महारूद्र कालवा पाणी वापर सह.संस्था म.मालेगाव यशोगाथा, अडचणी व उपाययोजना


कृष्णा कालवा पाणी वापर संस्थेने सन 2008 पासून कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मदिनी 14 जुलै ला दर वर्षी पुरस्कार जाहिर केलेला आहे. आमच्या संस्थेने पुरस्कारासाठी रितसर प्रस्ताव तयार करून पाठवला व त्या प्रस्तावावर योग्य निवड होऊन सतत 2008- 2009 या दोन वर्षात आमच्या संस्थेस दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन मा. भरतभाऊ कावळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दुसरे वर्षी मा.डॉ.माधवरावजी चितळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आमची महारूद्र कालवा पाणी वापर सहकारी संस्था पूर्णा प्रकल्पाअंतर्गत पाटबंधारे विभाग वसमत मालेगांव वितरीका क्र.1 वर सन 2001 या वर्षी स्थापन करण्यात आली. आमच्या संस्थेचे जि.सी.ए. 492 हेक्टर व ए.सी.ए 390 हेक्टर भीजू शकणारे क्षेत्र आहे व संस्थेचे एकूण लाभधारक 340 आहेत.

पाण्याचा पाहिजे तसा योग्य वापर करता यावा यासाठी विविध योजना राबवून पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीकोनातून पाणी वापर संस्थेची निर्मिती केलेली आहे. लाभधारकांच्या दृष्टीने ही हितावह व फायदेशीर आहे. असे संस्था निर्मितीतून स्पष्ट होत आहे. याची प्रचिती माझ्या महारूद्र कालवा पाणी वापर सहकारी संस्था म.मालेगांव याद्वारे सर्वांना झाली आहे.

पाण्याचा योग्य वापर, पाण्याची काटकसर लाभधारकांत एक सुत्रीपणा, नियोजनबध्द पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टी आत्मसात करून महाराष्ट्रात यशस्वी झालेली संस्था म्हणून विविध प्रशस्तीपत्रे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तरी महाराष्ट्रात सर्व सिंचन क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पाणी वापर सहकारी संस्था होणे गरजेचे आहे. जेणेकरून सिंचन कार्यात लाभधारकांचा जास्तीत जास्त सहभाग होऊन शेती जसी आपली आहे तसे पाणी सुध्दा आपले आहे याचा वापर काटकसरीने करून पाण्याची बचत करावी.

परंतु शासनाने पाणी वापर संस्था स्थापन करते वेळी चेअरमन अध्यक्षांची निवड अथवा सदस्यांची निवड करण्यासाठी खालील अटी / नियम लादणे आवश्यक आहे.

1. संस्थेचे अध्यक्ष व सदस्य सुशिक्षीत कमीत कमी मॅट्रीक होणे आवश्यक आहे.
2. संस्थेमध्ये सभासद व संचालक यांच्या मध्ये एकसुत्रीपणा असणे व अडचणी सोडवणे आगत्याचे आहे.
3. शेतकरी हा हेड ते टेल पर्यंत कुठल्याही क्षेत्रातील शेतीचा मालक असावा कारण शेतकऱ्यांच्या विश्वासक नेहमी संपर्कातील एक शेतकरी म्हणून ओळखला जाणारा असावा.

4. पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आज तसे काहीच अधिकार नाहीत. त्यामुळे पाणी वाटप, पाणीपट्टी वसुली, अशा अनेक बाबतीत त्यांना अडचणी येतात. पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार देण्याची तरतुदी 2006 च्या कायद्यात आहेत त्या लवकर अंमलात आणाव्यात. पदाधिकारी यांच्या जबाबदाऱ्या जास्त आत्मविश्वासाने व अधिकाराने पार पाडू शकतील.

पाणी पट्टी वसुली :


1. संस्थेतर्फे भिजलेल्या क्षेत्राची आकारणी वसुली साठी आम्ही साखर कारखान्याकडून सभासदांच्या ऊस बिलातून वसुली करतो. वसुलीचे प्रमाण 80 ते 90 टक्के आहे.

2.बँकेने पाणी वापर संस्थेचे बेबाकी पत्र घेण्याची व शेतकऱ्यांच्या सात-बारा वर बोजा टाकण्याची उपाययोजना करावी.

3. संस्थेतर्फे केवळ हंगामी पिकासाठी (उन्हाळी हंगामात) पाटबंधारे खात्याकडून घन मापन पध्दतीने पाणी घेऊन सभासदांना देण्यासाठी शासनाने पाण्याचे दर अंमलात आणावे. यावर पूर्ण विचार करून आवश्यक कायद्याची तरतुद करावी.

संस्थेस मिळालेले पुरस्कार :


कृष्णा कालवा पाणी वापर संस्थेने सन 2008 पासून कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मदिनी 14 जुलै ला दर वर्षी पुरस्कार जाहिर केलेला आहे.

आमच्या संस्थेने पुरस्कारासाठी रितसर प्रस्ताव तयार करून पाठवला व त्या प्रस्तावावर योग्य निवड होऊन सतत 2008- 2009 या दोन वर्षात आमच्या संस्थेस दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन मा. भरतभाऊ कावळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दुसरे वर्षी मा.डॉ.माधवरावजी चितळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती दिनी शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात येते.

शालेय स्तरावरून सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा घेऊन योग्य बक्षीस देण्यात येते.

संस्थेतर्फे सभासदांना शेतचारी दुरूस्तीसाठी 50 टक्के रक्कम देण्यात येऊन चारी स्वच्छ करण्यात येते.

आमच्या महारूद्र कालवा पाणी वापर संस्थे अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये पाणी घेण्याची शिस्त लागली असून पाण्याचा काटकसरीने वापर होत आहे. तेव्हा सर्व लाभधारकांनी पाण्याचे मोल, महत्व पटवून द्यावे, पाण्याची काटकसर बचत करावी व देश सुजलाम सुफलाम होईल देश म्हणून ओळखला जाईल यासाठी प्रयत्न करावेत.

जय हिंद जय महाराष्ट्र
चेअरमन
इश्वरराव पाटील
महारूद्र कालवा पाणी वापर सह. संस्था
म.मालेगाव ता.अर्धापूर जि. नांदेड

Path Alias

/articles/mahaarauudara-kaalavaa-paanai-vaapara-sahasansathaa-mamaalaegaava-yasaogaathaa-adacanai-va

Post By: Hindi
×