श्री. योगेश काळजे, काळजेवाडी ता. हवेली, जि-पुणे
जलदिंडीचा मी एक जलवारकरी…. जलदिंडीच्या विचारांचा एक पाईक। जलदिंडी आणि नदीमातेची नाळ आता घट्ट झालेली। तशी नदी वर्षानुवर्षे मानवी संस्कृतीला रूजविण्यासाठी साहाय्यभूत ठरत आहे। नदीने मुक्तपणे, कुठलाही भेदभाव न करता फक्त दिलेलेच आहे। अगदी ‘आईच्या’ रूपाप्रमाणेच। कितीतरी राजघराणी नांदली ती याच नदीखोन्यात। आपल्या या लेकरांना कायम जगण्याची प्रेरणा आणि चेतना नदीनेच तर दिली आहे। अशी संस्कृतीवर्धिनी, संस्कृतीदायिनी नदी आता तिच्या या लेकरांना साद घालते आहे। पण तिच्या आवाजातून व्यक्त होणारी वेदना का बरं तिच्या लेकरांना ऐकु येत नाही त्यांच्या मनाचा करंटेपणा का बरं एवढा वाढलाय? ऐहिक श्रीमंतीत दिवसेंदिवस भर करताना मनाच्या श्रीमंतीत होणारी घट त्या नदीलाही अस्वस्थ करत आहे। तिची ही अस्वस्थता, मन पिळवटून टाकणारी, तिची अवस्था एक जलवारकरी म्हणून माइया सर्वच मित्रांना जाणवत आहे।
जलदिंडीच्या प्रवासात नदी जणू प्रत्येक जलवारकन्याबरोबर मुक्त संवादच साधत असते। जलदिंडीच्या या प्रवासाने पर्यावरणाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिलेला आहे। त्याच दृष्टिकोनातून हे हितगूज।
आज नदी अनेक अंगांनी प्रदूषित होत आहे। नदीच्या या प्रदूषणाला जबाबदार असणारा महत्वाचा घटक म्हणजे सांडपाणी, जैविक, अजैविक कचरा, नदीपात्राचा बाजूला टाकलेला निचरा न होणारा कचरा, नदीतल्या पाण्यात विरघळणारे कण, नदीच्या तळाला साचणारा कचरा। उगमाच्या जवळ दिसणारं तिचं ते रूपडं, खळखळाट करणारा तिथला प्रवाह हळूहळू इतका बिघडू लागतो की, तिच्या रूपावर मोहित होणारी दृष्टि अंध बनावी।
सगळ्यात महत्वाची नदीच्या अस्वास्थ्याची समस्या म्हणजे सांडपाणी। या सांडपाण्याची दोन भागात विभागणी करता येईल-
1. नागरी सांडपाणी।
2. औद्योगिक सांडपाणी।
नागरी सांडपाण्याचा सगळा प्रवाह अगदी हक्काने नदीपात्रात सोडला जातो। यामध्ये प्रामुख्याने मानवी मलासाठी वापरण्यात येणारे पाणि, धुण्याभांडयाचे पाणी, आंघोळीचे पाणी यांचा समावेश होतो। औद्योगिकरणामुळे अनेक अद्योगधंदे थाटले आहेत। या उद्योगधंद्यात वस्त्र उद्योग, कागद उद्योग, दूध, पाणी उद्योग व इतर यांचा समावेश होतो। उद्योगधंद्यामधून नदीपात्रात येणान्या पाण्यात मोठया प्रमाणात रसायनांचा वापर अस्तो। या सांडपाण्यामुळे नदीपात्रात मोठया प्रमाणावर जलपर्णी वाढतात। या जलपर्णीची अन्न म्हणून जरी नदीतल्या जलजीवांना मदत होत असली तरी त्यामुळे पाण्यातल्या ऑक्सीजनवर परिणाम होतोच। या जलपर्णी संध्याकाळी फॉस्फरस व नाइट्रोजन यांना नदीपाण्यात सोडतात। यामुळे पाण्याचा रंग, गुणधर्म बदलू लागतो। पर्यायाने त्याच्या वासामध्येही बदल होतो। ज्याठिकाणी प्रवाह मोकळा नाही त्याठिकाणी तर त्याचे प्रदर्शन मुक्तपणे अनुभवायला मिळते।
याचबरोबर पाण्यामध्ये घन स्वरूपात न विरघळणारा कचरा हीही एक समस्याच आहे। पाण्याच्या प्रवाहात सोडले गेलेले प्लास्टिक, लोखंड, काचा ह्या विरघळल्या जात नाही। एक तर त्या नदीपात्राच्या अंतर्भागात घुसमट निर्माण करतात। प्लास्टिक पाण्याबरोबर वाहत जाते। एखाद्या बंधान्यावर त्याचा थर साचून तो बंधारा उध्वस्त करण्यासाठी त्या जणू सज्जच असतात। नदीकाठावर टोकलेला हाच कचरा नदीपात्राचा भाग बनतो आणि नदीस्वास्थ्याला हानीकारक ठरतो। नदीपात्राच्या बाजूला आता सिमेंटचं नवं जंगल तयार व्हायला लागले आहे। त्यांना निसर्गाचं देखणेपण कसं रूचणार? मोठया प्रमाणावर जंगलतोड होत आहे। त्यामुळे जमिनीची धूप होत आहे। या सर्वांवर अभ्यास होणे अधिक गरजेचे आहे।
नदीतल्या या कचन्याचे व्यव्स्थापन करताना सर्वात प्रथम अंतर्मनात जागर होणे गरजेचे आहे। नदीत होणारे हे प्रदूषण मानवी वृत्तीत झालेला बदल तर सूचवत नाही नां? वृत्तीतलं हे मागासलेपण मानवी अस्तित्वावर आघात नाही कां? चित्रामध्ये माऊलींनी सांगितल्याप्रमाणे बदल होणे महत्वाचे।
‘हे विश्वचि माझे घर’ ही वैश्विक भावना अंतरंगात प्रकाश टाकेल। पाण्याचा थेंब हा माझात तर अंश माइया रूपतलं ‘मी पण’ हाच तो थेंब हे जेव्हा अंतर्मन जाणायला लागेल… हा थेंब तर ईश्वराचा अंश… त्याच्या सगुण रूपाचा जणू साक्षात्कार… मग मनातून हे सात्विक विचार बोलू लागतील…
ज्ञानीयांचा अनू तुकयाचा
तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा
ईश्वराचा अंश आहे
ईश्वराच्या अंशाला झूगारून मी माइया पुढच्या पिढीला काय देतो आहे। ऐहिक श्रीमंती की एक रोगट मन… विचारप्रवाह सुरू होताच अंतर्मनाच्या गाभान्यात ज्ञानाचा प्रकाश प्रखर होवू लागेल। आणि मग माऊलींची अमृतवाणी बोलू लागेल… किंबहुना चराचर… आपणचि जाहला…
नदीतल्या कचरा व्यवस्थापनाची सगळ्यात पहिली पायरी… नदीविषयी आपलेपणाची भावना प्रत्येक मानवी हृदयात जोपासणे… एकटयाने काय होईल हा विचार न करता एकटया एकटयांची फौज जमा झाली की समाज तयार होतो। प्रत्यक्ष नदीतीरावर, नदीवर आपण आलो पाहिजे। हा जनमताचा जागर प्रत्येक माध्यातून बोलका झाला तर परिवर्तन नक्कीच होईल।
आज तंत्रज्ञान प्रचंड विकसित झाले आहे। अनेक अभियंते या विषयाला जोडले गेले तर आधुनिक पध्दतीने कचरा व्यवस्थापनाचे नवे पर्याय उपलब्ध होतील। शहरीकरणामुळे पावसाच्या पाण्याला मातीत मुरायला अवधीच मिळत नाही। सिमेंटचे रस्ते, फरशी, पेव्हिंग ब्लॉक यामध्ये पावसाच्या पाण्याचा प्रवाह हा जलदगतीने सांडपाण्याच्या मोन्यांवाटे, लाईन्सद्वारे नदीत शिरतो। त्यामुळे दूषित पाण्यातले कण या पाण्यात मिश्रीत होतात। पाण्याची शुध्दता लयाला जातेच पण प्रवाहाला प्रचंड वेग मिळतो। पूरस्थिती तयार होते यासाठी या पावसाच्या पाण्याचा वेग रोखण्यासाठी ठिकठिकाणी टाक्या उभ्या केल्या तर पाण्याचा प्रवाह हा थोपवता येईल। जर हे सांडपाणी एकाच ठिकाणी थांबले तर अनेक जंतू त्यात तयार होतात। आरोग्याच्या नव्या रूपात, नवा आजार घेवून तयारच असतात। सांडपाण्याची अशुध्दता, दूषितता मोजण्याची आधुनिक तंत्रप्रणाली वापरूनही या विषयावर काम करता येईल। नदीच्या पात्रात मैला, प्लास्टिक सोडू नये म्हणूनही कचरा पेटया उभ्या करणे गरजेचे आहे। ‘स्वयंशिस्त’ निर्माण करणे हीच यावरची सर्वात मोठी गरज…
जलदिंडीचे जलवारकरी त्या पाडुंरंगाच्या चरणी हीच तर प्रार्थना करत आहे की आम्ही वर्षानुवर्षे असेच या नदीमातेच्या कुशीत प्रवाहित राहो… एकच मागणे…
‘हेचि नेम आता…
न फिरणे माघारी’
साभार : जलसंवाद अंक 10 ऑक्टोबर 2014
लेखक मोबाइल- 9881008010
/articles/jaladaindai