महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडायला हवा होता


नद्या, धरणे, तलाव व भूर्गभातील पाण्याचा सर्वात जास्त वापर होतो. तसेच नद्यांतील अतिक्रमण ज्यामुळे पुरासारखी समस्या निर्माण होते, प्रदूषण व पाण्याचा होणारा अपव्यय त्याचा परिणाम शेती, उर्जा, उद्योगधंदे, आरोग्य या घटकांवर होऊन समस्या वाढणार आहे म्हणून पाण्याचे संवर्धन आवश्यक आहे. मानवाला पिण्यासाठी पाणी कमी लागते मात्र त्या तुलनेत इतर कामात सर्वाधिक पाणी वापरले जाते त्यासाठी वेगळा पर्याय निर्माण करायला हवा कारण पिण्याचे पाणी, स्वच्छ पाणी धुण्यासाठी, बागांसाठी वापरले तर जास्त खर्चिक असते. पिण्याच्या पाण्याचे आव्हान आहे त्याच बरोबर शेती व्यवसाय, फळबागा अडचणीत येऊन त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन वस्तूंच्या किंमती वाढतील.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाणी टंचाईचा प्रश्‍न तीव्र स्वरूपात भेडासावत असून पुढील काही महिन्यात ही समस्या जास्त प्रमाणात भेडसावणारी असेल. पाणी टंचाई ही समस्या नैसर्गिक तसेच मानव निर्मितही आहे. याची अनेक कारणे सांगता येतील. हवामान खात्यानेही देशात सरासरी इतका पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र तितका पाऊस झालाच नाही. महाराष्ट्रात शेती व पिण्याचे पाणी पावसावर अवलंबून असल्याने पडणारा पाऊस व त्याचे प्रमाण याला अधिक महत्त्व आहे तसेच जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांतील पाऊस फार महत्त्वाचा असतो त्यापैकी एका जरी महिन्यात पाऊस झाला नाही तर दुष्काळाची स्थिती निर्माण होते. यावर्षी नेमकं तेच झालंय. जुलै महिन्यात पावसानं दडी मारली, ऑगस्ट मध्ये काही ठिकाणी पाऊस झाला तर काही ठिकाणे पावसापासून वंचित राहिली. शिवाय जुलै मध्ये पावसाचे प्रमाण फारच कमी असल्याने त्याचे नुकसान भरून निघू शकले नाही. शिवाय शेतकरी, शासन, यांना पाऊस होईल अशी अपेक्षा होती मात्र पाऊस झालाच नाही. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात भरपूर प्रमाणात ढग होते मात्र पाऊस होत नव्हता त्याच वेळी राज्य सरकारने निर्णय घेऊन काही निधी व यंत्रणा उभी करून कृत्रिम पाऊस पाडला असता तर सध्या राज्यभर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसती. त्याच बरोबर एकदा पाऊस पडता झाला असता तर पावसाचे प्रमाण वाढून नद्या, नाले, तलाव व विहिरींना पाणी उपलब्ध होऊन पाण्याची पातळी वाढली असती, जनावरांना चारा व गवत उपलब्ध झाले असते.

प्रत्येक गावाची व शहराची लोकसंख्या वाढली आहे. क्ष्या तुलनेत मिळणार्‍या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गावातील दूषित पाणी, कचरा वाहून गेला नाही त्याचा परिणाम डासांची निर्मिती होऊन रोगांची साथ पसरत आहे त्यामुळे मानवी आरोग्य बिघडत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने हवामानातही बदल जाणवतो आहे कारण पाऊस झाला असता तर हवेत गारवा निर्माण झाला असता. तसे होत नाही. येथून पुढे दिवसा तापमान जास्त व रात्री तापमान कमी यामुळे आरोग्याच्याही समस्या वाढतच जाणार आहेत.

दिल्ली येथे एका कार्यक्रमात ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी पाण्याचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे असे सांगितले आहे त्यांच्या मतानुसार वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असून तो सोडविण्यासाठी लोकसहभागातून पाण्याचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. हा विचार सर्वच स्तरातून कृतीत आणावा लागेल. सध्या नद्या, धरणे यावर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागते. येथून पुढे मात्र प्रत्येक गावाने आपली पाण्याची गरज गावातच पाण्याचे स्त्रोत निर्माण करून भागवावी लागणार आहे. म्हणजे पाण्यासाठी अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी पडणार्‍या पावसाचे पाणी प्रत्येक गावाने अडवून जिरवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात जेव्हा पावसाचे प्रमाण जास्त असते व जेव्हा नद्यांना पूर येतात तेव्हा लोक पाणी अडवत नाहीत किंवा तसा प्रयत्न गावातून होत नाही मात्र जेव्हा पाणी टंचाई निर्माण होते तेव्हा लोक (जनता) रस्ते अडवतात व पाण्याची मागणी करतात म्हणून लोकांनी रस्ते अडवण्यापेक्षा पाणी अडवणे याची सध्या गरज आहे.

राजस्थानात लोकसहभागातून केलेल्या प्रयत्नांमुळे पाण्याचा प्रश्‍न संपवला आहे. तशीच गरज महाराष्ट्रात असून त्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

नद्या, धरणे, तलाव व भूर्गभातील पाण्याचा सर्वात जास्त वापर होतो. तसेच नद्यांतील अतिक्रमण ज्यामुळे पुरासारखी समस्या निर्माण होते, प्रदूषण व पाण्याचा होणारा अपव्यय त्याचा परिणाम शेती, उर्जा, उद्योगधंदे, आरोग्य या घटकांवर होऊन समस्या वाढणार आहे म्हणून पाण्याचे संवर्धन आवश्यक आहे. मानवाला पिण्यासाठी पाणी कमी लागते मात्र त्या तुलनेत इतर कामात सर्वाधिक पाणी वापरले जाते त्यासाठी वेगळा पर्याय निर्माण करायला हवा कारण पिण्याचे पाणी, स्वच्छ पाणी धुण्यासाठी, बागांसाठी वापरले तर जास्त खर्चिक असते. पिण्याच्या पाण्याचे आव्हान आहे त्याच बरोबर शेती व्यवसाय, फळबागा अडचणीत येऊन त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन वस्तूंच्या किंमती वाढतील. शासकीय यंत्रणेला सतर्क राहणे आवश्यक आहे. उद्योगक्षेत्रात पाण्याअभावी परिणाम होऊ शकतो जून-जुलै 2010 पर्यंत म्हणजेच पाऊस पडेपर्यंत पाणी कपातीचा सर्वांनाच सामना करावा लागणार आहे. आतापर्यंत शहरी लोकांना मुबलक पाणी वापरण्याची असलेली सवय कमी करून बचत करावी लागणार आहे मग मुंबई, पुणे ,नाशिक किंवा नागपूर असो.

काही ठिकाणी शहरी वसाहतींमध्ये जंगली प्राणी, पक्षी शिरकाव करतात याचे मुख्य कारण त्यांना जंगलात किंवा माळरानावर पाणी सहज मिळत नाही म्हणून ते आपला मोर्चा मानवी वस्ती किंवा शहरांकडे वळवितात. उदा. माकडे, चित्ता, बिबट्या, रानटी कुत्री, मोर ,बगळा इ.

भविष्यात या पर्यावरण विषयक समस्या निर्माण होऊ नये. पावसाचे प्रमाण कमी होईल असे वाटल्यास कृत्रिम पाऊस पाडावा तशी यंत्रणा तयार करावी. पाण्याची उपलब्धता, वापर व नियोजन आवश्यक आहे याचा विचार शासन व नागरिक या सर्वांनी करावा.

श्री. संतु शिनगर, निफाड, जि.नाशिक

Path Alias

/articles/mahaaraasataraata-kartaraima-paausa-paadaayalaa-havaa-haotaa

Post By: Hindi
×