भारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी


कावेरी नदी सुद्धा दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. तामीळ साहित्यात या नदीला महत्वाचे स्थान आहे. जुन्या राजवटींना व नवीन शहरांना याच नदीने सुरळीत वसण्यासाठी पाणी दिले आहे. बर्फाळ प्रदेशात उगम नसूनसुद्धा ही नदी बाराही महिने वाहते. डोंगरांमध्ये मुरलेले पाणी पाझरांच्या स्वरुपात सतत मिळत राहिल्यामुळे तिथून बाराही महिने पाणी पुरवठा होत राहतो. या नदी पात्रात तीन बेटे आहेत त्यापैकी दोन कर्नाटकांत (शिवनासमुद्र आणि श्रीरंगपट्टनम) व एक तामिनाडूमध्ये (श्रीरंगम) आहे.

कावेरी नदीया नदीचा उगम कर्नाटकात तळकावेरी परिसरात झाला आहे. तामिळनाडूतील पूमपहार येथे ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीचा लांबी ८०० किलोमीटर आहे. या नदीचे खोरे कर्नाटक ( ३४२७३ चौरस किलोमीटर), तामिलनाडू (४३८५६ चौरस किलोमीटर), केरळ (२८६६ चौरस किलोमीटर) आणि पुडूचेरी ( १६० चौरस किलोमीटर) असे पसरलेले आहे. याच कारणामुळे निवाड्याप्रमाणे ५४ टक्के पाणी तामिळनाडूला, ४२ टक्के पाणी कर्नाटकाला न ४ टक्के पाणी केरळला मिळावे अशी तरतूद कऱण्यात आली आहे. या नदीला हरंगी, हेमवती, कबिनी, भवानी, अर्कवती, लक्ष्मणतीर्थ, नोयल, अमरावती या उपनद्या येवून मिळतात.

या नदीवर कृष्णराजसागर, मेत्तूर, गोरुर, हरंगी, काबिनी, अमरावती बेनासुरा सागर या ठिकाणी धरणे बांधण्यात आली आहेत. भारतातील शिवसमुद्र नावाचा प्रसिद्ध धबधबा याच नदीवर आहे. देशातील पहिले जल विद्युत केंद्र याच नदीवर १९०२ साली उभारण्यात आले. या वीज केंद्रातून बंगलोर शहराला वीज पुरवठा होतो. या नदीवर कुशलनगर, मैसूर, श्रीरंगपट्टनम, इरोड, करुर, तिरुचिरापल्ली, तिरुवायूर, कुंभकोनम, मलियादुतुराई, पूमपहार आणि वेल्लूर हा शहरे वसली आहेत.

ही नदी सतत वादात राहिली आहे. थेट एकोणविसाव्या शतकापासून हे वाद चालू आहेत. दोनही पक्षात अजूनही म्हणावे तसे समाधान झालेले नाही. सुप्रीम कोर्टाने नदीच्या पाणी वाटपासाठी दोन वेगवेगळ्या परिस्थिती गृहित धरल्या आहेत. साधारण पाऊस झाला तर वाटप वेगळे व असाधारण पाऊस झाला तर वाटप वेगळे अशा त्या दोन परिस्थिती आहेत.

Path Alias

/articles/bhaarataataila-parasaidadha-nadayaa-kaavaerai-nadai

Post By: Hindi
×