मुलाखतीचा सारांश


येत्या 50 वर्षांनंतर जग कसे असेल यावर आपले मत प्रकट करतांना संदीप वासलेकर म्हणाले की, या विषयाबद्दल निश्चित की, पाणी हा जगाचा भेडसावणारा एक महत्वाचा प्रश्न असेल. या मुद्द्याचे स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले 150 वर्षांपूर्वी पेट्रोल नव्हते, 100 वर्षांपूर्वी विमान नव्हते, 25 वर्षांपूर्वी इंटरनेट व मोबाईलच नव्हते, कुणा एका कल्पक माणसाच्या कल्पनेतून या गोष्टी उत्पन्न झाल्या आणि जगाची दिशा बदलली, प्रगती, ज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्यांच्या मुळाशी आहे ती कल्पना.

येत्या 50 वर्षांनंतर जग कसे असेल यावर आपले मत प्रकट करतांना संदीप वासलेकर म्हणाले की, या विषयाबद्दल निश्चित की, पाणी हा जगाचा भेडसावणारा एक महत्वाचा प्रश्न असेल. या मुद्द्याचे स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले 150 वर्षांपूर्वी पेट्रोल नव्हते, 100 वर्षांपूर्वी विमान नव्हते, 25 वर्षांपूर्वी इंटरनेट व मोबाईलच नव्हते, कुणा एका कल्पक माणसाच्या कल्पनेतून या गोष्टी उत्पन्न झाल्या आणि जगाची दिशा बदलली, प्रगती, ज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्यांच्या मुळाशी आहे ती कल्पना. येत्या 5 - 10 वर्षात कोणाची कोणती कल्पना विकसित होईल यावरच जगाचे पुढचे भवितव्य ठरेल.

जर अशा नव्या कल्पना करून व त्याला सातत्याने परिश्रमाची जोड देवून ज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात आपण भर घालीत राहिलो नाहीत तर आपली दिशा खुंटेल, प्रगती बंद होईल. आपण आहे तिथेच एका खुंट्याभोवती गोल गोल फिरत राहू. उदारणच द्यायचे झाले तर 20 व्या शकतात चौथ्या व पाचव्या दशकामध्ये आय.आय.टी खरगपूर, बी.आय.एफ.आर, मुंबई, Indian Institute of Sciences, Bangalore यासारख्या संस्था निर्माण झाल्या त्यानंतर हे सारे थांबले. मूलभूत विज्ञानात संशोधन करण्यात आपण मागे पडलो. त्यामुळे उद्याचे भवितव्य काय त्याचे उत्तर तुमच्या मुर्खपणाचे भवितव्य काय यात शोधावे लागेल. असा शोध घेणे म्हणजे Hot Ice या संकल्पनेचा शोध घेण्यासारखे आहे.

मात्र, असे गेल्या 5 शतकांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की त्या स्थिर आहे, मुलभूत आहे, जीवनाच्या केंद्रभागी आहेत. उदाहरण द्यायचे तर सन 1918 ते सन 1648 ही तीस वर्षे युरोपभर पाणी या विषयावर घनघोर युध्द झाले. याचा परिणाम म्हणजे युरोपभर पाण्याचा वापर कसा करावा यावर एक विचार निश्चित झाला. तशा दृष्टीने करार झाले. त्यातूनच व्हेनिस सारख्या शहरात नद्या या रस्ते म्हणून वापरल्या गेल्या.

आज 148 देशांमध्ये पाणी टंचाई आहे आणि तिथेच दहशतवादही आहे, धर्म, तेल, पैसा याचा दहशतवादाशी संबंध नाही, पण पाण्याचा आहे. त्यामुळे जगातले पुढचेही युध्द टाळायचे असेल तर त्याचे भवितव्य पाण्याच्या नियोजनावर अवलंबून असेल, असे नियोजन करून नीटपणे अंमलात आणले तर युध्द टळेल अन्यथा जगात दहशतवाद थैमान घालू शकतो. उपलब्ध पाण्यापैकी सुमारे 85 टक्के पाणी हे शेतीसाठी वापरले जाते. शेते पिकतात तेथे लोकांना रोजगार मिळतो. त्यातून अन्य गोष्टींकडे वळणे हे बंद होऊ शकते.

भारतात किमान 50 कोटी लोक हे शेती किंवा शेतीसंबंधी व्यवसायात आहेत. मात्र त्या विषयात ज्ञानाची आदान प्रदान व संशोधन हे करण्यासाठी केवळ 22 कृषी विद्यापीठे आहेत. कमी पाणी किंवा पाण्याचा कमी वापर म्हणजे कमी प्रगती असे आजचे चित्र आहे. हे बदलायचे असेल तर या विषयात मुलभूत संशोधन व्हायला हवे, किंवा सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हायला हवे.

पर्यावरण, पाणी आणि उर्जा या सर्वच जगाला भेडसावणाऱ्या तीन प्रश्नांमुळे जगाचा प्रश्न बदलू शकतो का ? यावर आपला विचार मांडतांना बासलेकर म्हणाले, तसा बदल घडू शकतो मात्र त्यासाठी वर उल्लेखलेली कारणे पुरेशी नाही. राष्ट्र या विषयासंबंधीचा जगभरातल्या कल्पना या बदलू लागल्या आहेत. त्यामुळे जे विभाग (Cluster) हे जास्त प्रगत तेच सशक्त एकत्र येऊन हा बदल घडवून आणू शकतात. मात्र हे सारे करतांना केवळ शौचालये नसल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 50 हजार लोक मरतात. या सारख्या गोष्टीही लक्षात घ्याव्या लागतील त्यामुळे बदल घडवायचा असेल तर खरी गरज आहे ती नव्या कल्पना, नव्या दिशा, नवे विचार यांची.

तुर्केस्थानने 2002 साली लोकप्रतिनिधींच्या सर्वच सवलती बंद करून त्यांनी सर्व सामान्य माणसासारखे वागावे असा वर हुकुम काढला आणि 24 तासात देशात बदल घडायला सुरूवात झाली. सिंगापूरमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याने आपल्या आखत्यारित असलेल्या खात्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून कोणतीही सूचना दिली तर त्या नेत्याला तुरूंगवासाची शिक्षा होते असा हा कायदा आहे. तसेच आपला वरिष्ठ अधिकारी काही चुकीचे वागत आहे असे आढळले तर हाताखालच्या अधिकाऱ्याने त्याच्या बद्दल सर्वाेच्च अधिकाऱ्याकडे तक्रार केली पाहिजे. तशी त्याने तक्रार न केली आणि वरिष्ठ अधिकारी चुकीच्या कामाबद्दल सापडला तर कनिष्ठ अधिकाऱ्याला जास्त शिक्षा होते व 21 दिवसाच्या आत चौकशीला उत्तर दिले नाही तर वरिष्ठ अधिकारी हा बडतर्फ होतो. चांगले घडवण्याची इच्छाशक्ती हीच खरी या बदलामागची मुळ प्रेरणा आहे.

तापमान वाढीमुळे भारतावर काय परिणाम होईल त्यावर चर्चा करतांना ते म्हणाले की, मला तीन महत्वाचे बदल जाणवतात. सध्याच्या वेगाने तामपान वाढ सुरू राहिली तर, येत्या सात आठशे वर्षात, हिमालयातील बर्फ पूर्णत: लुप्त होईल. येत्या 50 वर्षातच या हिमालयीन नद्यांचे प्रवाह 4 -5 टक्के इतके कमी होईल. म्हणजेच नद्यांतील पाणी 4 - 5 टक्के कमी होईल या बाबीचा कृषी उत्पादनावर व आरोग्यावर फार गंभीर परिणाम होईल. त्याचे सामाजिक परिणाम तापदायक असतील, अर्थात हे फक्त भारतीयांपूरतेच नसतील. 2013 मध्ये आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत मात्र, 2050 साली वाढती लोकसंख्या, घटत जाण्याची पाण्याची उपलब्धता आणि त्यामुळे घटललेली जमिनीची क्षमता यामुळे रोजगार 50 पर्यंत 20 ते 30 टन अन्नधान्य कमी पडेल. आणि हे कमी अन्न पडणारे धान्य कुढून आयात करायचे हा नवाच प्रश्न उभा राहील कारण सर्व जगभराची परिस्थिती ही भारतासारखीच असेल.

त्यामुळेच पाणी, शेती, पर्यावरण व भूकबळी हे सर्व तापमान वाढीचे परिणाम दिवसेंदिवस तीव्रतेने होतांना दिसतील. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे विज्ञान 20 वे शतक हे Physics चे होते. 21 वे शतक हे बहुधा जीवशास्त्राचे असेल, कदाचित Bio- physics चे असेल. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने अंतराळात प्रवास करता येईल का ? या प्रश्नाबरोबरच ब्लड - ब्रेड - बॅरिअर हे कसे तोडता येईल हा प्रश्न जीवशास्त्राला हाताळावा लागेल. त्यातून कृत्रिम डी.एन.ए. कृत्रिम मेंदू, मनुष्य आणि प्राण्याच्या पेशींच्या मिलनातून नवा जीव पूर्णत: synthetic जीव अशी नवी संशोधन सिध्द झालेली दिसतील.

इंग्लंड, अमेरिका, चीन येथे या प्रकारावर अनेक प्रयोग सुरू आहेत. त्यातूनच कमी अन्न खाणार, कमी पाणी वापरणारा जीव विकसित होणे शक्य आहे. कोणतेही नवीन तंत्रज्ञान हे मागील गोष्टी पूर्णपणे बदलून जगाला नवी दिशा दाखवतो. अशा बदलामुळे अशा वेळी नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे ही फार महत्वाची गोष्ट ठरणार आहे.

त्याचबरोबर या सभोवतालचा बदलत्या वातावरणात मी स्वत:मध्ये काय बदल करू शकतो ? व या बदलत्या वातावरणात कशाप्रकारे Adjust करू शकतो ? यावरच खरे यश अवलंबून आहे. त्यामुळेच या सर्व नव्या, संकल्पनांना जुन्या तत्वज्ञानाची व धार्मिकतेची जोड देणे महत्वाचे आहे असे चीनसारख्या, राष्ट्राला देखील वाढू लागले आहे. त्यामुळे एकीकडे तंत्रज्ञान व विकास याबद्दल काम करतांना चीन तंत्रज्ञानावर चर्चा करण्यासाठी 55 केंद्र उघडतो, एकीकडे जगावर प्रभुत्व जागवण्याचा प्रयत्न करतांना, दुसरीकडे चीन तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी 500 मिलीयन डॉलर खर्च करतो. ही बाब लक्षात घेण्यात आली आहे.

आपण काय करणार आहोत हाच कळीचा मुद्दा आहे. अजूनही आपण बदल घडवून लाणू शकू अशा लवचिक मर्यादेत आहोत. आरोग्य, शिक्षण, रस्ते. पाणी आणि पर्यावरण हे त्या बदलाचे पाच मार्ग आहेत.

Path Alias

/articles/maulaakhataicaa-saaraansa

Post By: Hindi
×