एवढेच नव्हे तर बाहेरील पाण्याचा वापर न केल्यामुळे व प्रक्रियेतून वाहून जाणार्या पाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे कारखान्यातील सांडपाण्याचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात कमी होते व नेहमीच्या सांडपाण्याचा वापर फक्त १५ ते २० टक्केच राहतो. त्यामुळे प्रदूषणाचा व पर्यावरण संतुलनाचा फार मोठा प्रश्न याद्वारे सोडवला जातो.
साधारणपणे २५०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या साखर कारखान्यास दररोज पाच लाख लिटर पाणी लागते व हे पाणी सर्व साखर कारखाने जवळपासच्या धरण, नदी, कालवा, विहीर इत्यादी नैसर्गिक स्त्रोतापासून घेतात.ऊसामध्ये ७० टक्के पाणी असते, १५ टक्के बगॅस (भुस्सा) व १५ टक्के साखर व इतर घटक असतात. ऊसापासून साखर तयार करताना ऊसाच्या रसामधील पाणी वाफेच्या सहाय्याने रस उकळून तो घट्ट केला जातो. रस उकळण्याची प्रक्रिया होत असताना रसातील पाण्याचे इव्हॅपोरेषन होवून त्याच्या व्हेपर्स बाहेर हवेत जातात. ही ऊसापासून साखर तयार करण्याची साधारण प्रक्रिया आहे.
सन २००४-०५ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे नॅचरल शूगरमध्ये ज्यावेळी साखर कारखान्यासाठी बाहेरील पाणी उपलब्ध होवू शकले नाही, त्यावेळी ऊसाचा रस उकळतांना बाहेर जाणार्या व्हेपर्स कंडेसर मध्ये कंडेन्स केल्या व त्याचे पाणी करून ते पाणी हौदामध्ये फवार्याद्वारे थंड करून तेच पाणी पुन्हा साखर प्रक्रियेसाठी वापरले व त्यामुळे बाहेरील पाण्याची आवश्यकताच भासली नाही. हा शोध गरजेतूनच लागला.
साधारणपणे २५०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असणार्या साखर कारखान्यास दररोज पाच लाख लिटर पाणी साखर प्रक्रियेसाठी लागते. २५०० मे.टन उसापासून ७० टक्के पाण्याच्या प्रमाणात १७,५०,००० लिटर एवढे पाणी असते. मात्र भुश्यामध्ये व इतरत्र वाया जाणारे २० टक्के पाणी कमी केले तरी ऊसाच्या वजनाच्या ५० टक्के पाणी वरील कंडेनशींग प्रक्रियेद्वारे उपलब्ध होते. त्यामुळे २५०० मे.टन ऊसामधून १२५० मे.टन म्हणजेच १२,५०,००० लीटर एवढे पाणी उपलब्ध होते. व २५०० मे.टन क्षमतेचा साखर कारखाना चालवण्यास साधारणपणे ५ लाख लिटर पाणी लागते. त्यामुळे दैनिक पाण्याच्या गरजेपेक्षा जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त पाणी ऊसापासून उपलब्ध होते. त्यामुळे बाहेरील पाण्याची मूळीच गरज भासत नाही.
एवढेच नव्हे तर बाहेरील पाण्याचा वापर न केल्यामुळे व प्रक्रियेतून वाहून जाणार्या पाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे कारखान्यातील सांडपाण्याचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात कमी होते व नेहमीच्या सांडपाण्याचा वापर फक्त १५ ते २० टक्केच राहतो. त्यामुळे प्रदूषणाचा व पर्यावरण संतुलनाचा फार मोठा प्रश्न याद्वारे सोडवला जातो.
ऊसातील पाण्याचा पुनर्वापर ही संकल्पना देशात प्रथमत: नॅचरल शूगरने २००४-२००५ च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये संशोधीत करून अवलंबिले व त्याच वर्षी मराठवाडयातील जवळपास २० साखर कारखान्यांना या संकल्पनेद्वारे स्वत:चे पाणी निर्माण करून दिले व त्यानंतर देशातील अनेक कारखान्यानी नॅचरल शूगरला भेट देवून ही संकल्पना राबविली. एवढेच नव्हेतर शासनाने सुध्दा याची विशेष नोंद घेवून नविन येणार्या साखर कारखान्यामध्ये नॅचरल शूगरच्या पाणी पुनर्रवापर संकल्पनेचा वापर सक्तीचा करून कोटयावधी रूपयाच्या पाणी पुरवठा योजना कमी केल्या. दुष्काळीच नव्हे तर सर्वच साखर कारखान्यांनी व प्रक्रियायुक्त इतर कारखान्यांनी अशा प्रक्रियेतील पाण्याचा पुनर्रवापर करून नैसर्गिक स्त्रोतातील पाण्याची बचत व अति पाणी वापरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी ही संकल्पना प्राधान्याने व सक्तीने राबवण्याची नितांत गरज आहे.
श्री. बी.बी ठोंबरे, अध्यक्ष, नॅचरल शुगर
Path Alias
/articles/dausakaalaavara-kaayamasavaraupai-maata-karanaarae-naencarala-jalasandhaarana-maodaela
Post By: Hindi