नदीच्या काठावर स्वच्छतेचे काम केल्याने नदीची खरोखर काय परिस्थिती आहे हे अनेकांना प्रत्यक्ष समजेल आणि नदी प्रदूषणाविषयीची जागरूकता वाढण्यास मदत होईल. नदी प्रदूषण थांबवण्यासाठीचे आवश्यक जनमत अशा उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर तयार होवू शकते. तसेच असा उपक्रम हा इतर शहरांना देखील पथदर्शी ठरू शकतो.
अपुरी आणि अयोग्य सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था हे जसे नदी प्रदूषित होण्याचे एक कारण आहे तसेच नदीकाठावरील अस्वच्छता हेही एक महत्वाचे कारण आहे. आज कोणत्याही शहरात नदीच्या काठाने पाहिल्यास या समस्येची गंभीरता नजरेत भरेल.प्लास्टिक, थर्मोकोल ची कव्हर्स, जुन्या नादुरूस्त भंगार वस्तू, काही वेळा कपडे, ओला कचरा अशा अनेक वस्तू फेकून देण्याची हक्काची जागा म्हणजे नदीचे काठ असा काहीसा समज नागरिकांनी केलेला आहे. या सर्व गोष्टी शेवटी नदीच्या प्रवाहात मिसळून नदी प्रचंड प्रदूषित करतात. अनेक ठिकाणचे समारंभपूर्वक बसवलेले निर्माल्य कलश कुठे गेले याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे निर्माल्य नदीत टाकण्याची 'परंपरा' अव्याहत चालू आहे. कोणतेही कायदे अथवा नियम करून या समस्या सुटणार नाहीत. यासाठी जनसहभाग हाच एकमेव उपाय आहे.
पुण्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या सहभागातून मुठा नदीचे काठ वर्षभर स्वच्छ ठेवता येवू शकतात. दोन्ही काठांवर एक किलोमीटर अंतराचे भाग वेगवेगळ्या संस्थांना विभागून देता येवू शकतील. दर महिन्याला त्या त्या शाळा / महाविद्यालयांतील एका वर्गातील विद्यार्थी एक दिवस श्रमदानातून त्यांना दिलेला एक किलोमीटर नदीच्या काठाचा परिसर स्वच्छ करतील. जो परिसर जास्त स्वच्छ दिसेल तो परिसर राखणाऱ्या संस्थेला वर्ष अखेरीला काही पुरस्कार देता येईल. यामुळे एक निराळ्या प्रकारची स्पर्धा आकाराला येवून नदीकाठ वर्षभर स्वच्छ राहू शकतात.
त्याचबरोबर जे स्वयंसेवक यामध्ये सहभगागी होतील ते पुढे कधीही स्वत: तर हा कचरा टाकणार नाहीतच, परंतु ते आजूबाजूच्या लोकांनाही असा कचरा टाकण्यापासून परावृत्त करतील. एक प्रकारीच 'स्वच्छता संस्कृती' यातून आकार घेवू शकते.
नदीच्या काठावर स्वच्छतेचे काम केल्याने नदीची खरोखर काय परिस्थिती आहे हे अनेकांना प्रत्यक्ष समजेल आणि नदी प्रदूषणाविषयीची जागरूकता वाढण्यास मदत होईल. नदी प्रदूषण थांबवण्यासाठीचे आवश्यक जनमत अशा उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर तयार होवू शकते. तसेच असा उपक्रम हा इतर शहरांना देखील पथदर्शी ठरू शकतो.
जर आपल्याला वाटत असेल की हा उपक्रम आपल्या शहरासाठी, भविष्यातील पर्यावरणासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तर आम्ही काही पर्यावरण प्रेमींनी सुरू केलेल्या 'जीवित नदी अभियानात' सामील व्हा.
जीवित नदी अभियान, (https://jeevitnadi.wordpress.com/)
सम्पर्क
श्री. मनीष घोरपडे, पुणे
Path Alias
/articles/nadai-kaathaavaraila-kacaraa-nairamauulana
Post By: Hindi