मराठवाडयाचे उदाहरण घेतले तर सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त पाऊस केवळ 15 ते 16 तासात पडून जातो. पूर्ण वर्षभरात पावसाचे दिवस असतात फक्त 50 ते 55 एवढया कमी कालावधीत पडणारे पावसाचे पाणी बाकीच्या 300 दिसांत वापरायचे असते. ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याचा आपण जेंव्हा विचार करु तेंव्हा निसर्गात मिळालेले पाणी गोळ करणे आणि ते सुरक्षितपणे साठवून ठेवणे हा एकमेव मार्ग आपल्यापुढे असेल. पावसाळयात उपलब्ध होणारे पाणी साठवून ते गरजेप्रमाणे वापरण्याची जलकुंडाची संकल्पना या लेखात मांडली आहे.
पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. पाणी नसेल तिथे जीवसृष्टी नसते. भारतीय संस्कृतीत पाण्याला जलदेवता कल्पिले आहे. पाण्याची समारंभपूर्वक मनोभावे पुजा केली जाते. पवित्र जल तीर्थ म्हणून प्राशन करण्याची प्रथा फार जुनी आहे.सर्वच ठिकाणी पाणी सहज उपलब्ध नसते. विहीरी, बारवा, तळी, नद्यांवर बंधारे बांधून जलसाठे निर्माण करण्याच्या प्रचलित पध्दती आहेत. विशिष्ट परिस्थितीत अचाट कल्पकता वापरुन आश्चर्यकारक रितीने पाण्याचा शोध लावण्याची अनेक उदाहरणे आहेत. शाफ्ट पध्दतीचे बोगदे, औरंगाबादची पाणचक्की, बीडची खजाना बावडी ही ऐतिहासीक आश्यर्च आहेत.
लोकसंख्या वाढली. लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला. शेती, उद्योगधंदे मनोरंजनासाठी पाण्याची गरज वाढली. गावांच्या नैसर्गिक पाणी स्त्रोतांवर शहरांचे आक्रमण वाढले. पाणी वापराचा समतोल बिघडला. ग्रामीण आणि शहरी भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले. कोटयावधी रु. खर्च करुन लांब अंतरावरुन आणलेले पाणी सुरळीत मिळेल याची खात्री राहीली नाही.
कित्येक खेडयांत दिवाळीला विहीरी कोरडया पडतात. राहिलेल्या सात आठ महिन्यांत कुठल्यातरी दुरच्या विहिरीवरुन पाणी आणणे गावातल्या अर्ध्या लोकसंख्येचा एकमेव कार्यक्रम असतो. तात्पुरती मलमपट्टी म्हणून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. जागतिक सरासरीपेक्षा दीडपट पाऊस पडणार्या या देशात शाश्वत पाणी पुरवठयाची सोय नाही ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी या लेखात विचार मांडला आहे. ही मांडणी अगदीच प्राथमिक स्वरुपाची असून तिच्यात सुधारणेला वाव आहे. प्रत्येक खेडयात नदी, नाला, तळे, विहीर असा पाण्याचा एखादा-दुसरा तरी स्त्रोत असतो. बहुदा हे स्त्रोत हंगामी असतात. पावसाळयात नद्या भरुन वाहतात. पावसाळा संपला की त्या नद्या कोरडया पडतात. तळी भरतात, पुढी बाष्पीभवन होऊन रिकामी होतात. भूजल पातळीत वाढ होते. पण उपसा नाही केला तर आंतरप्रवाहाव्दारे पाणी वाहून जाते. पाणी हातातले सुटून जाते ही आपली खरी समस्या आहे.
मराठवाडयाचे उदाहरण घेतले तर सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त पाऊस केवळ 15 ते 16 तासात पडून जातो. पूर्ण वर्षभरात पावसाचे दिवस असतात फक्त 50 ते 55 एवढया कमी कालावधीत पडणारे पावसाचे पाणी बाकीच्या 300 दिसांत वापरायचे असते. ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्याचा आपण जेंव्हा विचार करु तेंव्हा निसर्गात मिळालेले पाणी गोळ करणे आणि ते सुरक्षितपणे साठवून ठेवणे हा एकमेव मार्ग आपल्यापुढे असेल. पावसाळयात उपलब्ध होणारे पाणी साठवून ते गरजेप्रमाणे वापरण्याची जलकुंडाची संकल्पना या लेखात मांडली आहे.
रचना
समलंबाकृती छेदाचे (Trapezoidal) = हे जमिनीत खोदलेले कुंड असून त्याच्या सर्व बाजुंना सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण करुन पाण्याचा पाझर पुर्णपणे थांबवलेला असेल. कुंडाच्या वरच्या बाजूला एकावर एक दोन लोखंडी जाळयांवर अपारदर्शक प्लॅस्टिकच्या काळया फिल्मचे आवरण केले जाईल. या दोन फिल्मच्यामध्ये 60 सें.मी. अंतर असल्यामुळे खालच्या फिल्मपर्यंत सूर्याची उष्णता पोहचणार नाही, त्यामुळे कुंडातून बाष्पीभवनाने पाणी वाया जाणार नाही. थोडक्यात, बंद भूजलसारखे पाणी कुंडात सुरक्षित राहील.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने निर्धारित केलेल्या दरानुसार जलकुंडाचे अंदाजपत्रक सोबत दिले आहे.
गृहिते
30 वर्षानंतर गावाची लोकसंख्या | 1375 |
दरडोई दर दिवसाला लागणारे पाणी | 40 लिटर |
वर्षाचा पाणी वापर | 20075 घन मिटर |
पावसाळयाचे दिवस सोडून | |
240 दिवसांचा पाणी वापर | 13750 घन मिटर |
जलकुंडाची क्षमता
वरची बाजू | 60 मिटर |
तळाची बाजू | 50 मिटर |
खोली | 5 मिटर |
लांबी | 50 मिटर |
अंदाजीत खर्च
जलकुंड खोदकाम व बांधकाम | रु. 26,57775 |
काळया प्लॅस्टीकचे दुहेरी झाकण | रु. 9,78,387 |
जलकुंडाभोवती काटेरी तारेचे कुंपण | रु. 95,000 |
एकुण खर्च | रु. 37,31,162 |
सम्पर्क
श्री. बापू अडकिने, सुभाष विखे, दयानंद टेकाळे, मधुकर मोरे, परभणी
/articles/jalakaundaatauuna-saasavata-garaamaina-paanai-pauravathaa