देशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी


पाण्याचे बाबतीत नेपाळ समृद्ध आहे याचा उल्लेख सुरवातीला आलेललाच आहे. बर्फाच्छादित हिम शिखरे, नद्या, झरे, सरोवरे, पाझर आणि भूजल या सर्व गोष्टींची रेलचेल असल्यामुळे नेपाळ हा जलसमृद्ध देश समजला जातो.या देशातील दरवर्षी निर्माण होणारा जलसाठा २३७ घन किमोमीटर एवढा आहे. यापैकी २२५ घन किलोमीटर हा भूपृष्ठावरील तर १२ घन किलोमीटर हा भूजलाच्या स्वरुपात उपलब्ध आहे.

नेपाळ हा देश सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला देश आहे. या देशाला समुद्रकिनारा नाही. या देशाची लोकसंख्या २.७ कोटी आहे. जगाच्या तुलनेत नेपाळ हे राष्ट्र गरीब राष्ट्र म्हणून ओळखले जाते. २०१५ साली या देशाला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. त्यामुळे तर या देशाची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झालेली दिसून येत आहे. पाण्यासाठी समृद्ध असलेल्या देशात पिण्याचे पाणी मिळण्यासाठी रांगा लागाव्या लागतात हे या देशाचे दुर्दैवच समजायला हवे. पाणीच पाणी चहुकडे पण प्यायला मात्र पाणी नाही अशी या देशाची अवस्था आहे. दूषित पाणी पिण्यामुळे या देशात बालमृत्यूचे प्रमाण खूपच जास्त आहे. देशात ६००० नद्यांचे जाळे असून सुद्धा पिण्याच्या पाण्याची इतकी दैन्यावस्था आहे हे वाचकाला खरेही वाटणार नाही. या ६००० नद्यांची एकूण लांबी मोजली तर ती २५००० किलोमीटर भरेल. या नद्यांपैकी १००० चे जवळपास नद्या या १० किलोमीटर पेक्षा लांब आहेत तर २४ नद्या या १०० किलोमीटर पेक्षा जास्त लांब असलेल्या आढळतात. देशातील २७ टक्के लोकांनाच शुद्ध पाण्यापर्यंत पोहोचता येते.

हा देश पर्वतराजींनी व्यापलेला देश आहे. या डोंगरांतून निघालेले पाण्याचे ओहोळ अथवा ओढे हे पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र वापरले जातात. डोंगरातून निघालेले झरे सोबत पाणी आणतांना स्वतःबरोबर मातीतील व खडकांतील अशुद्धताही बरोबर आणतात. ते पाणी पिण्यायोग्य असतेच असे नाही. ते पाणी सेवन केल्यामुळे रोगाला आमंत्रणच मिळते व त्याचा सर्वात विपरित परिणाम लहान मुलांवर होतो. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण जास्त आढळते.

दोन अडीचशे वर्षांपूर्वी टाकलेल्या संडपाण्याच्या लायनी आता जीर्ण झाल्या आहेत. त्यातून मिळणारे पाणीही शुद्ध मिळेल याची हमी नाही. एवढ्याशा देशात बाटल्यांद्वारे पाणी विकण्याच्या २५० पेक्षा जास्त संस्था आहेत. पण यापैकी बहुतांश या बेकायदेशीर आहेत व त्यांनी पुरविलेले पाणी शुद्ध पेयजल नस़ण्याची शक्यताच जास्त आहे. शिवाय अशा संस्थांमुळे भूजलाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे कारण त्या बेसुमार पाणी उपसा करतात.

पाण्याचे बाबतीत नेपाळ समृद्ध आहे याचा उल्लेख सुरवातीला आलेललाच आहे. बर्फाच्छादित हिम शिखरे, नद्या, झरे, सरोवरे, पाझर आणि भूजल या सर्व गोष्टींची रेलचेल असल्यामुळे नेपाळ हा जलसमृद्ध देश समजला जातो.या देशातील दरवर्षी निर्माण होणारा जलसाठा २३७ घन किमोमीटर एवढा आहे. यापैकी २२५ घन किलोमीटर हा भूपृष्ठावरील तर १२ घन किलोमीटर हा भूजलाच्या स्वरुपात उपलब्ध आहे. डोंगरावर जमा झालेले बर्फ, बर्फाची सरोवरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झालेला असतो. या देशात ३२५२ हिमशिखरे आणि २३२३ बर्फाची सरोवरे आहेत. जगातील हवामान बदलांचा परिणाम म्हणून हिमशिखरे जरा वितळून मागे सरकत चालली असली तरी त्यामुळे बर्फाच्या तलावांची संख्या मात्र वाढत चालली आहे.

तसे पाहू गेल्यास नेपाळ हा गंगा खोर्‍याचाच एक भाग समजायला हवा. गंगेला कोरड्या हवामानातील ७० टक्के जलपुरवठा व ४० टक्के वार्षिक पुरवठा हा नेपाळी नद्यांपासून होतो. जास्त उतार, त्यावरुन खळाळत उतरणारे पाणी, त्याचा भरपूर वेग या सर्व कारणांमुळे जलविद्युत निर्मितीला नेपाळमध्ये भरपूर संधी आहेत. त्या जर वापरण्यात आल्या तर त्यामुळे भविष्यात विकासालाही खूप संधी आहेत.

नेपाळमधील नद्या तीन प्रकारात मोडतात. पहिला प्रकार म्हणजे हिमपर्वतांतून उगम पावलेल्या नद्या. उदाहरणार्थः कोसी, गंडक, कर्णाली इ. दुसरा प्रकार म्हणजे इतर डोंगरांपासून उगम पावलेल्या नद्या. यांना मिळणारे पाणी हे मान्सून पासून व भूजलापासून मिळते. याचे उदाहरण म्हणजे बागमती, राप्ती, मिली, कंकाई, बबाई या नद्या. तिसरा प्रकार म्हणजे शिवालिक डोंगरापासून उगम पावलेल्या नद्या. उदाहरण म्हणजे बाणगंगा, तिळवे, सिरसिया, मानूसमरा, हार्दिनाथ, सेंसाई इ. मान्सूनचा पाऊस या नद्यांना पाणी देतो.

तलाव व सरोवरे यांचीही संख्या नेपाळमध्ये फारच मोठी आहे. यात तलाव, सरोवरे, छोट्या दलदलीचे प्रदेश यांचा समावेश होतो. यांची एकूण संख्या ५३५८ आहे. यापैकी २३२३ ही बर्फाची सरोवरे आहेत. रामसर साईट्स म्हणून मान्यता मिळालेल्या ९ दलदलींचे प्रदेशही यात समाविष्ट आहेत. यातील पाण्याचा वापर सिंचन, मासेमारी, करमणूक आणि इतर विविध कारणांसाठी करण्यात येतो. या परिसरात वनस्पती व प्राणी यांच्या विविध प्रजाती आढळतात. सस्तन प्राण्यांची संख्या ३२, भटक्या पक्षांची संख्या ४६१, कासवांची संख्या ९, माशांची संख्या २८ तर सापांची संख्या २० आहे.

नेपाळला भूजलाचेही मोठे वरदान आहे.१२ घन किलोमीटर एवढे पाणी दरवर्षी मिळते. नद्या वर्षभर वाहत्या ठेवण्यासाठी या भूजलाचा वापर होतो.

Path Alias

/articles/daesaodaesaicae-paanai-naepaalamadhaila-paanai

Post By: Hindi
×