नदी स्वच्छता अभियान


एक वेळ अशी होती की बंड गार्डन व संभाजी पार्क जवळील नदी काठावर फिरणे एक आनंददायक बाब समजली जात असे. पण आता तशी परिस्थिती राहलेली नाही. कोणी तो प्रयत्न केल्यास तिथे असलेली घाण व दुर्गंधी ती मजाच घालवून बसेल. पूर्वी या ठिकाणी बोटींगची मजाही लुटली जात असे. पण आता मात्र आपण सर्वजण या आनंदाला मुकलो आहोत. आपल्याच निष्काळजीपणाचा तो परिपाक आहे याची आपल्याला जाणीव आहे का?

एक सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणून देशभारत पुणे शहराची ओळख आहे. निवृत्त व्यक्तींचे नंदनवन व उद्यानांचे शहर म्हणून एके काळी पुणे शहर प्रसिद्ध होते पण आज मात्र त्याची ओळख कचर्‍याचे शहर म्हणून शिल्लक राहिली आहे. हा सर्व कचरा आता पुण्यातील सुंदर नद्यांना विद्रूप करीत आहे. पुणे परिसरात मुळा, मुठा, भीमा, पवना, घोड, इंद्रायणी व नीरा या सारख्या नद्या वाहतांना आढळतात. पण आज मात्र या सर्व नद्यांना नाल्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे व त्यातून सतत आम्लयुक्त पाणी वाहतांना दिसते. याचा परिणाम निव्वळ जनतेच्या आरोग्यावर झालेला नसून नद्यांचे आरोग्यही त्यामुळे धोक्यात आले आहे. या नद्या वाहात वाहात समुद्राला जाऊन मिळतात व त्यामुळे सामुद्रिक पर्यावरणालाही त्याची कल्पनातीत झळ पोहोचली आहे.

पण या वर्षी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी रोटरी क्लब, पुणे सेंट्रल आणि पुणे डाऊनटाऊन या दोघांनी इंडियन मॅरिटाइम फाउंडेशन च्या सहाय्याने 300 ज्येष्ठ नागरिकांना , शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, सी कॅडेट कोअरच्या विद्यार्थ्यांना तसेच कायार्र्लयात काम करणार्‍यांना हाताशी धरुन पुणे शहरातील चार महत्वाच्या पूलांजवळील परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत आम्ही दोन तासात गणेशमूर्तींचे अवशेष, स्टायरोफोम पॅकिंग मटेरियल, टोपॅक्स एवढेच नव्हे तर वापरलेले कंडोम्स व इंजेक्शन्स च्या सूया यासारखा 1100 किलो कचरा जमा केला. यावरुन जास्त लोक येवून जास्त वेळात किती कचरा जमा झाला असता तर तो किती झाला असता याची कल्पना येवू शकेल. काही काळापूर्वी मेलेली कुत्री व म्हशी यांची प्रेतेही नदी प्रवाहातून बाहेर काढलेली होती हे वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटायला नको.

इंडियन मेरीटाइम फाउंडेशनने आतापर्यंत पुण्यात नाही तर संपूर्ण भारतात - सतलजपासून तर कन्याकुमारीपर्यंत- लोकशिक्षण व लोकजागृतीसाठी ही चळवळ राबविली आहे. यात निव्वळ नदीकाठच नव्हे तर समुद्रकिनाराही समाविष्ट आहेत.

रोटरी क्लब, पुणे सेंट्रल व पुणे डाउनटाउन क्लबच्या सदस्यांनी मुंबईला जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहाय्याने रविवारी सकाळी जुहू बीचही साफ करण्याचा प्रयत्न केला आहे. सोबत दिलेल्या चित्रांद्वारे या सफाईची कल्पना येवू शकेल. पुण्यातील जीवित नदी चळवळही शहरात नदीकाठी विविध कार्यक्रम घेवून नागरिकांना या संबंधात जागृतीचे काम करतांना दिसत आहे.

एक वेळ अशी होती की बंड गार्डन व संभाजी पार्क जवळील नदी काठावर फिरणे एक आनंददायक बाब समजली जात असे. पण आता तशी परिस्थिती राहलेली नाही. कोणी तो प्रयत्न केल्यास तिथे असलेली घाण व दुर्गंधी ती मजाच घालवून बसेल. पूर्वी या ठिकाणी बोटींगची मजाही लुटली जात असे. पण आता मात्र आपण सर्वजण या आनंदाला मुकलो आहोत. आपल्याच निष्काळजीपणाचा तो परिपाक आहे याची आपल्याला जाणीव आहे का?

अहमदाबादला साबरमती नदीच्या काठावर लोकचळवळीतून व सरकारी प्रयत्नांतून झालेले स्वच्छतेचे काम पाहून पर्यावरणाची जाण असलेले नागरिक काय करु शकतात याची कल्पना येवू शकेल. सामाजिक जाण असलेले आपल्या सारखे रोटेरियन्स अशा प्रकारची चळवळ उभारु शकणार नाही काय?

Path Alias

/articles/nadai-savacachataa-abhaiyaana

Post By: Hindi
×