जलवर्धिनी प्रतिष्ठान


पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे. पावसाळ्यात पडणारा पाऊस प्रत्येकाच्या जमिनीमध्ये, खाचरामध्ये, तसेच माळरानावरती जिरवून, साठवून त्याचा योग्य विनियोग व्हावा या उद्देशाने सन 2001 पासून जलवर्धिनी प्रतिष्ठानचे ट्रस्टी कामाला लागले. महाराष्ट्रामध्ये कमी - अधिक पडणारा पाऊस हा माणसाच्या उपयोगात कसा येऊ शकेल याचाअभ्यास करण्यास सुरूवात केली. याच उद्देशाने सन 2003 मध्ये त्यांनी जलवर्धिनी प्रतिष्ठानची स्थापना केली (रजिस्ट्रेशन क्र. E 21435 (मुंबई) व कर्जत तालुक्यात कामाला सुरूवात केली. पहिली दोन वर्षे ही गावपातळीवर तसेच आदिवासी वाड्या - पाड्यात जाऊन लोकांची भेट तिथे पडणारा पाऊस व त्याकरिता कोणते उपाय योजता येतील व त्यांच्याकडून कशाप्रकारे काम करून पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करून घेता येईल याचा पाठपुरावा करून सन 2005 मध्ये कर्जत तालुक्यातील (जिल्हा रायगड) मोरेवाडी गावात शेततळी, वनराई बंधारे, बावखळ या कामातून गावकर्‍यांना त्यांच्या जमिनीवर, खाचरांवर पडणारा पाऊस कसा जिरवता येईल याचे प्रात्यक्षिक व अनुभव बघावयास मिळाले.

तसेच छतावर पडणारे पाणी हे फेरोसिमेंटच्या टाक्यांमध्ये पागोळीद्वारे साठवून पावसाळ्यात तसेच पावसाळ्यानंतर वापरात येऊ शकते हा विश्वास निर्माण झाला.फेरोसिमेंटच्या दहा हजार लिटर क्षमता असलेल्या चार टाक्यांना सिटारा (CTARA) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) पवई, मुंबई यांच्याकडून अर्थसहाय्य मिळाले. पावसाचे पाणी योग्य तंत्रज्ञानाने प्रत्येकाला परवडेल अशा खर्चात कसे साठवता येईल याचा विचार करून 13 प्रकारच्या नमुन्यावर (मॉडेल) अभ्यास करून सन 2006 मध्ये कर्जत येथील कै.श्री.अनंत श्रीधर ओक वनौषधी संस्था कर्जत येथे पावसाच्या पाण्याचे पहिले दिशादर्शन केंद्र उभारण्यात आले. यामध्ये वरून पडणारा पाऊस सोप्या व कमी खर्चीक पध्दतीने कसा साठवता येईल तसेच त्याचा योग्य वापर शेतकर्‍यांना कसा करता येईल याची माहिती लोकांना दिली जाते.

अशा प्रकारची दिशादर्शन केंद्र प्रत्येक तालुक्यात किमान एके ठिकाणी व्हावीत म्हणजे त्या तालुक्यातील लोकांना पावसाचे पाणी साठवणे व त्याचा उपयोग योग्य त्या प्रकारे करणे या विषयी माहिती मिळू शकेल असे ट्रस्टींना वाटले म्हणून त्यांनी काही सामाजिक संस्थांशी संपर्क केला व त्यांना अशा प्रकारची दिशादर्शन केंद्र उभारण्यास मदत केली. खालील संस्थांच्या जागेत जलवर्धिनी प्रतिष्ठानने विविध प्रकारची (नमुने) मॉडेल्स तयार केली आहेत.

1. कै.श्री.अ.श्री.ओक, वनौषधी संस्थान गाव नांगुर्ले, ता. कर्जत, जिल्हा रायगड.
2. शबरी सेवा समिती, गाव कशेळे, ता. कर्जत, जिल्हा रायगड.
3. युसुफ मेहेरअली सेंटर, गाव तारा, तालुका पनवेल, जिल्हा ठाणे.
4. साळवी फार्म, गाव डोणे, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे.
5. दापोली अर्बन बँकेचे वरिष्ठ, सायन्स कॉलेज दापोली, ता.दापोली, जि.रत्नागिरी.

खालील संस्थांनी आमचा तांत्रीक सल्‍ला घेऊन विविध प्रकारचे नमुने (मॉडेल) तयार केली आहेत.

1. गिरीजनवासी प्रगती मंडळ (सोमय्या ट्रस्ट) गाव नरेशवाडी, ता.डहाणू, जिल्हा ठाणे.
2. इस्कॉन (ESKCON) गाव पाटील वाडा, ता.तलासरी, जिल्हा ठाणे.
3. एम.एल.ढवळे ट्रस्ट, गाव भोपोली, ता.विक्रमगड, जिल्हा ठाणे.
4. कै.चि.वि.खरे वाडी, गाव पालगड, ता.दापोली, जिल्हा रत्नागिरी.
5. डॉ.आंबेडकर वनवासी कल्याण ट्रस्ट, गाव अहवा, जिल्हा डांग, राज्य. गुजरात.

पाणी साठवण्याच्या विविध पध्दती किंवा प्रकार :


सरसारी वार्षिक पाऊस हा 500 मि.मी. ते 4000 मि.मी या मध्ये पडतो असे समजल्यास ज्या ठिकाणी सरासरी पाऊस 500 मि.मी. पडतो तेथे प्रत्येक एक एकर (4000 चौ.मि.) जमिनीवर 4000 X 0.5 = 2000 घन.मि (20 लाख लिटर) ते जेथे सरासरी पाऊस 4000 मि.मी पडतो तेथे 4000 X 4 = 16,000 घम.मि. (160 लाख लिटर) पाणी दरवर्षी उपलब्ध होते. हे पाणी ग्रामीण भागात जेवढे लागते तेवढे साठवून ठेवले तर पाण्याची कमतरता भासणार नाही.

अ. पावसाचे पाणी पिण्यासाठी कसे वापरावे ह्याचे दोन प्रकार :

1. घराच्या छपरावर पडणारे पाणी साठवणे.
2. टाकीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवणे.

ब. वरकस जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी साठवणे, फळझाडे लावण्यासाठी लागणारे पाणी त्याचे बारा प्रकार आहेत.

1. कोकण जलकुंड
2. बंकर कुंड
3. जीओमेंब्रेनचे तळे
4. नारळाच्या काथ्या वापरून केलेले जलकुंड
5. केळीचे धागे वापरून केलेले जलकुंड
6. अंबाडीचे धागे वापरून केलेल जलकुंड
7. तागाचे धागे वापरून केलेले जलकुंड
8. फेरोसिमेंटती जमिनीखाली बांधलेली टाकी.
9. फेरोसिमेंटची जमिनीवर बांधलेली टाकी.
10.1 हजार लिटर पाणी साठवण्याची सांगाडा वापरून बांधलेली टाकी (प्रकार 1)
11.1 हजार लिटर फेरोसिमेंटची सांगाडा वापरून बाँधलेली टाकी (प्रकार 2)
12.1 हजार लिटरची सांगाडा न वापरता बांधलेली टाकी.

क. शेतीसाठी वापरावयास लागणारे पाणी :
पावसाळ्यात पाऊस हा अनियमितपणे पडतो. दोन पावसामध्ये जास्त अंतर पडले तर खरीपाचे पिक हे पावसाअभावी जळून जाण्याची शक्यता असते.

म्हणून शाश्वत शेतीसाठी शाश्वत पाण्याची गरज आहे. यासाठी जर आपण पहिल्या पावसाचे पाणी खाचरामधील किंवा शेत जमिनीच्या 10 व्या भागात खड्डा करून साठवून ठेवले तर ते पाणी उरलेल्या 90 टक्के भागातील पिकास देण्यासाठी म्हणून वापरता येईल. याप्रमाणे संपूर्ण पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता असेल म्हणजे ज्यावेळेस पिकाला पाण्याची गरज असेल त्यावेळेस शेतातच पाणी साठवलेले असेल. अशा प्रकारे शेतकरी खरीपाचे शाश्वत पिक घेऊ शकेल.

अशा प्रकारे पाण्याची साठवण ईशान्य भारतात (North East) करतात व त्यास ऑन फार्म (Onform Reservoir) असे म्हणतात.

रब्बी पिकास पाणी कमी लागते. रब्बी पिक हे जमिनीतील पावसाच्या पाण्याचा ओलावा, हिवाळ्यात पडणारे दवाचे पाणी यावर अवलंबून असते. पण जर का शेवटचा पाऊस हा शेतात साठवलेला असेल तर ते साठवलेले पाणी रब्बी पिकास उपयुक्त ठरेल.

जमिनीच्या 10 व्या भागात किती पाणी साठवायचे ते त्या त्या ठिकाणी पडणार्‍या पावसावर व पिकावर अवलंबून राहिल.

ज्या जमिनीमधून पाणी जिरून जात असेल त्या ठिकाणी प्लास्टीक अंथरल्यास (वापरल्यास) 10 व्या भागात पाणी साठवले जाईल.

ड. गावातील माणसांसाठी (लोकांसाठी) व जनावरांसाठी लागणारे पाणी जर गावामध्ये तलाव निर्माण केले तर सुटू शकेल. गावासाठी किती मोठे तलाव किंवा किती तलाव व त्याचा आकार वगैरे बाबी गावात जाऊन सांगता येऊ शकेल.

जलवर्धिनी प्रतिष्ठान करत असलेला कार्यक्रम/उपक्रम.


- गाव पातळीवर पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याची माहिती सांगणे. या करिता मराठी माहितीपट (Documenters) द्वारा कर्जत तालुक्यातील बर्‍याच गावात जाऊन माहितीपट (Documenters) द्वारे माहिती सांगण्याचे कार्यक्रम केले आहेत.

- 2005 पासून दरवर्षी जूनमध्ये 500 घरांमध्ये द्रवरूप क्लोरिनच्या बाटल्या (100 मि.लि.) अंदाजे 13 ते 14 पाड्यात / वाड्यात वाटल्या जातात.

- तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथील तलावांची माहिती संकलीत केली जाते.

- गाववाडी येथे 2, भक्ताची वाडी येथे 3, कशेळे येथे 3, धोत्रे वाडी, फणस वाडी, खानांद, नागेची वाडी येथे प्रत्येक एक 10,000 लिटरच्या टाक्या, पाणी साठविण्यासाठी म्हणून लोकसहभागातून बांधल्या आहेत.

- 1000 लिटरच्या टाक्या चाफेवाडी, पिंगळस कशेळे, नागेची वाडी येथे बनवल्या आहेत.

- राष्ट्रीय सेवा योजना (ZSS) अंतर्गत दरवर्षी ग्रामीण भागातील कॉलेजेस शिबीर भरवितात. या अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांना पाणलोट विकास, पावसाच्या पाण्याचे नियोजन यांची माहिती सांगून प्रत्यक्षपणे -

- वनराई बंधारा बांधणे.

- सुट्ट्या दगडाचा बंधारा बांधणे.

3. समतळ चर तयार करणे ही कामे करून घेतली. तसेच


- समतळ चर आखणे.
- डोंगराचा चढ किंवा उतार मोजणे.
- नदीच्या पात्राचा उतार मोजणे.
- अंदाजे पाण्याचा प्रवाह मोजणे इत्यादी बाबी शिकवल्या तसेच विद्यार्थ्यांकडून 1000 लिटर क्षमतेची जमिनीवरची फेरोसिमेंटची टाकी बांधून घेतली.
- गोळप नदी रत्नागिरी येथील नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूस 1 कि.मी अंतरात अंदाजे 22 विहीरी व 3 कुंडे आहेत याचा अभ्यास करण्याचा प्रकल्प गर्व्हरमेंट पॉलिटेक्नीक रत्नागिरी यांच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतला. भविष्यात अशा प्रकारचा अभ्यास करण्याचा विचार आहे.

नैसर्गिक किंवा जैविक धाग्याचा वापर :


नारळाचा काथ्या, अंबाडीचे धागे, जुटचे धागे, केळीचे धागे ह्याचा उपयोग जमिनीखालील पाण्याच्या टाकया बांधण्यामध्ये केला आहे. यामुळे गिलाव्यास तडा जात नाहीत व पाणी रहाते असे लक्षात आले आहे त्या विषयी इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभ्यास करणे सुरू आहे. अशा प्रकारे नैसर्गिक धाग्याचा वापर करून कमी खर्चात जमिनी खालच्या पाण्याच्या टाक्या सोप्या पध्दतीने बांधता येतात. नारळाच्या काथ्याचा अभ्यास काही प्रमाणात गेल्या वर्षी पुणे इंजिनिअरिंग कॉलेज (COEP) येथे केला आहे व यावर्षी आय.आय.टी (IIT) पवई येथे होणार आहे.

दर्भाचा उपयोग पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी करणे :


पावसाळ्यामध्ये साठवलेले पाणी तसेच पुढील पावसाळ्यापर्यंत तसेच रहावे याकरता दर्भाच्या गवताचा वापर करता येऊ शकतो असे समजल्यावर गेल्यावर्षी आम्ही एका टाकीत दर्भ टाकले होते व असे लक्षात आले की, त्या टाकीमध्ये शेवाळे होत नाही. नंतर 3 महिन्यांनी पाणी तपासले असता असे लक्षात आले की य् निरघळलेल्या प्राणवायुचे प्रमाण (dissolved oxygen) हे ज्या टाकीत दर्भ टाकले नाही त्यापेक्षा जास्त आहे.य् इलेक्ट्रीक कंडक्टीव्हीटी कमी होते. या दोन्ही गोष्टी फायदेशीर आहेत.

या विषयीचा अभ्यास CERT तुर्भे व दापोली सायन्स कॉलेज येथे यावर्षी सुरू केला आहे.

श्री. उल्हास परांजपे, (मो : 09820788061)

Path Alias

/articles/jalavaradhainai-parataisathaana

Post By: Hindi
×