इस्राईलचा नैसर्गिक शुद्ध पाणी वापर हा 100 टक्के पाण्याचा गंभीर प्रश्न समुद्र जलनि:क्षारीकरणामुळे सुटला आहे. इस्रालईलच्या पाणी नियोजन मंडळाने 2015 पर्यंत 500 दशलक्ष घनमीटर प्रति वर्ष या प्रमाणात समुद्र जलनि:क्षारीकरणास परवानगी दिलेली आहे. वर्ष 2010 मध्ये 315 दशलक्ष घनटमीटरपर्यंतचे उद्दिष्ट साध्य होत आहे. अॅशेकलॉन केंद्राने 100 दशलक्ष घनमीटर प्रति वर्षाचे उद्दिष्ट वर्ष 2005 पासून साधलेले आहे.
आपल्याकडे दरवर्षी कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे समुद्राचे जल नि:क्षारीकरण करून हे पाणी पिण्यासाठी वापरण्याची चर्चा होत असते; परंतु इस्राईलसारख्या देशाने चर्चेच्या पुढे जाऊन समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करून त्याचा वापर पिण्यासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी केला आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, रेन गन इत्यादी सिंचनाच्याबाबत नवीन आविष्कारासोबतच आता जल नि:क्षारीकरण क्षेत्रातही इस्रालईलचा दबदबा आहे.इस्राईलने जल नि:क्षारीकरणाचे पहिले केंद्र अॅशेकलॉन येथे डिसेंबर 2005 मध्ये सुरू केले. याचबरोबरीने इतर चार प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. हे केंद्र सुरू करण्याअगोदर इस्राईल सरकारने मोठ्या प्रमाणावर धोरणात्मक आणि आर्थिक नियोजनामध्ये बदल घडवून आणले. देशातील शेती तंत्रज्ञानाबरोबरच जल तंत्रज्ञानामधील बदल घडवून आणण्यासाठी शेतीसाठी पाण्याचा वापर, अत्यल्प पर्जन्यमान, दुष्काळातील सातत्य, घसरती जलपातळी, शुद्ध पाण्याचे वाढते दर, शेती आणि दैनंदिन वापरात असलेल्या पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्धतेतील तफावत आणि गेल्या दशकातील रिव्हर्स ऑसमोससी तंत्रज्ञानामध्ये झालेली प्रगती, कार्यक्षमतेत झालेली वाढ हे महत्त्वाचे ठळक मुद्दे लक्षात घेतले गेले. या तंत्रज्ञानामध्ये गाळण्या (मेम्ब्रेन), उच्च दाबाचे पंप, ऊर्जा उत्सर्जन पद्धतीमधील सुधारणांमुळे तंत्रज्ञानामधील कमी झालेल्या किमती लक्षात घेऊन इस्राईलने जल नि:क्षारीकरण तंत्रज्ञानामध्ये प्रगती केली.
आज इस्राईलमध्ये शुद्ध पाण्याची किंमत 18 ते 23 रुपये प्रति घनमीटर आहे. सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची किंमत 20 ते 30 रुपये प्रति घनमीटरपर्यंत जाते; पण सांडपाण्याचे शुद्ध केलेले पाणी पुन्हा गरजांसाठी वापरण्याची मानसिकता नसल्यामुळे, तसेच उदासीनतेमुळे हे पाणी शेतीसाठी वापरले जाते. या अनुषंगाने समुद्र जलनि:क्षारीकरणाची किमत 25 ते 30 रुपये प्रति घनमीटरपर्यंत येते; परंतु हे शुद्ध पाणी वापरण्यास नागरिकांचा उत्साह दिसून येतो आणि त्याकरिता त्यांची थोडे जास्त पैसे मोजण्याची मानसिकता असते.
नि:क्षारीकरणामुळे मिळालेले पाणी हे राष्ट्रीय पाणी वाहक यंत्रणेमध्ये (National Water Carrier) मिसळले जाते. त्यामुळे नैसर्गिक शुद्ध पाण्याचे गुणधर्म बदलतात. हे पाणी घरगुती तसेच कारखानदारीसाठी वापरण्यात येत आहे. या पाण्याच्या वापराने इलेक्ट्रिक व सौर ऊर्जेवर चालणार्या संयंत्रांच्या आयुष्यामध्ये वाढ होते, पाईपलाईनध्ये गंजण्याचे प्रमाण कमी होते. साबण, सोडा कमी प्रमाणात लागतो, त्यामुळे सांडपाण्याचे पुन्हा नि:क्षारीकरण करताना खर्च कमी होतो. कपड्यावर मिठाचे डाग पडत नाहीत, तसेच भांडे व भांडे धुण्याच्या यंत्रांमध्ये मिठाचे डाग पडत नाहीत.
इस्राईलचा नैसर्गिक शुद्ध पाणी वापर हा 100 टक्के पाण्याचा गंभीर प्रश्न समुद्र जलनि:क्षारीकरणामुळे सुटला आहे. इस्रालईलच्या पाणी नियोजन मंडळाने 2015 पर्यंत 500 दशलक्ष घनमीटर प्रति वर्ष या प्रमाणात समुद्र जलनि:क्षारीकरणास परवानगी दिलेली आहे. वर्ष 2010 मध्ये 315 दशलक्ष घनटमीटरपर्यंतचे उद्दिष्ट साध्य होत आहे. अॅशेकलॉन केंद्राने 100 दशलक्ष घनमीटर प्रति वर्षाचे उद्दिष्ट वर्ष 2005 पासून साधलेले आहे.
या सर्व बाबींचा विचार करता आपल्या देशातील महत्त्वाच्या महानगरांना जसे मुंबई, चेन्नई, कोलकता आणि अहमदाबाद या शहरांना सुमद्र जल नि:क्षारीकरणाचा लाभ उठविता येऊ शकतो, तसे या शहरांचे सध्याचे वापरात असलेले पाणी आपणास सिंचनासाठी वळविणे शक्य आहे. याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.
अॅशेकलॉन केंद्रामुळे दिसून आलेले फायदे
- सार्वजनिक पाणी वितरण यंत्रांची वाढलेली गुणवत्ता.
- उत्तरेकडच्या भागातून पाणी वाहून आणण्यास लागणार्या खर्चात बचत.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शुद्ध पाणी मिळण्याची खात्री व विश्वासार्हता.
(लेखक कृषी महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना येथे कार्यरत असून, त्यांनी इस्राईलमध्ये जल व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण घेतले आहे.)
Path Alias
/articles/khaayaa-paanayaacae-saudhadaikarana
Post By: Hindi