खजाना विहीर - एक पुरातन सिंचन व्यवस्था


विहिरीतून निघणाऱ्या भूमिगत बांधीव कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी व प्राणवायू/ हवा पुरवठयासाठी या कालव्यावर दुरुस्ती झडपा अंतराअंतरावर दगडी चिरेबंदी स्वरुपात बांधण्यांत आलेल्या आहेत. 2.50 कि.मी. लांबीच्या भूमिगत कालव्यावर एकूण 53 झडपा आहेत. या दुरुस्ती झडपा जुन्या चिरेबंदी आडासारख्या बांधलेल्या असून त्यांची खोली 5 मी. ते 5.50 मी. पर्यंत व व्यास 2 फुट आहे. अशी ही वैभवसंपन्न विहीर आज अनेक समस्यांनी ग्रस्त झालेली आहे. विहिरीच्या सिंचन क्षमतेत घट तर होतेच आहे. तथापी, विहिरीच्या लाभधारकांमध्ये सहकारी तत्वावर पाणी वापर व निगराणी बाबत पुरेशी सजगता दिसून येत नसल्याने या वैभवशाली योजनेतून प्राप्त होणारे लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत आहे ही खरी चिंतेची बाब आहे.

सुमारे 435 वषांर्पूर्वी एका नाविन्यपूर्ण सिंचन प्रकल्पाची निर्मिती तत्कालीन शासन व्यवस्थेद्वारा करण्यात आली. या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांचा लाभ आजतागायत सामाजाला अव्याहतपणे मिळत आहे. पाण्याचा नैसर्गिक खजीना शोधून उत्तम तंत्रज्ञानाच्या आधारे बीड शहरापासून 6 कि.मी.अंतरावर एक विहीर बांधून पुढे भुमिगत कालव्याव्दारे पाणी वळवून त्या योगे बीड परीसरातील 212 हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यात आली. या विहिरीची खजाना विहीर या सार्थ नावाने पुढे ओळख निर्माण झाली.

बीड शहराच्या दक्षिणेस पसरलेल्या बालाघाट डोंगर रांगा आहेत. बालाघाट घाटमाथा व उतारावरील बेसाल्टिक खडक कठीण असले तरी आडव्या भेगांनी युक्त आहेत. बालाघाटाच्या पायथ्याच्या उतारावरील छोटेखानी पाणलोट क्षेत्राच्या परिसरात अंशत: विघटीत झालेल्या दगड, गोटे, वाळू मिश्रित खडकाचा थर 8 ते 12 मी. चा आहे. या थरातून निचरा होऊन पाझरणारे पाणी जेथे बाहेर पडते त्या ठिकाणी बोगदे काढून ते पाणी खजाना विहीरीत आणण्यात आले असावे असा भूगर्भ शास्त्रीय अंदाज आहे. सध्याच्या परिस्थितीत या विहिरीद्वारे पांचशे चोवीस एकर क्षेत्र भिजू शकते.

या विहिरीबाबत महाराष्ट् शासनाने 1969 मध्ये प्रसिध्द केलेल्या गॅझीटीयर्स पान 659 वर दिलेली माहीती खालील प्रमाणे आहे.

“ Khazana Bavli : A little over four kilometers (three miles) West of Bid near the village Pali is a large well called the Khazana bavli which was constructed about 1582 A.D. by the then Jagirdar of Bid. There are three inlets which feed the well and only one outlet. The source of water supply has not yet, been traced. It has channels built for Irrigation purposes which irrigate over a thousand acres of land. Its water level remains the same at all times of the year.”

खजाना विहिरीची स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्ये:


मुख्य विहीर : चौकोनी दगडी चिरे व चुन्याचा वापर करुन विहीर बांधण्यांत आलेली आहे. जमीन पातळीपासून विहिरीची एकूण खोली 7 मी. आहे. जमिनीपासून 4.70 मी. खोलीपर्यंत विहीरीचा आतील व्यास 19.00 मी. असून त्या खाली हा व्यास 12.60 मी. एवढा आहे.

खजाना विहीरीची ठळक वैशिष्टये :


मुख्य विहीर : चौकोनी दगडी चिरे व चुन्याचा वापर करुन विहीर बांधण्यांत आलेली आहे. जमीन पातळीपासून विहीरीची एकूण खोली 7 मी. आहे. जमीनीपासून 4.70 मी. खोलीपर्यंत विहीरीचा आतील व्यास 19.00 मी. असून त्या खाली हा व्यास 12.60 मी. एवढा आहे.

आगम बोगदे (इनलेट) : 12.60 मी. व्यास व 2.25 मी. खोली असलेल्या विहिरीच्या तळाच्या भागात दोन आगम बोगदे आहेत. या दोन बोगद्याव्दारे विहिरीत पाणी येत असते. बोगद्याचा आकार 0.80 मी. रुंद न् 1.65 मी. उंच असून याचे बांधकाम चिरेबंदी आहे. डावीकडील बोगद्याचा खंदक 4 ते 5 मीटर जमिनीखाली व 540 मी. लांब दक्षिणेस बिंदुसरा नदीच्या प्रवाहापर्यंत असल्याचे नमूद आहे. विहिरीत सतत अडीच ते तीन फुट पाणी संथ व बहूधा कायम असते. अतिशय टंचाईच्या काळात देखील या विहिरीचे पाणी कांही अंशी कमी होत असले तरी ही विहिर कोरडी पडल्याचे दिसून येत नाही. हे या योजनेचे वैशिष्टय म्हणावे लागेल.

निर्गम बोगदा (आउटलेट टनेल) : उत्तरेकडील विमोचक 0.80 मी. रुंद न् 1.50 मी. आकाराचा आहे. हे विमोचक चिरेबंदी असून त्याचे तळ सुरवातीस विहिरीच्या तळपातळीपेक्षा 20 से.मी. ने वर आहे. खजाना विहिरीपासून काढण्यांत आलेला विमोचक बोगदा विहिरीपासून बिंदुसरा नदीपर्यंत 213 मी. लांब आहे. त्यानंतर नदीच्या पात्रातील तलांक पातळी खाली 170 मी. इतका लांब आहे. मोठे पात्र असलेल्या नदीखालून कालवा नेणे हे त्याकाळच्या सिंचन व्यवस्थेची प्रगतीच दर्शविते. बोगद्यातील पाणी पुढे सिंचनासाठी जमीन पातळीवर येईपर्यंत बांधण्यांत आलेल्या बोगद्याची एकूण लांबी 2448 मी. आहे. त्यापुढे 3.90 कि.मी. लांब खुला कालवा आहे. यावर 11 आऊटलेट असून, त्याखाली 212 हे. क्षेत्र भिजते.

दुरुस्ती झडपा तथा वायुविजन झडपा :


विहिरीतून निघणाऱ्या भूमिगत बांधीव कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी व प्राणवायू/ हवा पुरवठयासाठी या कालव्यावर दुरुस्ती झडपा अंतराअंतरावर दगडी चिरेबंदी स्वरुपात बांधण्यांत आलेल्या आहेत. 2.50 कि.मी. लांबीच्या भूमिगत कालव्यावर एकूण 53 झडपा आहेत. या दुरुस्ती झडपा जुन्या चिरेबंदी आडासारख्या बांधलेल्या असून त्यांची खोली 5 मी. ते 5.50 मी. पर्यंत व व्यास 2 फुट आहे.

अशी ही वैभवसंपन्न विहीर आज अनेक समस्यांनी ग्रस्त झालेली आहे. विहिरीच्या सिंचन क्षमतेत घट तर होतेच आहे. तथापी, विहिरीच्या लाभधारकांमध्ये सहकारी तत्वावर पाणी वापर व निगराणी बाबत पुरेशी सजगता दिसून येत नसल्याने या वैभवशाली योजनेतून प्राप्त होणारे लाभाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कमी होत आहे ही खरी चिंतेची बाब आहे. करिता या विहिरीचे संरक्षण व संवर्धन त्वरेने होण्याची आज तातडीची गरज आहे. खजाना विहिरीची ठळक वैशिष्टये -

 

बांधकाम वर्ष

इ.सन 1572 (991 हिजरी )

 

विहीरीचा व्यास

बाहेरुन

आतून

जमीन पातळीवर

20.00 मी.

19.10 मी.

4.70 मी. खोलीवर

12.60 मी.

 

विहीरीची एकूण खोली (जमिनीपासून)

7.00 मी. (4.70 x 2.30)

 

आगम बोगदे (इनलेटस)

दोन (0.80 x 1.65 मी.)

 

निर्गम बोगदा (विमोचक आऊटलेट)

एक (0.80 x 1.50 मी.)

 

भूमिगत निर्गम बोगद्याची लांबी

2.50 कि.मी. (8140 फुट)

 

भूमिगत कालव्यावरील दुरुस्ती तथा वायुविजन झडपांची संख्या

52

 

उघडया कालव्याची लांबी

3.90 कि.मी. (12753 फुट)

 

पाण्याचा प्रवाह

1.20 घ.मी. / सें.

 

एकूण भिजणारे क्षेत्र

212 हेक्टर (524 एकर)

 

 

श्री. गजानन देशपांडे, औरंगाबाद

Path Alias

/articles/khajaanaa-vaihaira-eka-pauraatana-saincana-vayavasathaa

Post By: Hindi
×