जलदिंडी

म्हणून हे विचार आणि निश्चय मनात ठेवून आपण या दूषित झालेल्या नदीला पुन्हा सर्वजण मिळून एक स्वच्छ निर्मल गंगामाईचे स्वरूप देवू आणि भविष्यात पुढे सर्वांचे हित पाहणाऱ्या त्या थोर महात्म्याने पुढे कार्य सुरू केले. ते म्हणजे जलडिंदीच्या माध्यमातून.

आज वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नद्यांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील नद्यांना नदीचे स्वरूप राहिले नाही. म्हणून अशा नद्यांना नदी म्हणायचे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या शहरातून नदी पुढे मार्गस्थ होते त्या नदीला पुढे नदीचे स्वरूपच राहत नाही. कारण शहरातील सर्व निर्माल्य हे नदीत टाकले जाते किंवा सोडले जाते. मग त्यामध्ये प्लॅस्टिक असो किंवा इतर टाकाऊ वस्तू किंवा दूषित पाणी, पण त्याचा परिणाम पुढे ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. तो म्हणजे नदीकाठच्या गावांना होणाऱ्या या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढे उपस्थित झाला आहे. दूषित पाणी शेतीसाठी घातक ठरू शकले आहे, शेती नापिक होत चाललेली आहे. आणि याचे परिणाम असेच वाढत गेले तर आपल्याला जी नदीआजपर्यंत आपण तिला 'गंगामाई' म्हणत आलो आहे तिच आपल्याला नदी म्हणून पहावयास मिळणार नाही.

म्हणून हे विचार आणि निश्चय मनात ठेवून आपण या दूषित झालेल्या नदीला पुन्हा सर्वजण मिळून एक स्वच्छ निर्मल गंगामाईचे स्वरूप देवू आणि भविष्यात पुढे सर्वांचे हित पाहणाऱ्या त्या थोर महात्म्याने पुढे कार्य सुरू केले. ते म्हणजे जलडिंदीच्या माध्यमातून.

सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण व अध्यात्म यांची सांगड घालणारी म्हणजेच जलदिंडी होय. आपला दृढ निश्चय व संकल्पना मनात घेवून त्या थोर महात्म्याने 2002 साली आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरवली ते म्हणजे आळंदी ते पंढरपूर असा तब्बल 450 कि.मी प्रवास हा जलमार्गाने करायचा आणि विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी ते आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे चरणस्पर्श करून काही जलवारकरी घेवून जलदिंडी पंढरपूरच्या पावन भूमीकडे मार्गस्थ झाली. या एकूण 12 दिवसांच्या प्रवासात येणाऱ्या गावातील लोकांना सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण व अध्यात्म यांची जनजागृती करण्यास सुरूवात केली. ते म्हणजे कीर्तनामधून किंवा गावोगावी वैद्यकीय शिबिरे घेवून ते लोकांपर्यंत अतोनात प्रयत्न करून पोहचवण्यास मदत करू लागले.

आळंदीपासून जलमार्गे 118 कि.मी अंतरावर भीमा नदीच्या तीरावर वसलेले कौठा हे आमचे गाव. आणि 2002 पासून सुरू झालेल्या जलदिंडीचे स्वागत 2006 पर्यंत भीमा नदीच्या तीरावर बसून विठू - माऊलीच्या गजरात केले जात असे, पण त्या जलदिंडीमागचे खरे उद्दिष्ट्य त्यांच्या अंत:करणातील असणारी जी पर्यावरणाबद्दलची ओढ आणि पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास या गोष्टी रोखण्यासाठी त्यांची ती कार्ये आणि दूषित होणारे पाणी आणि अध्यात्म यासाठी गावोगावी होणारे त्यांचे उपक्रम पाहून आमच्या गावच्या वतीने त्यांना आमच्या कौठा या गावी मुक्कामी यावे असा आग्रह व विनंती करण्यात आली आणि आमच्या विनंतीला मान देवून 2007 साली विजयादशमीच्या चौथ्या दिवशी जलदिंडीचा पहिला मुक्काम आमच्या कौठा या गावी झाला आणि आमचे कौठा हे गाव जलदिंडीच्या आगमनाने विठू - माऊलीच्या गजराने आनंदमय होवून गेले. 2007 पासून आमच्या गावात पर्यावरण, स्वास्थ्य आणि अध्यात्म या विषयावर विविध उपक्रम राबवण्यास सुरूवात झाली. आज जलदिंडीला आमच्या गावात 8 वर्षे पूर्ण झालेत.

जलदिंडी आमच्या गावात आल्यापासून गावातील लोकांनी जलदिंडीचा खरा उद्देश लक्षात घेवून विविध उपक्रम राबवण्यात सुरूवात केली. त्यामध्ये स्वास्थ्य शिबीरे घेतली गेली. 2011 साली भारती विद्यापीठाच्या सौ. डॉ.जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दंतचिकित्सा शिबीर घेण्यात आले. त्यामुळे गावातील लोकांना त्याचा पुरेपूर लाभ घेता आला. तसेच गावातील माध्यमिक विद्यालयात आणि प्राथमिक शाळांमध्येही पर्यावरणाशी निगडीत आणि जलप्रदूषणामुळे होणाऱ्या समस्या या विषयावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. नंतर या स्पर्धेतील मुलांचे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्या मुलांना जलदिंडीचे असणारे प्रशस्तपत्रक आणि स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी जे योग साधनेचे योगार्थ असे पुस्तक आणि शालेय उपयोगी असणारे पुस्तके ज्यामध्ये पर्यावरणावर आधारित असे नदीला होणारे प्रदूषण असे विषय असणारी पुस्तके भेट म्हणून दिली जातात.

आमच्या गावात जलदिंडीच्या आगमनाच्या दिवशी सकाळपासून तयारी चालू असते. त्या दिवशी गावात प्रसन्नतेचे वातावरण असते. अखेर संध्याकाळी जलदिंडीचे आगमन होते आणि पूर्ण कौठे गाव माऊलींच्या नामस्मरणाने दंग होवून जाते. नंतर जलदिंडीचे उद्दिष्ट्य किंवा संकल्पना लोकांपर्यंत पोहचवण्यात यावी म्हणून गावात एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. तो म्हणजे जलदिंडीमधील जलदिंडी वारकऱ्यांना भोजनासाठी प्रत्येक घरातून 2 भाकरी आणि भाजी आणण्यास सांगितले. कारण यामुळे प्रत्येक घरातील व्यक्ती त्या ठिकाणी येतील आणि जलदिंडीचे पण हेच उद्दिष्ट्य आहे की घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जलदिंडीचे कार्य आणि उपक्रम पोहचले पाहिजे. जलदिंडीची थोडेफार तरी उद्दिष्ट्ये आमच्या गावातून साध्य होतील यासाठी आमचे गाव असे उपक्रम करत आहे.

तसेत सकारात्मक स्वास्थ्य टिकून राहावे म्हणून जलदिंडी गावोगावी खेळांच्या माध्यमातून विचार करते. ते म्हणजे व्हॉलीबॉलच्या खेळातून. हा एक असा खेळ आहे की ज्यामुळे मानवाच्या पूर्ण शरिराचा व्यायाम होतो आणि हेच ध्येय समोर ठेवून जलदिंडी गावागोवी या खेळाचे साहित्य भेट म्हणून देते. 2008 साली असेच साहित्य आमच्या गावाला पण भेट म्हणून मिळाले आणि गावातील मुलांनी त्याच दिवसापासून खेळण्यास सुरूवात केली. आजपर्यंत गावात रोज मुले आणि प्रौढ लोकसुध्दा व्हॉलीबॉल खेळताना दिसून येतात. ही जलदिंडीच्या उपक्रम किंवा उद्दिष्ट्ये आमच्या गावाने साध्य केली आणि करत आहे.

2012 साली जलदिंडीचे उद्दिष्ट्य किंवा उपक्रम जाणून घेण्यासाठी मुंबईतून टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार जॉहाना मॅडम व प्रशांत नाकवे हे कौण या आमच्या गावी आले आणि शहरातून वाहत आलेले दूषित पाणी हे पिण्यासाठी हानिकारक बनले असल्याने पाण्याची समस्या आमच्या गावामध्ये निर्माण झाली व सर्व जमिनी या दूषित पाण्यामुळे नापिक होवू लागल्या आहेत. अशा या समस्या लोकांपर्यंत पोहचवण्यात आणि लोकांमध्ये जनजागृती घडून आणावी यासाठी या सर्व समस्या व इतर काही उपक्रम टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रातून लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली. योगायोगाने वर्तमान पत्रात गावच्या या समस्या हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेते अमिरखान यांच्यापर्यंत पोहोचल्या कारण त्यानी स्त्रिभूणहत्या, हुंडाबळी आणि जलप्रदूषण या सत्य घटनांवर आधारित 'सत्यमेव जयते' हा उपक्रम चालू केला होता. आणि म्हणून हे जलप्रदूषण कसे आणि का होते हे पाहण्यासाठी त्यांनी त्यांचे एडिटर रेगोजी यांना आमच्या गावी शुटिंग घेण्यासाठी पाठविले. ते आल्यावर दोन दिवस आम्ही त्यांना योग्य ते प्रत्यक्षात दाखवून सहकार्य केले.

तसेच दुसऱ्या दिवशी जलदिंडी आमच्या गावातून पुढे मार्गस्थ होताना, सकाळी पूर्ण गावामधून जलदिंडी प्रदक्षिणा होते. या प्रदक्षिणेमध्ये गावातील सर्व माता - भगिनी यात एक अनोखा उपक्रम साकार करतात. तो म्हणजे जलदिंडी प्रदक्षिणेच्या वेळी स्वागतासाठी पूर्ण गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि प्रत्येकाच्या दरवाजासमोर भव्य अशी रांगोळी काढली जाते. प्रत्येक घरातील माता भगिनी जलदिंडीच्या स्वागतासाठी हळदी कुंकू घेवून उभ्या असतात. येणाऱ्या प्रत्येक जल वारकऱ्यांची आणि गावातील वारकऱ्यांची पण या रांगोळ्या पाहून मने प्रसन्न होवून जातात या रांगोळ्यांमुळे गावाला आणि जलदिंडीला वेगळी अशी शोभा येते.

गाव प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थ आणि जलदिंडीतील जलवारकरी हे गावचे कुलदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरात एकत्र येतात आणि जलदिंडीला पंढरपूरच्या पावन भूमीकडे मार्गस्थ होण्यासाठी निरोप देतात. असे अनेक आगळे वेगळे उपक्रम आमच्या गावात सुरू झाले ते केवळ जलदिंडीच्या संकल्पनेतूनच.

ही संकल्पना अंत:करणात सामावून सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण व आरोग्य टिकवून राहण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे म्हणजे जलदिंडीचे संस्थापक श्री. डॉ.विश्वासराव येवले सर होय. डॉ. विश्वासराव येवले जे आपल्यासाठी, आपल्या पुढील पिढीसाठी आपली नदी कशी स्वच्छ निर्मळ होईल आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कसा थांबवला जाईल यासाठी जीवाच्या आकांताने व अंत:करणापासून लोकांना मार्गदर्शन करीत आहेत. म्हणून मी आणि माझे कौठे या गावातील सर्व ग्रामस्थ, जलवारकरी त्यांना सहकार्य करत आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत.

Untitled
अशा या देवता समान महात्म्यास या महाविधायक कार्यकर्त्यास माझा आणि माझ्या गावाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम !!

Path Alias

/articles/jaladaindai

Post By: Hindi
×