गांधीभवन क्लबने चाखले कर्‍हेचे पाणी


शालेय मुलांमध्ये पाण्याच्या योग्य वापरासंबंधी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांना लघुपट दाखवून त्यांना पाण्याच्या योग्य वापराची शपथ देण्याचा उपक्रमदेखील गांधी भवन क्लबने काही शाळांत राबवला होता. चालू वर्षीदेखील डिस्ट्रिक्टच्या संयुक्त जलप्रकल्पात गांधी भवन क्लबचा सहभाग आहे.

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनने गेल्या तीन चार वर्षांत पाण्याच्या संदर्भात काही लहान मोठे प्रकल्प केले. त्यांतील सर्वात मोठा प्रकल्प सासवड गावात कर्हा नदीच्या पात्रात उभा राहिला आहे.

सासवडमध्ये कस्तुरबा गांधी स्मृती ट्रस्टचे काम गेली बरीच वर्षे चालू आहे. कर्‍हा नदीच्या काठी या संस्थेचे आवार आहे. पन्नासेक मुली संस्थेच्या अनाथाश्रमात राहतात. संस्थेकडे थोडी शेतजमीनपण आहे, आसपास इतर शेतकर्‍यांची शेते आहेत. साधारण फेब्रुवारी महिन्यापासून नदी वाहायला सुरुवात व्हायची. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेदेखील हाल व्हायचे. संस्थेतील मुलींसाठी दररोज टँकर मागवायला लागायचा. शेतजमिनी पडीक राहायच्या. कस्तुरबा ट्रस्टच्या शेवंता चव्हाण आणि स्थानिक तरुण कार्यकर्ता सागर जगताप यांनी पुढाकार घेऊन नदीवर दोन बंधारे बांधण्याचा प्रकल्प आखला. गांधीभवन क्लबला त्यांनी त्यासाठी सहकार्याची विचारणा केली. स्विसरी या परदेशी कंपनीचे आर्थिक सहकार्य मिळाल्याने गांधीभवन, कस्तुरबा ट्रस्ट आणि शेतकरी यांच्या सहकार्यातून सुमारे आठ लाख रुपयांत दोन बंधारे 2014 साली बांधून पूर्ण झाले.

त्यामुळे नदीत पाणी बराच काळ टिकून राहू लागले, व आसपासच्या मोठ्या परिसरात जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढले. आता संस्थादेखील वर्षभर पिके घेते, जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळू लागला आहे. मात्र आम्ही एवढ्यावर ना थांबता आता बंधार्‍याची उंची आणि खोली दोन्ही वाढवण्याचे काम हाती घेणार आहोत.

क्लबच्या दोन ग्लोबल ग्रांट प्रोजेक्टच्या अंतर्गतदेखील जलशुद्धीकरणासाठी काम करण्यात आले. जीवनज्योत या शाळेसाठी, तसेच भोरजवळील अस्तित्व फाऊंडेशन या संस्थेसाठी वॉटर फिल्टर आणि आवश्यक पंप, वॉटर हीटर या सुविधा पुरवण्यात आल्या.

पुण्याजवळ मारुंजी गावातील नवक्षितिज या स्वयंसेवी संस्थेच्या आवारातील दोन बोरवेलचे पुनर्भरण आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा तयार करणे ही कामेदेखील संस्थेच्या पाण्याच्या गरजांवर आणि अडचणींवर थोडीफार मात करायला उपयोगी पडली. नवक्षितिजमध्ये पन्नाससाठ मतिमंद व्यक्ती आणि त्यांचे काळजीवाहक राहतात. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून गांधीभवन क्लबने मोठा, औद्योगिक श्रेणीतला वॉटर फिल्टरदेखील संस्थेला दिला. अशीच शुद्ध पाण्याची निकड पनवेलजवळील शांतीवन या वृद्धाश्रमातदेखील जाणवत होती. तिथेदेखील गांधीभवन क्लबने वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिला.

शालेय मुलांमध्ये पाण्याच्या योग्य वापरासंबंधी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी त्यांना लघुपट दाखवून त्यांना पाण्याच्या योग्य वापराची शपथ देण्याचा उपक्रमदेखील गांधी भवन क्लबने काही शाळांत राबवला होता. चालू वर्षीदेखील डिस्ट्रिक्टच्या संयुक्त जलप्रकल्पात गांधी भवन क्लबचा सहभाग आहे.

Path Alias

/articles/gaandhaibhavana-kalabanae-caakhalae-karahaecae-paanai

Post By: Hindi
×