क्लबचे पाणी प्रकल्प राबविण्यातील योगदान


पाणी वाचवा योजनेअंतर्गत पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत शाळांमधील 1000 नळांना तोट्या बसवण्याचे काम हातात घेण्यात आले. यापैकी 100 तोट्यांचे काम पूर्ण झाले आहे. या कामात इतर क्लब्जचे सहकार्य घेण्यात येत आहे.

दरवर्षी क्लबचे अध्यक्ष व संचालक मंडळ बदलत असून सुद्धा क्लबने आपल्या जलसंधारणाच्या कामात सातत्य टिकवून ठेवलेले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे व शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन द़ेणे या कार्यक्रमावर प्रथम्याने जोर देण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागात खोलवर रुजलेला पाणी प्रश्‍न सोडविण्यात क्लबने मोलाचे काम केले. रोटेरियन दत्तात्रय देवधर, रोटेरियन भूतपूर्व अध्यक्ष श्री. राजा येलनूरकर, रोटेरियन नितिन पाठक आणि वर्तमान अध्यक्ष रोटेरियन श्री. सुधांशू गोरे यांच्या टीमने प्रकल्पांची निवड, त्यांचे योग्य नियोजन व अंमलबाजावणी यात रस घेतला. रोटेरियन श्री. श्रीराम गोगटे हे प्रकल्पासाठी अर्थप्रबंधन करणारे दाते शोधण्यात मदत करतात. गेल्या काही वर्षात क्लबने खालील प्रकल्प राबविले आहेत :

1. 2012-13 : गाव अंबावळणे (तालुका वेल्हा जि, पुणे) येथील एका शाळेला क्लबतर्फे 8 सॅनिटरी ब्लॉक्स पुरविण्यात आले. त्यावर पाण्याच्या टाकीचीही तरतूद करण्यात आली. यासाठी एकूण खर्च रुपये 80,000 इतका आला.

2. 2013-14 : त्याच शाळेला 1000 लिटर क्षमतेचा 10 तोट्यांची सोय असलेला मेंब्रेन वाटर फिल्टर पुरविण्यात आला शाळेच्या परिसरात राहणारी 22 कुटुंबेही या फिल्टरचा वापर करतात. यामुळे 800 विद्याथ्यार्ंच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली. यासाठी एकूण खर्च रुपये 85,000 इतका आला.

3. याच वर्षात सांगवी बुद्रूक (तालुका भोर जिल्हा पुणे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला तशाच प्रकारचा मेंब्रेंन वॉटर फिल्टर पुरविण्यात आला. पाइपलाईन टाकून त्याचा लाभ शेजारील 73 गावकर्‍यांनाही देण्यात आला. एकूण खर्च : रुपये 1,55,000 फक्त.

4. 2014-15 : दिवे (तालुका पुरंदर) येथील बोर्डिंग स्कूलला जल पुनर्भरणाचे युनिट बसवून देण्यात आले. त्यासाठी 2,16,000 रुपये खर्च आला.

5. याच वर्षी भोर तालुक्यातील कुरूंगवाडी येथील शाळेला मुलींच्या बाथरुमसाठी 4 सॅनिटरी युनिट्स पुरविण्यात आले. त्यांना टाकीची व पाइपलाईनची सोय आहे. यासाठी रुपये 87,000 एवढा खर्च आला.

6. 2015-16 : वेल्हा तालुक्यातील पळसी येथे ओव्हरहड टाकी, इलेक्ट्रिक पंप व पाइपलाईन बसवून देण्यात आली यामुळे पिण्याचे पाणी व 12 सॅनिटेशन युनिट्सना पाण्याचा लाभ झाला. यासाठी रुपये 37,000 इतका खर्च आला.

7. मे, 2016 : भोर तालुक्यातील बाजारवाडी नामक एका दूरच्या खेड्यात नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. एका जुन्या बंधा-याखालचा 2200 क्यूबिक मिटर गाळ काढण्यात आला. हा प्रकल्प रोटरी क्लब पुणे विद्यापीठ बरोबर घेण्यात आला. यासाठी एकूण 70,000 रुपये खर्च आला. या प्रकल्पामुळे 1348 गावकर्‍यांचा पिण्याचा प्रश्‍न सुटला तर जवळपास 164 हेक्टर जमिनीला सिंचन पुरविता आले. या कामात गावकर्‍यांच्या श्रमाचे मूल्य 2,16,000 रुपये एवढे होते. भोर तालुक्याच्या तहसिलदारांच्या विनंतीवरुन जलयुक्त शिवार योजने अंतर्गत हे काम घेण्यात आले. या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्ला सरकारी अधिकार्‍यांतर्फे मिळाला.

8. 2016-17 : पाणी वाचवा योजनेअंतर्गत पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत शाळांमधील 1000 नळांना तोट्या बसवण्याचे काम हातात घेण्यात आले. यापैकी 100 तोट्यांचे काम पूर्ण झाले आहे. या कामात इतर क्लब्जचे सहकार्य घेण्यात येत आहे.

9. दोन ग्लोबल ग्रँट्सचे काम हातात घेण्यात आले आहे. सध्या आम्ही परदेशी भागीदाराच्या शोधात आहोत.

Path Alias

/articles/kalabacae-paanai-parakalapa-raabavainayaataila-yaogadaana

Post By: Hindi
×