जलदिंडी - अध्यात्म - विज्ञान


जलदिंडी - अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणे यापूर्वी प्रत्येक गोष्टींची पार्श्वभूमी पाहणे आवश्यक आहे. जलदिंडी - अध्यात्म - विज्ञान या चारही गोष्टी माणसाच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी आहेत.

जल म्हणजेच पाणी आणि पाणी हेच जीवन आहे असे शास्त्र सुध्दा सांगते.

अध्यात्म - आधी आत्मिक विकास होणेही गरजेचे आहे.
विज्ञान - या सर्व गोष्टी विज्ञानाशी निगडीत आहेत.
दिंडी - यासाठी हे जलदिंडीचे प्रयोजन महत्वाचे.

म्हणजेच जीवनामध्ये ही चतु:सूत्री आवश्यक आहे. तसे पाहिले तर मुळातच चार या अंकालाच फार महत्व आहे. जसे की चार वेद, प्रमुख चार दिशा, चार आश्रम, चार प्रकारच्या मुक्ती, शंकाराचार्य स्थापित चार पीठं इत्यादी. त्याचप्रमाणे आधुनिक चतु:सूत्री म्हणजे जलदिंडी - अध्यात्म व विज्ञान.

जल - पाणी - जीवन - गंगा तसं पाहिले तर नावे वेगळी परंतु सर्वांचा अर्थ एकच. गंगास्तोत्र (शंकराचार्य - रचित) हे एक परिपूर्ण - अर्थपूर्ण आणि सहज बोध होणारे स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये गंगेचे - भौगोलिक - अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्वही भगवान शंकराचार्यांनी विषद केले आहे.

मनुष्य एकवेळ अन्न नसेल तर काही दिवस जीवन जगू शकतो पण पाणी नसले तर जीवन जगणे अशक्य.

पूर्वीच्या काळात निसर्गावर अवलंबून असणारी शेती होती. उद्योग - व्यवसाय फारसे रसायनयुक्त नव्हते त्यामुळे निखळ - निर्मळ आणि स्वच्छ खळ खळ वाहणाऱ्या नद्या होत्या. नदीमधील वाहत्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नव्हते. आणि अशा सर्व नदीतील पाण्याला 'तीर्थ' संबोधले जात होते. पण आता याऊलट परिस्थिती झाली आहे. ठिकठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारे पण त्या पाण्यामध्ये झालेले प्रदूषण मग एखाद्या कारखान्यामधील रसायन असो अथवा एखाद्या गावातील सांडपाणी / मैला असो, शहरातील विविध प्रकारचा कचरा असो, या सर्व प्रदूषणामुळे जल म्हणजेच पाणी प्रदूषित आणि विषारी होत आहे. आणि हेच पाणी सर्वांच्या आरोग्यास हानिकारक होत आहे.

अशा या पाण्याला सध्या लोक फक्त तीर्थ म्हणतात पण त्याचा वापर / उपयोग करण्याचे धाडस मात्र कोणी करत आहे की नाही हे कोणाला माहिती नाही. म्हणजेच अशा प्रदूषण युक्त पाण्याचा (विषारी) कोणीही उपयोग करत नाही आणि मग लोक शुध्द (दिसणाऱ्या) पाण्यासाठी कुपनलिका, विहीरी खोदतात आणि अशा भूगर्भातील पाण्यामुळे शरिरात क्षारांचे प्रमाण वाढून अनेक शारिरीक व्याधी निर्माण होतात. आणि मग आपल्याला पाणी शुध्द हवे असेल तर आपणच यामध्ये काही तरी बदल करणे आवश्यक आहे आणि हाच बदल करण्याचे अलौकिक, कष्टाचे, धाडसी आणि धोकादायक कार्य 'जलदिंडी' प्रतिष्ठानने हाती घेतले आहे. अध्यात्म - स्वास्थ्य - पर्यावरण यांची सांगड घालण्याचा हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे.

अवधूतांना यदूराजाला आपल्या 24 गुरूंपासून घेतलेल्या बोधाची गोष्ट सांगताना त्या चोवीस गुरूमध्ये 'पाणी' याचाही समावेश आहे (भागवत (एकनाथी) स्कंद 11 अध्याय 7 ते 9) पाण्यापासून त्यांनी पावित्र्य हा गुण घेतला.

मग हेच पावित्र्य जपावयाचे झाल्यास पाण्याचे शुध्दीकरण फार आवश्यक आहे.

आणि याच्यासाठी माऊलींच्या कृपाशिर्वादाने व डॉ. विश्वास येवले यांच्या प्रयत्नाने, प्रेरणेने, पराकष्ठेने हा पवित्र, पावित्र्य राखण्याचा उपक्रम गेली कित्येक वर्ष सातत्याने चालू आहे. आज रोजी कितीतरी नद्या प्रदूषित झाल्या आहेत आणि एक ठिकाणी कुठे तरी क्रांतीची मशाल पेटली की ती तेवत ठेवण्याचे कार्य चालू रहाते.

जलदिंडीच्या प्रयत्नातून हे कार्य चालू आहे आणि चालू राहील. आणि हा अभिनव असा स्तुत्य उपक्रम आहे. पाणी म्हणजेच नद्या शुध्द केल्या तर प्रत्येकाला मनुष्यप्राणीमात्राला शुध्द पाणी मिळेल आणि त्यामुळे सर्वांचे आरोग्य / स्वास्थ्य व्यवस्थित राहील. म्हणूनच जलदिंडीची आणि आरोग्याची यथोचित सांगड घालणे योग्य ठरले.

शरीर सुदृढ तर मन प्रसन्न आणि मन प्रसन्न तर बुध्दीची एकाग्रता आणि मग आत्मिक विकास हा ठरलेला आहे. आणि या वातावरणातील प्रत्येक घटकाचा संबंध विज्ञानाशी निश्चितच येतो. म्हणूनच मग आत्मिक विकास झाल्यानंतर निश्चित विज्ञानाचा सूक्ष्म अभ्यास होत असतो.

विज्ञान म्हणजेच जे 'विशेष - ज्ञान' याचे सर्व श्रेय मग आपोआपच जलदिंडी या उपक्रमास जाते आणि मग ज्याचे शास्त्र प्रगत त्याचे शस्त्र प्रगत हे गणित ठरलेले आहे म्हणूनच जलदिंडी सारखा अभूतपूर्व उपक्रम निश्चित वाखाणण्याजोगा आहे.

जलदिंडी - अध्यात्म - विज्ञान यांची सांगड निश्चितच होत आहे हे आपणास या सर्व गोष्टींवरून दिसून येत आहे.

प्रशांत महाराज भागवत, वाळकी - मो : 9890921340

Path Alias

/articles/jaladaindai-adhayaatama-vaijanaana

Post By: Hindi
×