नदी गतवैभवाची अपेक्षा - भाग 11


नदीत आज थोडे फार पाणी अजून शिल्लक आहे व त्या पाण्यात आज जलपर्णी (आजोला) अगदी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. पण जलपर्णी काढण्यासाठी कित्येक स्थानिक नगरसेवक संधीची वाट पहात आहेत. त्यांची नजर आहे महापालिका जलपर्णी काढणार्‍या ठेकेदाराच्या बिलाच्या चेकवर, कारण त्यातूनच टक्केवारी वाटप होणार आहे.

आज आपण वर्ष 2015 च्या शेवटावर येवून पोहोचलो आहोत. वाचकांना लेख प्राप्त होईपर्यंत शक्यता आहे नवीन वर्ष 2016 सुरू झालेले असेल सुध्दा. आपण 365 दिवसानंतर नवीन वर्ष व त्याच ठरलेल्या तारखेला तोच कार्यक्रम करतो. घरांना रंग देतो, खरेदी करतो, पैसे उधळतो, कपडे बदलतो असा नित्यक्रम आपल्या जन्मापासून प्रत्येक जण करीत असतो. पण त्यावेळी सभोवतालच्या नैसर्गिक साधन सामुग्रीचे आपण जतन अथवा संवर्धन जर करीत आलो असतो तर आपल्या नद्या आज सुध्दा गतवैभवाने बहारल्या असत्या पण स्वार्थी व लुटमार प्रवृत्ती च्या हव्यासामुळे आपण त्यास मुकलो आहोत हे आपणास वेगळ्या शब्दात सांगण्याची काहीही गरज नाही.

काल मी पुण्याच्या विकासाचा फोटो एका वृत्तपत्रात पाहिला. त्यात मेट्रो होती, पूल होते, बिआरटी होती पण त्या फोटोत गटार गंगा झालेली नदी सुध्दा दिसत होती. आपण सगळ्यांनी शहराच्या विकासात नदी संवर्धन हा केंद्र बिंदू मानून काहीही विकास केला नाही. केला तो फक्त नदीच्या नैसर्गिक रूपाचा भकास.

ही अवस्था फक्त पुण्याची नाही तर आज पिंपरी चिंचवडचा विकास फोटो पाहिला त्यात दुमजली उड्डाणपूल, मोठे मोठे रस्ते व इमारती सर्व काही सुंदर पण पूल बांधतांना शेजारच्या नाल्यात बांधकामाचा राडारोडा व शिल्लक सिमेंट पाईपचे तुकडे हे नाल्यात ढकललेले दृष्य त्यात दिसत होते.

एकंदरीत काय आपणास कोणालाही नद्या, नाल्यांबाबत आस्था अथवा प्रेम अजिबात नाही, सामान्य नागरिकांच्या क्षमता व प्रशासनाची ताकद एकवटली तर किती सुंदर संगम तयार होईल, पण नाही. आम्हीच आपल्या पर्यावरण प्रेमी मंडळींचे पाय ओढत आहोत कारण स्वत:ची नकारात्मक विचारसरणी त्यास कारणीभूत आहे.

आपल्या राजकीय नेतृत्वास आपण आवाहन करण्याची गरज आहे की प्रथम नद्यांची तब्बेत सुधारा, त्यांना धष्टपूष्ट करा आणि मग पहा ह्याच नद्या कशा वर्षभर वाहत्या राहतात. त्यासाठी आपण राजकीय नेतृत्वावर दबावगट व त्यांना सल्लामसलत सुध्दा करणे गरजेचे आहे. मात्र सुरूवातीलाच विकतचा सल्ला देवून भ्रष्टाचाराच्या गुर्‍हाळाचे उद्घाटन न केल्यास बरे.

नदीत आज थोडे फार पाणी अजून शिल्लक आहे व त्या पाण्यात आज जलपर्णी (आजोला) अगदी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. पण जलपर्णी काढण्यासाठी कित्येक स्थानिक नगरसेवक संधीची वाट पहात आहेत. त्यांची नजर आहे महापालिका जलपर्णी काढणार्‍या ठेकेदाराच्या बिलाच्या चेकवर, कारण त्यातूनच टक्केवारी वाटप होणार आहे. आमच्यापैकी कोणी एकाने जरी नगरसेवकांना विचारले असते की बाबा रे ही जलपर्णी का काढता ? तर त्याचे उत्तर आहे, ती पाण्याबरोबर वरून वहात आली आहे म्हणून मी काढतो आहे. एवढे आमचे अज्ञान सुध्दा अनुभवताना गतवैभवा बाबत विचार करणे त्रासदायक ठरते आहे. एका राजकीय पक्षाच्या तरूण कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या सनदी अधिकार्‍यास भिंतीवर लावण्यासाठी एक लॅमिनेट केलेली फोटो फ्रेम दिली व त्या अधिकार्‍याने ती सन्मानाने स्विकारली व जेव्हा ते चित्र पाहिले तेव्हा तरूण कार्यकर्त्यांनी सनदी अधिकार्‍यांसबोत त्यांच्या कार्यालयात फोटो सेशन केले व ती न्युज पेडन्युज बनवून वृत्तपत्रातून मागील आठवड्यात प्रसिध्द केली. त्याने झाले काय सनदी अधिकारी निवांत झाले व मनाशी बोलले की ती जलपर्णी आमच्याच चुकीच्या नियोजनाने जन्माला येते व तुम्ही तिचे फोटो काढून मलाच देताय ? वारे गड्यांनो ! शाब्बास ! अशी पाहिजे मंडळी.

किस्सा येथे थांबला नाही तर त्यातून झाले असे की वृत्तपत्रातून ती बातमी ‘आयुक्तांचा निषेध ’ मथळ्या खाली पण दुसर्‍या राजकीय पक्षाने मा. खासदारांना सोबत घेवून मा. सनदी अधिकार्‍यास नदीवर बोलावले व ‘तू मार मी रडतो’ चे नेहमीचे नाटक करून सर्व राग जलपर्णी ठेकेदारावर काढून देखल्या देवा दंडवत करून तेवढा पट्टा साफ केला व परत तीच बातमी वृत्तपत्रांनी परत छापली, जलपर्णी काढली म्हणून.. बातमी वाचून पेपर रद्दीत जाईपर्यंत तेथे नदीत पुन्हा जलपर्णी वाढली आहे.

1. जलपर्णी बाबत गैरसमज
2. विनाअभ्यास प्रशासन अधिकारी गाढव ओझे नेत आहेत
3. सांडपाणी थेट नदीपात्रात येण्यास बंदी हवी.
4. नदीच्या प्रवाहात सांडपाणी जेथे लगेच बंद करता येत नसेल त्या परिसरातील पूर्ण जलपर्णी काढू नये. तेथे जलपर्णीचे गठ्ठे बांधून पाण्यातच ठेवावे म्हणजे पाणी नैसर्गिक शुध्दीकरण प्रक्रिया सुरू राहील.

मधे जलपर्णी चे गठ्ठे बांधणे
दोन्ही बाजूला जलपर्णी बांबीने अडवून ठेवणे


ही समस्या पूर्वी नव्हती कारण आपले सांडपाणी म्हणजे मानवी मलमूत्र व राखेने अथवा मातीने घासलेल्या भांड्याचे सांडपाणी, कपडे धुतलेले पाणी म्हणजे रिठ्याचा फेस हे सर्व घटक नदीतील जैवविविधतेसाठी घातक नव्हते. पण आपण आज कित्येक रसायने नदीत सोडून नक्की काय करीत आहोत याचे कोणालाही काही पडलेले नाही.

प्रथम आपल्या नद्या वाचविण्यासाठी चर्चा थांबवून कृतीशील बनू. त्या शिवाय काहीही घडणार नाही.

ज्या प्रमाणे कुंभमेळा अथवा इतर नदीच्या पात्रात उतरून होणारे सर्व धार्मिक जत्रांच्या वेळेस सुरक्षितेसाठी नदीच्या दोन्ही बाजूने बांबू उभे करून त्याला जाळी लावतात तशी जाळी आता प्रत्येक नदीत जलपर्णी नियंत्रणासाठी लावणे गरजेचे आहे. त्या जाळीच्या आत जलपर्णी वाढू द्यायचे त्यामुळे प्रचंड प्रमाणात नदीतील पाणी नैसर्गिक रित्या शुध्द होणार व जाळीत जलपर्णी वाढली की ती पसरणार नाही. तिचा जोर असतो तो फक्त तिला फुले येईपर्यंत. एकदा काही जलपर्णी अतिशय सुंदर असे फुलांचे गुच्छ आले की आपोआप तेथे मधमाश्या व भुंगे येतील, त्यांच्या मागे किडे खाणारे सर्व पक्षी नदीवर विसावतील व त्यामुळे आज गटार बनलेली नदी एक सुंदर बाग बनेल.

व्यासायिक त्या प्रसंगी त्यांच्या जागा पर्यटकांना भाड्याने देतील, बोटिंग वाले काश्मीर च्या “दल” सरोवर प्रमाणे स्वच्छ पाण्यातून नदीतून विहार करतील. ही कल्पना नाही तर वस्तुस्थिती बनू शकेल व सन 2016 मध्ये जन्माला आलेलल बालक त्यांच्या वयाच्या साठीत जेव्हा नदीचे गतवैभव हा लेक 2075 साली लिहिल तेव्हा सुंदर नदी म्हणजे फुलांनी नटलेली नदी असे वर्णन आवश्यक करेल.

या साठी जागा नको माती नको परवानगी नको. फक्त प्रत्येक स्थानिक प्रशासनाने जाळी व बांबू उभे करण्याचे मनावर घेणे गरजेचे आहे. प्रथम नदीतील जलपर्णी बाजूला ढकलून आणतांना काही जलपर्णी एकमेकाच्या बोकांडी पडेल पण वनस्पती शक्यतो कोणाला स्वत:च्या डोक्यावर बसवून ठेवून पोसत नाहीत. प्रत्येकाला स्वत:च्या अन्नाचा शोध घ्यावाच लागतो. माणसापेक्षा वनस्पती वेगळ्या आहेत.

“करून तर पहा प्रयोग” आणि सांगा !!!

मालिका - श्री. विकास पाटील, पुणे, मो : 07798811512

Path Alias

/articles/nadai-gatavaaibhavaacai-apaekasaa-bhaaga-11

Post By: Hindi
×