोटीतून प्रवास करणार असून नदी परिसरातील गावात जावून प्रबोधन करणार आहेत. तसेच राज्यभरातून सुमारे 500 कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत. दहिगावने येथे दिंडी मुक्कामी थांबणार आहे. 30 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता दहिफळ येथे दिंडीचा मध्यांतर होवून दिंडी पैठणच्या दिशेने मार्गस्थ होईल.

जलदिंडी प्रतिष्ठान पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृषक समाज, लायन्स क्लब, रोटरी क्लब, अखिल भारतीय वारकरी संघ, एन्हायरमेंटल रिसर्च फौंडेशन (औरंगाबाद) ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, भारतीय जलसंस्कृती मंडळ, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य प्रदूषण अधिकारी, कल्याणकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जलदिंडिचा हा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या जलदिंडी दरम्यान तज्ज्ञ मंडळी नदीपात्रातील विविध वनस्पती, पाणी आदी घटकांचे नमुने घेवून त्याचे संशोधन करणार आहेत.

बापूसाहेब भोसले, प्राचार्य डॉ. मतकर( शेवगाव), प्रा. म्हसके (श्रीरामपूर), शिवाजी महाराज देशमुख, प्रवीण जोशी, पंचशील दिघे, शंकरराव दिघे, शंकरराव लोखंडे (नेवासे), बी.यु. पठाण, डॉ. विश्वास येवले (पुणे), डॉ.दिलीप यार्दी (औरंगाबाद), डॉ. चाकूरकर (पैठण) आदी यावेळी जलदिंडित सहभागी होणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.

जलदिंडी 2013 नेवासा -


सकारात्मक सर्वांगिण स्वास्थ्य, प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास याबाबत प्रबोधन, जलसाक्षरता, मुली वाचवा, नारी सुरक्षा या महत्वपूर्ण समस्याबाबत जलजागरण करण्यासाठी 29 व 30 जानेवारी 2013 रोजी जलदिंडी आयोजित करण्यात आलेली होती. मोटार बोटी व कयारा यातून 35 जणांचा सहभाग होता. यात पुणे व औरंगाबाद विद्यापीठ अंतर्गत प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक, पर्यावरण प्रेमी संघटना, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, विद्यार्थी, जलवर्धिनी प्रतिष्ठान, आंतरराष्ट्रीय लायन्स व रोटरी संघटना, इमा संघटना, मराठी विज्ञान परिषद आदी सहभागी झाले होते.

नेवासा प्रवरा नदीचे जलपूजन करून ज्ञानेश्वर मंदिरापासून देखमुख महाराजांच्या शुभहस्ते सुरूवात झाली. नंतर प्रवरासंगम येथून प्रत्यक्ष जलदिंडीला सुरूवात झाली. पहिला मुक्काम दहिगावणे येथे करण्यात आला. दुसऱ्या दिवशी 4 वाजता जायकवाडीला पोहोचलो. हा प्रवास 65 कि.मी चा जलप्रवास होता. यामध्ये पाण्याच्या प्रदूषणाचा अभ्यास, पक्षीनिरीक्षण, जलचर प्राणी, स्वास्थ्य याबाबत शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधण्यात आला. प्रत्यक्ष रस्त्याने जाणाऱ्या मोटारीच्या ताफ्यातून 25 ते 30 जणांनी प्रवास करून शाळा व महाविद्यालये येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान, शेवगाव महाविद्यालय व दहिगावने येथील शाळेत प्रबोधनपर व्याख्याने झाली. माऊली ते नाथ महाराज हा विज्ञान - अध्यात्म समाज प्रबोधनाचा महत्वपूर्ण उपक्रम संपन्न झाला. ही सर्व संकल्पना डॉ.विश्वास येवले यांची होती. त्यांच्या प्रयत्नातून व सततच्या पाठपुराव्याने हे महान कार्य पार पडले. डॉ. दत्ता देशकर, डॉ. म्हसके, डॉ. मतकर, बापूसाहेब भोसले, चंद्रशेखर घुले पाटील, घाडगे साहेबराव, दिघे - पंचशील हॉटेल, डॉ. चाकोरकर - पैठण, डॉ.यार्दी - औरंगाबाद यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. या कार्यक्रमातून 4 ते 5000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले. दरवर्षी जलदिंडी उपक्रम राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Path Alias

/articles/naevaasaa-tae-paaithana-jaladaindaicae-ayaojana

Post By: Hindi
×