कचरा व्यवस्थापनातून खत, गॅस व वीज निर्मिती

सौ. निर्मला कांदळगवाकर, पुणे

 

शहरातील तयार होणान्या कचन्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे। कुजणारा व न कुजणारा कचरा असे कचन्याने दोन प्रकार आहेत। न कुजणान्या कचन्यावर योग्य ती प्रक्रिया करून तो पूनर्वापरात येवू शकतो। तसेच कुजणान्या कचन्यावर प्रक्रिया करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करणे शक्य आहे। कुजणारा कचरा जर तसाच फेकून दिला तर त्यापासून पर्यावरणाला अपायकारक असे विषारी घटक असणारे हरित वायू (Green house gases) आहेत तो त्याचाच परिणाम आहे। म्हणून कुजणान्या कचन्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यापासून तयार होणारे व पर्यावरणाला अपायकारक असणारे हरित वायु एकत्र करून त्याचा उपयुक्त वापर आपल्या दैनंदिन जीवनात करून घेणे आवश्यक आहे।

 

विवम अॅग्रोटेक या कंपनीने ओल्या कचन्यावर प्रक्रिया करण्यासाठी घरगुती व मोठ्या क्षमतेची स्वरूप गांडूळखत व बायोगॅस निर्मिती संयंत्रे विकसित केली आहेत। गांडूळखत संयंत्रे व बायोगॅस संयंत्रे घरोघरी बसवून चालू करून देणे व वापरण्याचे प्रशिक्षण देण्याची सोय कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे। नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्रातून निर्माण होणान्या ओल्या कचन्यावर प्रक्रिया कंपोस्ट, गांडूळ खत व बायोगँसचे मोठे प्रकल्प विविम अॅग्रोटेक उभारून देते।

 

विवम अॅग्रोटेक, विवम हा एक संस्कृत शब्द वर्धिष्णु या अर्थाचा, की जे वाढतच जाईल। विवम अॅग्रोटेकच्या सौ. निर्मला गिरीश कांदळगावकर यांचे लौकिक दृष्ट्या शिक्षण B.Sc, PGD in Environment Science पर्यंत झाले आहे। पण समाजकार्याची आवड असल्याने राष्ट्रसेविका समितीचे काम करताना ग्रामीण भागात महिलांना काम करतांना काहीतरी जोड धंधाची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्या एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे सध्या शेतकन्यांच्या झालेल्या वाईट परिस्थितीचे कारण शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यात त्यांच्या असे लक्षात आले की, शेतकरी बी बियाणे, रासायनिक खते या सर्वच गोष्टी विकत घेतो आणि रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरतो। त्या रासायनिक खतांमुळे जमीन खराब होत आहे, व खराब जमिनीमुळे उत्पादन कमी होते। उत्पादन कमी झाले व शेतकरी श्रीमंताचे दरिद्री झाले। त्या शेतकन्यांना परत श्रीमंत करण्यासाठी व खराब झालेली जमीन सुपिक करण्यासाठी गांडूळखत वापरणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले। एवढ्या मोठया प्रमाणावर खत तयार करण्यासाठी पारम्परिक पध्दती अपुन्या पडतात। त्या पध्दतीत अनेक तोटे असल्यामुळे व शेतकन्यांना नीट मार्गदर्शन व मिळाल्यामुळे, पारम्परिक पध्ततीतून गांडूळखत तयार होत नाही किंवा मोठया प्रमाणावर तयार होत नाही, असे त्यांच्या लक्षात आले। पारम्परिक पध्दतीतील तोटे दूर करून त्यांनी ‘स्वरूप’ गांडूळखत निर्मिती संयंत्रांची निर्मिती केली।

 

ही पध्दती अगदी सोपी आहे। यात कमी श्रमात व कोणत्याही कचन्यापासून खत तयार करता येते, त्यामुळे शेतकन्यांना जणू जीवनदानच मिळाले आहे। ते आपल्या शेतीतील कचरा व असलेले शेण वापरून गांडूळखत आपल्या शेतातच तयार करू शकतात। खत उत्तम प्रकारचे व शुध्द असल्यामुळे पीकही चांगले येते व जमिनीचा पोत सुधारतो। आता काही गावात महिलांनी बचतगट स्थापन करून गांडूळखत तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे। त्यासाठी त्यांना जास्त काही वेळ ध्यावा लागत नाही, व जास्त श्रमही पडत नाहीत। त्यामुळे त्यांना उत्पत्राचे एक साधन सुरू झाले आहे। शेतकन्यांचा व ग्रामीण भागातील महिलांचा प्रश्न अशा प्रकारे सोडविण्यात सौ. निर्मला गिरीश कांदळगावकरांना यश आले आहे।

 

एवढे करूनही त्या थांबल्या नाहीत। शहरामधून निर्माण होणारा कचरा, त्याच्या विल्हेवाटीसाठीची अशास्त्रीय पध्दत, त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान व पर्यायाने माणसावर होणारे दुष्परिणाम या सर्वांवर गांडूळखत व बायोगॅस हा योग्य व शास्त्रीय उपाय होवू शकतो हे त्यांच्या लक्षात आले। शहरातील कचन्याची विल्हेवाट लावायची असेल तर त्या कचन्याचेही गांडूळखतात रूपांतरण करणे शक्य आहे। जेथे कचरा निर्माण होतो तेथेच त्याचे गांडूळखतात रूपांतर केले तर खर्चतर कमी होतोच, कचरा रस्त्यावर जाणारच नाही आणि परिसरही स्वच्छ राहील। घरात तयार होणारा कचरा जर वेगळा केला तर त्यातील कुजणान्या कचन्यापासून गांडूळखत तयार होवू शकते व न कुजणान्या प्लास्टिक सारखा कचरा पुनर्वापरात येवू शकतो। ही काळाजी गरज ओळखून त्यांनी नंतर घरातील कचन्यासाठी गांडूळखत तयार करणारे छोटे मॉडेल तयार केले। आता मोठा प्रश्न होता तो घरातील कचन्यात उरलेले अत्र टाकले तर त्यात वास येणार व फ्लॅटमध्ये राहणान्या या संयंत्राचा उपयोग करू शकणार नाही। म्हणून काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू तयार करून घेतले। ते पाण्यात मिसळून कचन्यावर टाकले की 10 ते 15 मिनिटात वास जातो, घरगुती संयंत्रासोबत हे जीवाणू सुध्दा मिसळतात, त्यामुळे हे संयंत्र स्वयंपाक घरात किंवा बाहेरच्या खोलीत ठेवले तरी त्यात कचरा असल्याचे लक्षात येत नाही।

 

गांडूळखत कसे उत्पादन करावे व त्या करिता लागणान्या सर्वयंत्राचा व गांडूळांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला। त्यांनी बनविलेल्या ‘स्वरूप’ गांडूळखत संयंत्राच्या सहाय्याने एका महिन्यात 1 ते 1.5 टन गांडूळखत बनविता येते। अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने ही संयंत्रे बनविलेली असून वापरण्यास अत्यंत सोपी आहेत। या व्यवसायाला उणीपूरी 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, उत्तरांचल, गुजरात, गोवा आणि दिल्ली या ठिकाणी हा व्यवसाय विस्तारला आहे। एका महिलेने अल्पावधीत आपला व्यवसाय एवढया मोठया क्षेत्रात वाढविल्याचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल। एकटया औरंगाबाद शहरातून हजारो कुटुबातून घरगुती कचन्याची विल्हेवाट गांडूळखताद्वारे लावण्यात येत आहे। हा आदर्श शहरातील प्रत्येकाने घेतल्यास शहरातील कचरा व्यवस्थापन, पर्यावरणवसंरक्षण आदी प्रश्न सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे हे या प्रकल्पाचे (उद्योगाचे) एक मोठे वैशिष्टय आहे।

 

शेतकन्यासाठी ही ‘स्वरूप’ संयंत्रे वरदानच सिध्द होत आहेत। शेतीसाठी मोठया प्रमाणावर लागणारे खत शेतकरी आपल्या शेतातील वाया जाणान्या कचन्यापासून बनवत असून, पूर्वी हा कचरा जाळण्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान होणे टळू शकते। तसेच रासायनिक खतामुळे होणारे जमिनीचे नुकसान या गांडूळखतामुळे थांबणार आहे। पाण्याचा वापरही कमी होण्यास गांडूळखताचा उपयोग होणार आहे। कमी किंमतीत मोठया प्रमाणावर खत उपलब्ध होवू शकत असल्यामुळे अत्रधान्याचे उत्पादन वाढीस मदत होणार आहे। विषमुक्त अत्रधान्य, फळे व भाजीपाला आपणा सर्वांना मिळू शकणार आहे। शाश्वत सेंद्रीय शेतीचा गांडूळखत हा मुख्य आधार आहे। ग्रामीण भागातील तरूणांना, महिलांना त्यांच्याच गावात मोठा उद्योग या प्रकल्पामुळे निर्माण झाला आहे व त्याचा लाभ मिळण्यासही सुरूवात झाली आहे।

 

‘स्वरूप’ गांडूळखत निर्मिती संयंत्रः

 

हे संयंत्र अॅल्युमिनियम, गॅल्व्हनाईज्ड जाळी व लोखंडापासून बनविलेले आहे। घडी पध्दतीचे असल्यामुळे कोठेही नेेण्यास सोयीचे आहे। या स्वरूप गांडूळखत निर्मिती संयंत्रामध्ये कचरा कुजताना निर्माण होणान्या उष्णतेमुळे गांडूळे मरत नाहीत। पावसाचे पाणी साचून गांडूळे मरत नाहीत। गांडूळे पळून जात नाहीत किंवा उंदीर, साप, पाल, बेडूक या सारख्या प्राण्यांपासून गांडूळांचे रक्षण होते। खत तयार होतांना वास येत नाही। गांडूळ पाणी गोळा करता येते। महत्वाचे म्हणजे हे संयंत्र गच्चीवर अथवा घरात कोठेही ठेवता येवू शकते।

 

बायोगॅस निर्मिती संयंत्रः

 

कचन्याचे अनएरोबीक पध्दतीने विघटन करून शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावणे हा एक सुलभ मार्ग आहे। बायोगॅस म्हणजे कचन्याचे अनएरोबिक पद्दतीने विघटन करून मिथेन गॅस तयार करणे होय। पर्यावरणाला सर्वात जास्त अपायकारक असा हरितवायू हा मिथेन आहे। बायोगॅस मध्ये मिथेन वायू एकत्र करून साठविल्यास, त्याचा उपयोग स्वयंपाकासाठी, वीजर्मितीसाठी तसेच वहानांमध्ये इंधन म्हणून करता येवू शकतो। जास्तीत जास्त कचन्याचे कमीत कमी जागेत शास्त्रशुध्द पध्दतीने विघटन करण्याची बायोगॅस ही वापरण्यास अत्यंत सोपी प्रक्रिया आहे। त्यामुळे सर्वप्रकारच्या कुजणान्या कचन्यावर बायोगॅस द्वारे प्रक्रिया करून ऊर्जानिर्मिती करता येवू शकते।

 

बायोगॅस तंत्रज्ञान खूप जुने आहे पण त्या तंत्रज्ञानाच अद्यापही आधुनिक जगाने पूर्ण उपयोग करून घेतला नाही। सध्याच्या पध्दतीत कमी उष्मांकांचे (कॅलरीचे) पदार्थ वापरून बायोगॅस बनवला जातो। या पदार्थापासून कमी प्रमाणात मिथेनची निर्मिती होते व बायोगॅसची उत्पादन क्षमता कमी होते। पण उच्च उष्मांक असलेले व पोषण क्षमता जास्त असलेले पादार्थ जर वापरले तर मोठया प्रमाणावर बायोगॅस मिळू शकतो। हा बायोगॅस वापरण्यास अत्यंत सोपा आहे। HDPE  मटेरिलचे हे संयंत्र बनविलेले आहे। त्यामुळे कोठेही हलविता येवू शकते व गच्चीवर सुध्दा ठेवता येवू शकते।

 

सध्या आपण स्वयंपाकासाठी वापरात असलेला गँस भूगर्भातून मिळतो। हा गॅस भूगर्भात सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही, त्यामुळे तो उपलब्ध साठयातून त्याची वाहतूक करून आपल्यापर्यंत पोहचवला जातो। या सर्वप्रक्रियेमुळे त्याची किमंतही वाढते। तसेच सध्याच्या वाढत्या मागणीमुळे काही वर्षातच तो साठा संपून जाईल। परन्तु, कचरा हा नेहमीच निर्माण होत असल्याने त्यापासून बायोगॅस निर्मिती ही अखण्ड चालू राहील। इथे कचरा निर्माण होणार आहे व त्याचा वापर होणार अशा ठिकाणी बायोगॅस उभारल्यास वाहतुकीवर होणारा खर्च टाळता येवू शकतो आणि आपल्याला तो स्वस्तात व मुबलक प्रमाणात मिळू शकतो। त्यामुळे, गृहिणींना बायोगॅस हा ‘वरदानच’ ठरू शकेल।

 

विवम अॅग्रोटेकने विकसित केलेले हे उपकरण सर्व प्रकारच्या कचन्याने खतात व बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे।

 

कचरा मग तो कोणताही असो सर्वांसाठा एक त्रायदायक प्रकार आहे। पण अॅग्रोटेकने तो अत्यंत सोप्या पध्दतीने सोडविला आहे।

 

घरातील कचन्याचे घरातच वर्गीकरण करायचे व तो घरातच वापरायचा असा हा उपक्रम आहे। साधारणतः घरात 3 ठिकाणी कचरा गोळा होतो।

1. स्वयंपाक घरातील ओटा।

2. भांडी घासण्याची जागा।

3. बेसीनच्या खालच्या जागेत। विस्ताराने जागा शोधण्याची गरज एवढयाच साठी की अनेक नागरिकांना हा ओला व सुका कचरा समजत नाही व येथेच गोंधळायला होते।

 

1. स्वयंपाक घरातील ओटा।

 

मुख्यतः हे काम गृहिणीचे आहे। भाजी, फळे, निर्माल्य, नारळाच्या शेंडया, कांद्याची टरफेले (स्वयंपाकघरात लागणान्या वस्तूंची निवड केल्यानंतर उरलेले भाग) कचरा तसेच देवघरातील निर्माल्य, कागदाचे तुकडे हे गांडूळखतासाठी वापरता येते। या कचन्यापासून उत्तम प्रतीचे गांडूळखत तयार होते।

 

2. भांडी घासण्याची जागा।

 

भांडी घासावयाच्या ठिकाणी ठेवलेल्या बादलीत भांडी घासताना, जेवणाच्या ताटात उरलेले, पातेल्यातले शिजवून उरलेले पदार्थ, चहाच्या पातेल्यातला चोथा असे हे सर्व पदार्थ एकत्र करण्यात येतात। साधारणपणे खरकटी भांडी आधी स्वच्छ विसळून घेवूत नंतर घासल्या जातात। ही भांडी स्वच्छ केलेले पाणी एका बादलीत एकत्र जमा केले जाते। खरकटे पाणी व अत्र पदार्थ बायोगॅस संयंत्रामध्ये टाकून त्यापासून गॅस तयार होतो। तो गॅस स्वयंपाकघरात पाईपच्या सहाय्याने आपूण स्वयंपाकासाठी वापरला जातो।

 

3. बेसीनच्या खालची जागाः

 

बेसीन खाली ठेवलेल्या बादलीत रिकाम्या बाटल्या, ट्यूब, खराब बल्ब व कपबशा, प्लास्टिकच्या पिशव्या, इ. सुका कचरा भंगारवाल्याला देता येतो। सुका कचरा ओल्या कचन्यापासून वेगळा ठेवण्यास यामुळे मदत होते।

 

सध्या आपणास भेडसावणारी मोठी समस्या म्हणजेच भारनियमन, वीजेची वाढणारी मागणी ही तयार होणान्या वीजेपेक्षा जास्त असल्याने भारनियमन करून वीजपुरवठा करावा लागतो। शहरात तयार होणान्या कचन्यापासून बायोगॅस द्वारे वीजनिर्मिती केल्यास आवश्यक असणारी वीज तयार होवू शकते। बायोगॅस मधून तयार झालेला मिथेनगॅस द्वारे जर जनित्र (Generator) चालविले तर वीजनिर्मिती करणे शक्य आहे। बायोगॅसवर चालणारे जनित्र आता बाजारात उपलब्ध होत आहेत। परन्तु ज्यांच्याकडे डिझेल अथवा जनरेटर आहे त्या जनरेटरला 100 बायोगॅस मध्ये बदलून देण्याचे तंत्रज्ञान आम्ही उपलब्ध करून दिले आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे जुना बायोगॅस व जुने जनरेटर आहे ते सुध्दा गरजेपुरती वीजनिर्मिती करू शकतील व भारनियमनावर मात करू शकतील। तसेच ग्रामीण भागामध्ये तयार होणान्या कचन्यावर बायोगॅस प्रकल्प उभा करून वीजनिर्मिती केल्यास सम्पूर्ण गावला भारतनियमनाच्या काळात आवश्यक असणारी वीजपुरवठा करता येईल। अशाप्रकारे विकेंद्रीत पध्दतीने वीजनिर्मिती प्रकल्प उभारता येवू शकतात। मोठया प्रमाणावर कचरा उपलब्ध असल्यास बायोगॅस पासून वीजनिर्मिती करून ती वीज महामंडळाला अथवा खाजगी ग्राहकास विकता येवू शकते। हा एक उत्तम व्यवसाय देखील ठरू शकतो।

 

वरील दोन्ही पध्दतींमुळे घरातील कोणत्याही प्रकारचा कचरा डंपिंग ग्राऊंडवर जात नाही। ओल्या कचन्यापासून उत्तम प्रतीचे गांडूळखत मिळते। हे खत बागेत वापरता येते। गांडूळ पाण्याचा वापर कीटकनाशका सारखा होतो। खत 20 रु प्रति किलो या भावाने विकले जाते। खरकटया पाण्यापासून बायोगॅस मिळतो। या गॅसमुळे एल.पी.जी. गॅसची बचत होते। पाणी सुध्दा चांगले गरम होत असल्यामुळे वीज बिलही कमी येते। सुका कचरा वेगळा करून पुनर्वापरासाठी जातो। आपल्या घरातील कचन्यामुळे इतरांना त्रास होत नाही व पर्यावरण दूषित होत नाही या गोष्टीमुळे समाधान मिळते।

 

अनेक शहरात शेकडो घरे, शाळा, बँक, मंदीरे, ऑफिसेसमध्ये गांडूळखत व बायोगॅसचे युनिट बसविलेले आहेत। प्रत्येकाला त्यातून उत्तम किंवा गॅस मिळतो। असा हा अत्यंत यशस्वी प्रयोग मोठया प्रमाणावर झाल्यास नगरपरिषदा, नगरपालिका व महानगर पालिका यांना येणारा कचन्यावरचा खर्च कमी होण्यास मदत होईल पर्यावरणाचा समतोल आपोआप राखला जाईल।

 

चंद्रपूर नगरपरिषदेसाठी विवम अॅग्रोटेकने 2006 मध्ये एक बायोगॅस प्रकल्प उभारून कार्यान्वित केला आहे। हा प्रकल्प चंद्रपूर शहरातील गंजवॉर्डमध्ये उभारण्यात आला असून तेथे मुख्यत्वे करून गंजवॉर्ड भाजी मार्केटमधील रोज 1500 किलो कचन्यावर प्रक्रिया करण्यात येते। यातून उत्पन्न होणारा गँस बाजूलाच असणान्या सरदार पटेल कॉलेजच्या हॉस्टेल मधील कॅन्टीनला देण्यात येतो। हा प्रकल्प स्वर्णजयंतीतील महिला बचत गटामार्फत चालविला जातो।

 

तसेच नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीतील केळामार्केट भागात केळीच्या 1.5 कचन्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारला गेला आहे।

 

पंढरपूर नगर पालिका, जि. सोलापूर येथे 6 टन प्रति दिवस कचन्यापासून बायोगॅसची निर्मिती होते। या गॅस पासून 40 केव्हीए चा जनरेटर चालविला जाणार आहे।

 

कागल नगर पालिका, जि. कोल्हापूर येथे 3 टन प्रति दिवस कचन्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्याचा प्रकल्प आहे। बीड नगर पालिकेसाठी 5 टन कचन्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे।

 

अंजनगाव सूर्जी, जि. अमरावती व चिपळूण, जि. रत्नागिरी येथील शेतकन्यांच्या गंटासाठी शेतीतील कचन्यापासून व शेणापासून वीज निर्मितीचे प्रकल्प उभे केले आहेत।

 

महाराष्ट्रातील अनेक नगरपालिकांमध्ये विवम अॅग्रोटेक ने गांडूळखत निर्मिती संयंत्र दिलेले आहेत। या संयंत्रातून शहरातील कचन्याचे गांडूळखतात रूपांतर करण्याचे प्रात्याक्षिक या नगरपालिकांच्या कार्यालयात दाखविले जाते।

 

प्रदूषित पाण्याचे शुध्दीकरण करून पाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रकल्प विवम अॅग्रोटेकतर्फे उभे करून दिले जातात। ओला व सुका कचरा एकत्र आल्यास तो वेगळा करण्यासाठी विवमने संयंत्र बनवले आहे तसेच प्लॅस्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभे करून दिले जातात।

 

अधिक माहितिसाठी सम्पर्कः

सौ. निर्मला गिरीश कांदळगावकर

विवम एस.डब्ल्यू.एम.प्रा.ली

बी. 802 मीराबेल अपार्टमेंट, बाणेर, पुणे-499045

ईमेल : nirmala@vivamgroup.co.in/ www.vivamgroup.co.in

लेखक मोबाइल : 09423781304

 

साभार : जलसंवाद अंक 10 ऑक्टोबर 2014

Path Alias

/articles/kacaraa-vayavasathaapanaatauuna-khata-gaensa-va-vaija-nairamaitai

Post By: iwpsuperadmin
×