जलदिंडी प्रतिष्ठान


जलदिंडीचा सुरवात उर्ध्व भीमा खार्‍यातील भीमा नदीपासून होवून विविध बंधार्‍यांतून ,छेाट्या धरणांमधून वाट काढत 450 किलोमीटरचा प्रवास या माध्यमातून पार पाडला जातो. ही दिंडी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मार्गस्थ होते आणि या द्वारे नदी काठावरील जनतेशी संपर्क साधण्याचे एक प्रभावी माध्यम ती उपलब्ध करुन देते. दरवर्षी या दिंडीत सहभागी होणा-या लोकांची संख्या भरपूर वेगाने वाढत चालली आहे. शास्त्रज्ञ, विद्यार्थी, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. नदीकाठावरील जनतेत आरोग्य आणि सांस्कृतिक विकास या संदर्भात होत असलेले बदल लाक्षात यावयास सुरुवात झाली आहे.

पुणे येथील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.विश्वास येवले यांनी पुढाकार घेवून महाराष्ट्रात जलदिंडी चळवळ सुरू केली. नदीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे ही प्रत्येक माणसाची नैतिक जबाबदारी आहे असे डॉक्टरसाहेब समजतात. एका बाजूने जल संसाधन मर्यादित आहे व दुस-या बाजूने या मर्यादित संसाधनाला प्रदूषित करण्याचा माणसाने सपाटा चालविला आहे या दुहेरी कात्रीत जलसाठे सापडले आहेत. प्रत्येक गावातील सांडपाणी नद्यात विसर्जन करणे हा आज स्थयीभाव झालेला आहे. त्यामुळे पाण्याची शुद्धता अणि पर्यावरणाचा दर्जा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणतात.

प्रत्येक माणसाने जल साक्षर व्हावे आणि सर्व जलसाठ्यांचे त्याने जतन, संरक्षण व गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे दृष्टीने प्रयत्न करावेत. पाण्याचे पावित्र्य व शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी त्याला अविरत झटणे गरजेचे झाले आहे. हे काम निश्तितच एकट्या दुकट्या माणसाचे नसून सर्व व्यक्‍ती व संस्था यांनी एकत्र येवून हे काम करावे. पण प्रत्यक्षात मात्र नेमकी याच्या उलट परिस्थिती असलेली दिसून येते. प्रत्येक शहर अविरतपणे अशुद्ध पाणी शुद्ध जलसाठ्यात विसर्जित करतांना दिसत आहे. सुखवस्तु समाज या ना त्या पद्धतीने पाणी शुद्ध करुन त्याचे सेवन करतो. पण या अशुद्ध व अस्वच्छ पाण्याची शिकार मात्र गरीब समाज बनलेला आढळतो. हे थांबविण्यासाठी डॉ. येवले यांनी जलदिंडी नामक चळवळ सुरु केली असून गेल्या 10 वर्षांपासून सुरु झालेली ही चळवळ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे. 10 वर्षांच्या कालखंडात प्रसिद्धि माध्यमांद्वारे अशी चळवळ सुरु झाली आहे ही वार्ता जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसावयास किती काळ लागेल हे बिचारा विठ्ठल कमरेवर हात ठेवून हताशपणे पाहात आहे.

जलदिंडीच्या कार्यात लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्व आहे. सामान्य माणसाने पर्यावरणाशी निगडित असलेले हे प्रश्‍न समजावून घ्यावेत, त्यावर स्वत:च उपाययोजना शोधून काढावी आणि भक्‍तीमार्गाच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाचे पाठ गिरवावेत ही येवलेसाहेबांची अपेक्षा आहे.

जलदिंडीचा सुरवात उर्ध्व भीमा खार्‍यातील भीमा नदीपासून होवून विविध बंधार्‍यांतून ,छेाट्या धरणांमधून वाट काढत 450 किलोमीटरचा प्रवास या माध्यमातून पार पाडला जातो. ही दिंडी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मार्गस्थ होते आणि या द्वारे नदी काठावरील जनतेशी संपर्क साधण्याचे एक प्रभावी माध्यम ती उपलब्ध करुन देते. दरवर्षी या दिंडीत सहभागी होणा-या लोकांची संख्या भरपूर वेगाने वाढत चालली आहे. शास्त्रज्ञ, विद्यार्थी, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. नदीकाठावरील जनतेत आरोग्य आणि सांस्कृतिक विकास या संदर्भात होत असलेले बदल लाक्षात यावयास सुरुवात झाली आहे. समाजात शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीकोनातून उचलले गेलेले हे एक महत्वाचे पाऊल समजावयास हवे.

हा आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत 450 किलोमीटरचा प्रवास 12 दिवसांत पूर्ण केला जातो. दिंडी मार्गक्रमण करीत असतांना वाटेत जी गावे लागतात त्याठिकाणी पर्यावरण व जलसाक्षरतेसंदर्भात प्रबोधन केले जाते. यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना केंद्रित केले जाते. यात भाग घेणा-यांना होड्या चालविण्याबद्दल प्रशिक्षणही दिले जाते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास हा पूर्ण कार्यक्रम धाडस व मौजमजा यांनी समृद्ध असतो. नदी व पर्यावरण यांचे माणसाशी घट्ट बंध निर्माण करण्याच्या दृष्टीने जलदिंडी फारच उपयुक्‍त ठरते. या दिंडीद्वारे नदीकाठचे पर्यावरण अभ्यासण्याची एक उत्कृष्ठ संधी सहभागी होणा-यांना मिळते. माणसाला ती निश्‍चितच विचार करावयास प्रवृत्त करते.

जलदिंडीची बलस्थाने


1) जवळपास 1000 किलोमीटरचा नदीतून प्रवास करावयाची संधी मिळते.
2) पर्यावरण व आरोग्यविषयक तज्ञांचा सहवास मिळतो.
3) माणसाला कार्यप्रवण करण्यासाठी प्रवृत्त करते.
4) आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळते.

जलदिंडीची ठळक उद्दिष्ट्ये


जलदिंडी सुरु करण्यापाठीमागे जी उद्दिष्ट्ये ठरविण्यात आली आहेत ती प्रमुख्याने खालीलप्रमाणे आढळतील :
1) आपण सर्व एक आहोत या भावनेला खतपाणी घालणे, यालाच आपण सोशल इजिनियरिंग असे नामाभिधान देतो.

2) पाण्याच्या गुणवत्तेचे महत्व जनमानसात बिंबवणे आणि तिचा मानवाच्या आरोग्यावर व पर्यावरणावर होणा-या परिणामांची जाणीव करुन देणे.

3) नद्यांचे संरक्षण करण्याचे दृष्टीने जल सेवक न जल मित्रांची एक मजबूत फळी तयार करणे

4) जलसाठे वाढविण्याचे दृष्टीने, त्यांचे जतन करण्याचे दृष्टीने व त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे दृष्टीने प्रोत्साहन देणे.

5) जलदिंडीच्या माध्यमातून जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार करणे

6) पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्‍त असे अभ्यासक्रम तयार करुन ते राबविणे.

जलदिंडी प्रकल्पांतर्गत समाविष्ट केल्या गेलेल्या विविध योजना
जलदिंडी हा शब्द जरी छोटा वाटत असला तरी या संकल्पनेची व्याप्ती बरीच मोठी आहे. यात विविध कार्यक्रम अंतर्भूत आहेत. प्रमुख कार्यक्रमांची यादी खालीलप्रमाणे देता येईल:

1) जलदिंडी : ही दिंडी दरवर्षी आळंदीहून निघून पंढरपूरला विसर्जित होते. या दिंडीमध्ये भाग घेणा-या सभासदांचा पर्यावरणाशी जवळून परिचय घडून येतो. या दिंडीमध्ये भाग घेणारे शारीरिक दृष्ट्या कणखर व मानसिक दृष्ट्या सामाजिक प्रश्‍नांशी परिचित होतात. या दिंडीत वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले जाते. दिंडीतील सभासद गावोगाव वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतघेत मार्गक्रमण करतात. मार्गातआरोग्याला चालना देणारी शिबिरे घेतली जातात. तसेच गावक-यांना खेळाच्या सामानाचे वाटपही करण्यात येते.

2) विविध नद्यांवर जल-मैत्री यात्रांचे आयोजन : यात विविध नद्यांच्या काठी जल मैत्री संमेलने आयोजित करण्यात येतात. आपल्या गावातून वाहणा-या नदीच्या काठावर दररोज वा आठवड्यातून एकदा नागरिकांच्या भेटी घडवून आणल्या जातात.याशिवाय गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नदीकाठी मेळावे आयोजित करण्यात येतात.असे उपक्रम मुठा,इंद्रायणी,पवना, प्रवरा, गोदावरी,गिरणा नद्यांच्या तीरांवर घेण्यात येत आहेत.

3) जलदिंडी संस्कार शिबीरे : या कार्यक्रमांतर्गत 7 ते 14 वर्ष वयातील मुलांची 15 दिवसांची शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबीरात विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, जलसाक्षरता या विषयातील तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. शिवाय या मुलांना खेळाचे साहित्यही वितरित करण्यात येते.

4) जलकुंभांद्वारे विविध जलसाठ्यातील पाण्याचे संकलन : ज्यावेळी जलदिंडीला सुरुवात होते त्यावेळी विविध खेड्यांतून, तलावांतून, नद्यांमधून, किल्ल्यांवरुन पाण्याचे कलश आणले जातात.

5) जल स्वास्थ्य यात्रा : भारतीय संस्कृती आजवर टिकून राहण्यात प्रवचने व कीर्तने याचा सहभाग फार महत्वाचा ठरला आहे. काही कीर्तन कारानी जलसाक्षरतेत कार्य करण्याची तयारी दाखविली आहे. ते आपल्या रसाळ वाणीने जल साक्षरतेचा, प्पर्यावरणाचा व आरोग्याचा संदेश गावोगाव पोहोचविण्यास मदत करतात.

6) जलस्वास्थ्य मंच : वरील कार्यापासून प्रेरणा घेवून महाविद्यालयीन विद्यार्थी हा स्वास्थ्य संदेश वर्षभर वेगवेगळ्या खेडेगावात पोहोचविण्याचे कार्य करतात.

7) पर्यावरणाचा प्रसार करणा-या सहलींचे आयोजन : एखादी गोष्ट शब्दांद्वारे समजावून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून जास्त परिणामकारक ठरते. त्यामुळे उत्साही माणसांच्या सहली वेगवेगळ्या ठिकाणी नेवून लोकांची निसर्गाशी जवळीक साधणे जास्त उपयुक्‍त ठरु शकते. त्यामुळे मानवाचे व निसर्गाचे बंध अधिक घट्ट विणले जातात.

आज प्रत्यक्षात आयोजित असलेल्या जलदिंड्या खालील प्रमाणे आहेत -
1. इंद्रायणी नदीवरील जलदिंडी
2. भीमा नदीवरील जलदिंडी
3. मुठआ नदीवरील जलदिंडी
4. पवना नदीवरील जलदिंडी
5. घोडकुकडी नदीवरील जलदिंडी
6. गोदावरी नदीवरील जलदिंडी

लवकरच खालील जलदिंड्या या चळवळीत समाविष्ट होत आहेत.

1. तापी नदीवरील चांगदेव ते श्रीप्रकाशा ही जलदिंडी
2. गोदावरी नदीवरील प्रवरा ते पैठण ही जलदिंडी
3. कृष्णा नदीवरील महाबळेश्वर ते संगम माऊली ही जलदिंडी

आपणा सर्वांना माहितच आहे की डॉ. विश्वास येवले हे एक उत्कृष्ट असे स्त्रीरोग तज्ञ आहेत. भारतीय संस्कृतीत स्त्रियांना मातृरुप देण्यात आले आहे. या मातृरुप स्त्रियांचे आरोग्य सध्या बिघडलेले आहे. त्यामुळे त्यांना स्वस्थ करण्यासाठी एका स्त्रीरोग तज्ञाचेीच गरज जास्त आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी डॉ. येवले प्रयत्न करीत आहेत हा निश्‍चितच योगायोग नव्हे.

Path Alias

/articles/jaladaindai-parataisathaana

Post By: Hindi
×