झाखलेवाडी हे खेडे एका टेकडीवर वसलेले आहे. वर पाणी नसल्यामुळे गावकरी खाली उतरुन पाणी भरत होते. खाली असलेल्या पाण्याच्या साठ्यावर सबमर्सिबल पंप बसवून सोलर एनर्जीच्या सहाय्याने पाणी वर चढवून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचा लाभ 35 कुटुंबांना मिळणार आहे.
तहानलेल्या पाणी देणे म्हणजे एक प्रकारचे पुण्यच समजले जाते. रोटरी क्लब निगडीने जल संवर्धनाच्या विविध योजना राबवून जुन्नर तालुक्यात भरपूर जलसाठे निर्माण केले. प्रमुख कामांची यादी खालीलप्रमाणे देता येईल :1. हिवरे, तुर्फे व मिन्नार या खेड्यात पाण्याची टाकी बांधली. ही गावे डोंगराच्या माथ्यावर असल्यामुळे पाणी साठवण करणे कठीण होते. इथल्या स्थानिकांना डोंगरावरुन खाली उतरुन पाणी आणावे लागत होते. मार्च ते जून या कालखंडात या गावात पाणी मिळण्याची मारामार होती. पण सदर पाण्याची टाकी बांधल्यामुळे ग्रामस्थांची पाण्याची गरज भागली. इथे शिवकालीन पाण्याची टाकी होती. त्या टाकीचा आकार वाढविण्यासाठी दगड फोडून तो आकार वाढवावा लागला. आता त्या पाण्याच्या टाकीचा आकार 50 फूट बाय 50 फूट बाय 20 फूट असा 50,000 घनफूट एवढा मोठा झाला आहे. या टाकीपाशी पोहोचण्याचा रस्ता नव्हता. जेसीबीने खोदकाम करुन प्रथम तो तयार केला गेला व मगच टाकीचे काम हाती घेण्यात आले. या टाकीचा लाभ जवळपास 200 कुटुंबांना झाला.
2. पिचडवाडी, भोयरे, किवळे व कशाल या खेडेगावांसाठी लिफ्ट इरिगेशन योजना कार्यन्वित करण्यात आली. या गावांजवळ एक तलाव आहे. त्याचा लाभ घेवून इथले शेतकरी पावसाळ्यात वर्षातून जेमतेम एक पीक घेत होते. आमच्या क्लबने याठिकाणी एक शेततळे बांधले. जिल्हा परिषदेने या तळ्यात आंथरण्यासाठी आम्हाला प्लास्टिक उपलब्ध करुन दिले. तलावातून या शेततळ्यापर्यंत पाणी आणण्यासाठी एक सबमर्सिबल पंप बसविण्यात आला व तळ्यात जमा झालेले पाणी शेतकरी आपल्या सोयीनुसार आपल्या शेतात घेवून जातात. याचा लाभ 100 कुटुंबांना झाला. त्यामुळे जवळपास 200 एकर जमीन पाण्याखाली आली. आता येथील शेतकरी वर्षातून दोन ते तीन पिके घेतात.
3. निगडे येथील शेतकरी वर्षातून मोठ्या मुष्कीलीने एक पीक घेत होते. पोट भरण्यासाठी दुसरी कोणतीही आर्थिक हालचाल डोळ्यासमोर नव्हती. रोटरी क्लबने इथे 10 सबमर्सिबल पंप बसविले आणि पाणी उपलब्ध करुन दिले. याचा लाभ 90 शेतकर्यांना 350 एकर जमीन भिजवण्यासाठी झाला.
4. पिंपलोली, गुढांब्रे, निगडे व आडले या गावात पाणी उपलब्ध होते. पण जल वितरणाची व्यवस्था नव्हती. रोटरी क्लबने या ठिकाणी 15000 ते 20000 लिटर आकाराच्या टाक्या उभारल्या आणि या टाक्यात पाणी चढवून वितरण व्यवस्था उभारली. आता गावकर्यांना प्रत्येकाच्या घरात पाणी उपलब्ध झाले असून पाण्यासाठी वणवण हिंडण्याची आवश्यकता राहिली नाही. याचा लाभ जवळपास 600 कुटुंबांना झाला.
5. साबुर्डी गावात एक विहीर होती पण ती गाळाने भरली असल्यामुळे तिचा लाभ घेता येत नव्हता. रोटरी क्लबने या विहीरीतला गाळ उपसून ती स्वच्छ केली व गावकर्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले. याचा लाभ 100 कुटुंंबांना झाला.
6. झाखलेवाडी हे खेडे एका टेकडीवर वसलेले आहे. वर पाणी नसल्यामुळे गावकरी खाली उतरुन पाणी भरत होते. खाली असलेल्या पाण्याच्या साठ्यावर सबमर्सिबल पंप बसवून सोलर एनर्जीच्या सहाय्याने पाणी वर चढवून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचा लाभ 35 कुटुंबांना मिळणार आहे.
Path Alias
/articles/jaladaana-mahanajaeca-jaivanadaana
Post By: Hindi