चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान


2012 च्या भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याचे कधीही भरून येणार नाही, एवठे मोठे नुकसान झाले. देशभरात मराठवाड्याची ओळख असलेल्या मोसंबी व इतर फळबागा तीव्र पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना नाईजास्तव तोडाव्या लागल्या. सर्व क्षेत्राची तीव्र पाणीटंचाईमुळे मोठी हानी झाली. मंगलकार्य असो की दुख:द प्रसंग गावात पाण्याचे टँकर आल्यावर सर्व गाव टँकरकडे धावते हे सर्व उघड्या डोळ्याने पहात होते.

ग्रामविकास संस्थेच्या पुढाकाराने वसुंधरा प्रकल्पाच्या माध्यमातून चित्ते नदी पुनरूज्जीवनास चालना मिळालेली असून फेब्रुवारी 2015 च्या तीसऱ्या आठवड्यात एकोड (ता. औरंगाबाद) येथे मा. पंकजाबाई मुंडे (ग्रामविकास व जलसंधारण मंत्री) यांच्या उपस्थितीत चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानाचे औपचारिक उद्घाटन होणार असून या पंचक्रोशीतील लोक, लोकसहभागातून अभियान पूर्ण करून या भागाचा सर्वकष शाश्वत विकास करण्याचा संकल्प करणार आहेत.

2012 च्या भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याचे कधीही भरून येणार नाही, एवठे मोठे नुकसान झाले. देशभरात मराठवाड्याची ओळख असलेल्या मोसंबी व इतर फळबागा तीव्र पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना नाईजास्तव तोडाव्या लागल्या. सर्व क्षेत्राची तीव्र पाणीटंचाईमुळे मोठी हानी झाली. मंगलकार्य असो की दुख:द प्रसंग गावात पाण्याचे टँकर आल्यावर सर्व गाव टँकरकडे धावते हे सर्व उघड्या डोळ्याने पहात होते.

यापुढच्या काळात पाणी हे सर्व प्रश्नाचे मूळ राहणार आहे. सर्वकष शाश्वत विकासासाठी जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे, ग्रामीण जीवनातील अर्थकारण संपूर्णत: पाण्यावर अवलंबून आहे. हे सर्व कळत होते व आम्ही आमच्या परीने ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून पंधरा वर्षांपासून विविध प्रयोगही करत आहोत. तापलेल्या तव्यावर वाटीभर पाणी टाकल्यास वाफ होवून पाणी संपते तशी आमच्या प्रयोगाची गत होत होती. यावेळेस एका गावासाठी प्रकल्प न करता एका क्लस्टरचा पाणलोट क्षेत्राचा पूर्ण विकास करून सर्व गावांचा सर्वकश शाश्वत विकास घडवून आणायचा विचार होता.

वसुंधरा प्रकल्पाच्या माध्यमातून ही संधी चालून आली. वसुंधरा IWMP - 17 हा प्रकल्प औरंगाबाद शहराच्या दक्षिणेला 12 कि.मी अंतरावर आहे. याचे क्षेत्र 6427 हेक्टर असून, यात माथ्यावरील सिंदोन, भिंदोन ते पायथ्याकडील एकोड, पाचोड, चित्तेगाव अशा 12 गावांचा समावेश आहे. यात 19 लघू पाणलोटाचा समावेश असून, 15000 लोकसंख्येची उपजिवीका या भागातून वहाणाऱ्या 16.5 कि.मी चित्ते नदीवर अवलंबून आहे. जमिनीचा उतार तीव्र असून प्रकार मध्यम आहे. भूस्तरामध्ये काळा पाषाण, मांजऱ्या खडक, गेरू (रेड बोल) याचा समावेश आहे.

पाण्यामुळे तीसरे महायुध्द होईल की नाही माहित नाही परंतु, 2013 साली प्रकल्पातील गावात फिरत असतांना सार्वजनिक नळावरचे भांडण नित्याचेच झाले होते. भिंदोन तांडा येथील महिलांना 5 कि.मी अंतरावरून डोक्यावर तीन व कमरेवर एक असे चार भांडे घेवून रोजच पाणी आणावे लागत असे. 2013 साली या भागातील पशुधनाचे, जनतेचे पाण्यावीना फार हाल झाले. नाईजास्तव फळबागा तोडाव्या लागल्या. याच दरम्यान ग्रामविकास संस्थेने दुष्काळमुक्तीचा वसंुधरा क्ष्ज़्ग्घ् - 17 हा प्रकल्प येथील जनतेसमोर मांडला. गरज ही शोधाची जननी या म्हणीनुसार पार्श्वभूमीवर इथून पुढे चांगले होईल ते करायचे यासाठी लोकांनी पुढाकार घेतला, व प्रकल्पाला गती आली.

दृष्यपरिणाम :


प्रथम टप्प्यांत जनप्रबोधन, क्षमताबांधणी, प्रशिक्षण, स्वागतशील उपक्रमाअंतर्गत गावा गावात काँक्रीट रोड, सामाजिक सभागृह, सोलार लाईट, क्रिडा साहित्य इत्यादी उपक्रम राबवून अनुकूल जनमानस तयार करण्यात आले. तद्नंतर 2013 - 14 या वर्षात कंपार्टमेंट बंडींग 1200 हेक्टर, डिप.सी.सी.टी 68 हेक्टर, शेततळे 7, सिमेंट बंधारे 4, लोकसहभागातून व इतर विभागाच्या मदतीने अनेक कामे करण्यात आली. यामुळे आज सद्यस्थितीत भूजल पातळी वाढली असून यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ, कृषी उत्पादकतेत वाढ, दूध, भाजीपाला, फळबाग यात वाढ झालेली आहे. यावर्षी सिंदोनसह इतर गावाला टँकर लागणार नाही. महिला सक्षमीकरणासाठी 162 महिला बचत गट कार्यरत असून पर्यावरण संवर्धनासाठी भजनी मंडळ, युवक मंडळ व 300 जलमित्र स्वेच्छेने कार्यरत आहेत.

यापुढे :


जलव्यवस्थापनाद्वारे एखाद्या गावाने दुष्काळावर मात केल्याचे आपल्या ऐकण्यात व पहाण्यात आहे. परंतु एखाद्या नदीचे पुनरूज्जीवन करून नदी पाणलोट क्षेत्रातील सर्व गावांचा शाश्वत विकास झाला आहे असे नाही. ग्रामविकास संस्थेने देशातील पथदर्शी अभिनव 'चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान' राबवून पाणलोट क्षेत्रातील सर्व गावांचा शाश्वत विकास करण्याचे ठरविले आहे.

चित्ते नदी पुनरूज्जीवन म्हणजे काय ?


'चित्ते नदी पाणलोट क्षेत्रात माथा ते पायथा या क्रमाने मृद व जलसंधारणाचे विविध उपचाराद्वारे सर्व जलस्त्रोत समृध्द करून पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर करून, पर्यावरणपुरक साधनांद्वारे पशुधन व मनुष्यांचे जीवनमान उंचावणे म्हणजे चित्ते नदी पुनरूज्जीवन होय.'

आवश्यकता :


भूपृष्ठावरील पाण्याचे साठे कमी पडत आहेत.
पावसाचे पडणारे पाणी वाहून जाते.
वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्याकरीता.
पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी.
भावी पिढीसाठी जलसंचय.
नैसर्गिक संसाधन साक्षरता.
पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर.
औरंगाबाद शहराची - भाजीपाला, दूध, फळे, अन्नधान्य गरजपूर्ती.

प्राणी, पशु, पक्षी, जलचरांसाठी.
बारा गावे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

1. चित्ते नदी रूंदीकरण व खोलीकरण
2. साखळी पध्दतीने सिमेंट बंधारे
3. डोंगराच्या पायथ्याला डिप.सी.सी.टी व एरिया उपचार
4. पाझर तलावातील गाळ काढणे
5. पडीक जमिनीवर व नदीकाठी वृक्षारोपण
6. शेततळे
7. रिचार्ज शॉफ्ट (भूजलसंवर्धनाचे आधुनीक तंत्रज्ञान)
8. जुने कोल्हापुरी बंधारे दुरूस्ती
9. पाण्याच्या कार्यक्षम व उत्पादक वापर
10. सर्वकष शाश्त ग्रामविकास

चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान फायदे :


1. पूर व धूप नियंत्रण
2. भूजल व सिंचन क्षेत्रात वाढ
3. दूध, भाजीपाला, फळे अन्नधान्य औरंगाबाद शहरासाठी उपलब्ध
4. महिला सक्षमीकरण
5. शाश्वत ग्रामविकास

प्रथम ग्रामसभा, प्रशिक्षण, माहितीपत्रक, किर्तन, विविध स्पर्धा यांच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्यात येणार असून त्यानंतर लोकसहभागातून संबंधित सर्व कामे जागतिक बँक, ग्रामविकासाशी संबंधित सर्व विभाग, लोकप्रतिनिधी, कॉर्पोरेट क्षेत्र, विविध संस्था , संघटना, स्थानिक महिला बचत गट, युवक मंडळ, जलमित्र, स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहेत.

मृद व जलसंधारण कामाबरोबरच शाश्वत ग्रामविकासाकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे, यामध्ये मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, कृषीपूरक उद्योग, संपूर्ण स्वच्छता या बाबींचा समावेश आहे.

आम्ही आमच्या परीने हे काम करीत आहोतच, परंतु दुष्काळ निवारणाची ही मोहीम दुष्काळाची जाण असलेल्या प्रत्येकाची स्वत:ची आहे. एखादी नदीच सर्वार्थाने पुनरूज्जीवीत करण्याचा ग्रामविकास संस्थेचा हा महाराष्ट्रातील पथदर्शी व अभिनव प्रयोग आहे. ही नदी पुनरूज्जीवीत झाल्यामुळे पंधरा हजार ग्रामस्थांच्या घरात जलसमृध्दी येणार आहे. या राष्ट्रीय व पवित्र कार्यात आपणही सहभाग घ्या व आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सामाजिक दृष्ट्या जबाबदार, लोकाभिमुख, लोकमान्य अशी लोकचळवळ उभी करण्यास सहकार्य करा.

'चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान' हा महाराष्ट्रातील पथदर्शी अभिनव प्रकल्प असून, यात नदी परिसरातील तांडा, वाडी सह 25 गावांचा, 19 लघू पाणलोटाचा व 6427 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. चित्ते नदी पुनरूज्जीवनामुळे पंधरा हजार ग्रामस्थांच्या घरात जलसमृध्दी येणार आहे. याचबरोबर आशिया खंडात वेगाने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहरासाठी दूध, भाजीपाला, फळे, अन्नधान्याची गरजपूर्ती होण्यास मदत होणार आहे. चित्ते नदी औरंगाबाद शहरापासून जवळ असल्यामुळे कृषी - ग्रामीण पर्यटनास चालना मिळणार असून, शहर व ग्राम पुरस्कारपुरक व्यवस्था यातून निर्माण होणार आहे.

श्री. नरहरी शिवपुरे, औरंगाबाद - मो : 09822431778

Path Alias

/articles/caitatae-nadai-paunarauujajaivana-abhaiyaana

Post By: Hindi
×