औद्योगिक वसाहतीत बोअर घेता येत नाही. जमिनीखालील ओल वाढवून हिरवळ व फुलझाडे तजेलेदार रहावेत, आपण भूगर्भातील पाण्याचा वापर करतो याची जाणीव ठेऊन जमिनीचा जलस्तर वाढावा तसेच वाहून गेलेले पाणी नाल्यात मिळून दुषीत होण्यापेक्षा जमिनीतीच मुरलेले चांगले. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ३२ हजार चौरस फुट प्लॉटवर जमा होणारे २७ लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यात आले.
वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एकत्रित प्रयत्नातून मराठवाडा एन्व्हॉर्मेंट केअर क्लस्टर’ स्थापण्यात आले. एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशनचे संचालक आणि सीआयआय मराठवाडा झोनल कौन्सीलचे चेअरमन श्री. प्रशांत देशपांडे यांनी त्याकाळात विशेष सहभाग नोंदविला. या एकत्रित प्रयत्नातून प्रेरीत होऊन आपणही आपल्या कंपनीत पाणी आणि पर्यावरणासाठी काय प्रयत्न करू शकतो ? असा विचार त्यांनी सुरू केला. त्यातूनच पुढे मग एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन’मधील वरिष्ठ सदस्यांनी चर्चा करून काही योजना आखल्या. सुदैवाने एक्सपर्ट ग्लोबल’च्या इमारतीचे काम चालू असताना कंपनीच्या प्लॉटवर पेटल ग्रुप’ या सामाजिक संस्थेने पर्यावरणपुरक होळीचा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमासाठी त्या ग्रुपने प्लॉटची लेव्हलींग इतकी छान केली की, या प्लॉटवर लॉन तयार कराव, शोभेचे झाडे लाऊन बाग तयार करावी त्याचप्रमाणे मोठी झाडे लावावी असा मोह कंपनीच्या सदस्यांना झाला. त्यांनी त्याची त्वरीत अमंलबजावणी पण केली.यानंतर पर्यावरणावर काम करावे म्हणून एक कर्मचारी एक तुळस हा उपक्रम राबविण्यात आला. अतिशय चांगली हिरवळ तयार झाल्यानंतर पाण्याचा योग्य वापर व्हावा म्हणून स्प्रिंकलर आणि ड्रीप यांचा वापर करायला सुरूवात झाली. त्याचप्रमाणे दहा किलोवॅट सोलार पॅनल बसविण्यात येवून त्या पॅनलखाली लंच रुमसुध्दा तयार केली. वाळूजमधील औद्योगिक वसाहतीतील जलसंधारणाच्या कामांनी प्रेरीत होत एक्सपर्ट ग्लोबल’ने हे काम हाती घेतले. पेटल ग्रुप’ने केलेल्आ लेव्हलींग मधून प्लॉटच्या जमिनीचा उतार उत्तर दिशेकडे अतीशय चांगल्या पध्दतीने तयार झाला होता. प्लॉटमध्ये पडलेला पाऊस आणि लगतच्या रोडवर पडलेले पावसाचे पाणी उत्तर दिशेला संरक्षक भिंतीजवळ जमा होत नालीद्वारे पुढे नाल्याला जात होते. या संरक्षक भितीला लागून दोन झाडांच्यामध्ये दगड, विटा, वाळू टाकून मोठे शोष खड्डे करण्यात आले.
त्याचप्रमाणे टेरेसवरील पाण्यासाठीसुध्दा मोठा शोषखड्डा तयार करण्यात आला. औद्योगिक वसाहतीत बोअर घेता येत नाही. जमिनीखालील ओल वाढवून हिरवळ व फुलझाडे तजेलेदार रहावेत, आपण भूगर्भातील पाण्याचा वापर करतो याची जाणीव ठेऊन जमिनीचा जलस्तर वाढावा तसेच वाहून गेलेले पाणी नाल्यात मिळून दुषीत होण्यापेक्षा जमिनीतीच मुरलेले चांगले. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ३२ हजार चौरस फुट प्लॉटवर जमा होणारे २७ लाख लिटर पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यात आले. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यात एक दिवशी चोवीस तासात ४० मि.मि. पाउस पडला. इतका पाऊस पडूनसुध्दा प्लॉटमधून पावसाचा एकही थेंब नाल्यात वाहून गेला नाही. संपुर्ण पाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरविल्या गेले. सर्वांनी एकत्र येत काम केले तर काय होते ? हे वाळूजच्या उपक्रमावरून लक्षात आले. पण प्रत्येकाने यात पुढाकार घेतला तर पाणी आणि पर्यावरणावर काम होऊ शकते. हे उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवत एक्सपर्ट ग्लोबल’च्या टिमने पाणीप्रश्नावर आपला खारीचा वाटा उालला.
श्री. सचिन खेर, संचालक - Expert Global
Path Alias
/articles/kaelayaanae-haota-ahae-adhai-kaelaecai-paahaijae
Post By: Hindi